लाइफमें चेंज होना यार!- पण आणाल कसा तो चेंज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 06:50 IST2019-12-26T06:50:00+5:302019-12-26T06:50:01+5:30

बदल हवा म्हणजे नेमकं काय हवंय, ते ठरवूच एकदाचं!

Bucket list 2020 : want to change your life, then do it yourself, NOW! | लाइफमें चेंज होना यार!- पण आणाल कसा तो चेंज?

लाइफमें चेंज होना यार!- पण आणाल कसा तो चेंज?

ठळक मुद्दे डोक्यात काहीही ठोस प्लॅन नसताना नवीन रूटीनची घडी बसवणं तर फार अवघड होऊन बसतं.

प्राची  पाठक 

‘अरे यार, मला फार बोअर झालं आहे’,
‘कुठेतरी पळून जावंसं वाटतंय’,
‘काहीतरी चेंज हवा’, ‘काहीतरी धमाकेदार घडायला हवं’, असं अधूनमधून अनेकांना वाटत असतं. सारखं काय तेच तेच म्हणून प्रत्येक गोष्टीत त्यांना कंटाळा यायला लागतो. कामांमध्ये अधूनमधून बदल व्हावा अशी आस ते धरून बसतात. 
काहींना त्यांच्या आयुष्यात सध्या सुरू असलेल्या गोष्टी अजिबातच आवडत नसतात. त्यांना कामामध्ये पूर्णच बदल हवा असतो. आता काहीतरी मोठा ब्रेक मिळाला पाहिजे, मोठा चेंज मिळाला पाहिजे, असं सातत्याने वाटत असतं. बदल हवा असतो आणि त्यासाठी आपण स्वतर्‍शीच कुढत बसतो; पण काय असते ही ‘चेंज’ नावाची भानगड? - कधी खोलात जाऊन विचार केलाय? 

* काय करता येईल?


थोडं शांत बसा. मनातला गोंधळ दूर करा. आपल्याला बदल हवाय, म्हणजे नेमकं काय हवंय, याचा विचार करा. स्वतर्‍शी बोला आणि आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणार्‍या आपल्या मित्र-मैत्रिणींना, आपल्या आई-वडिलांना विचारा. 
आपल्याला बदल तर हवाय, पण तो स्वतर्‍ला हवाय की इतरांनी आपल्यासाठी बदलायला हवं, असं आपल्याला वाटतंय, याचा विचार करा. बर्‍याचदा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी आपल्याला हवं तसं वागावं, आपल्या इच्छेनुसार बदलावं आणि त्यांच्या वागणुकीत चेंज आणावा, अशी कुठेतरी आपली इच्छा असते. आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडून चेंज नको असतो. इतरांनी त्यांचं वागणं बदलावं म्हणजे आपल्याला हवं तसं घडेल, असा चेंज आपल्याला हवा असतो. हे सगळं ‘जर-तर’ वर अवलंबून असतं आणि आपल्याला हवं तसं घडेलच याची त्यात काहीही शाश्वती नसते.
चेंज हवा म्हणून काहीतरी नवीन करायला गेलं, तर आधीचंदेखील हातातून जातं आणि नवीन गोष्ट तशीही नवीनच असते. त्यामुळे ती न जमण्याची शक्यता जास्त असते. डोक्यात काहीही ठोस प्लॅन नसताना नवीन रूटीनची घडी बसवणं तर फार अवघड होऊन बसतं.
त्यामुळे ‘चेंज हवा’ या भावनेच्या मागे फरफटत गेलं, तर अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींचा नव्याने सामना करावा लागू शकतो. 
रूटीन जरुर तोडा; पण जे काही नवं करायचंय, ते आपल्याला जमतंय की नाही, जमेल की नाही, आवडेल की नाही, याचाही विचार करा आणि एकदम निर्णय घेण्याच्या आधी नव्या बदलाच्या वाटेवर आधी एखादी चक्कर तर मारून बघा.  पळून जावंसं वाटणं वगैरे तर फक्त मनाची पलीकडच्या जगाबद्दलची एक रोमॅण्टिक आयडिया असू शकते. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसू शकते. तर, सोचो और जानो.. सोपा मंत्न, जरासं प्लॅन करून मग ब्रेक घ्यायचा.

* त्याने काय होईल?


1- मुळात आपलं रूटीन सेट झालेलं असणं ही इतकी काही वाईट गोष्ट नसते, हे आपल्याला कळेल.
2- आपल्या आयुष्याला रूटीनमुळे एक शिस्त लागलेली असते. नव्या बदलात, आवश्यक असणारी नवी शिस्त आपल्याला सांभाळता येते का, याचं आकलन होईल.
3- आपला ब्रेक किंवा चेंज नीट विचारपूर्वक घेतलेला नसेल, तर कामात बदल म्हणून जो आनंद आपल्याला होतो, जो तजेला मनाला मिळतो, तो न मिळता वैतागवाडीत भर पडायचीच शक्यता जास्त असली, तर वेळीच सावध होता येईल.
4-वेगवेगळ्या गोष्टी स्वतर्‍ करून बघितल्यामुळे अनुभवांचं एक मोठं गाठोडं आपल्याला नवी दृष्टी देईल.

Web Title: Bucket list 2020 : want to change your life, then do it yourself, NOW!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.