सेक्स एज्युकेशन, प्रश्न विचारा, समजून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:10 IST2019-12-26T07:10:00+5:302019-12-26T07:10:03+5:30

कन्फ्यूजन’ दूर करून, आपल्या भाव-भावनांवर नियंत्रण ठेवण्याची शिकवण

Bucket list 2020 : Sex Education, Ask Questions, get right information. | सेक्स एज्युकेशन, प्रश्न विचारा, समजून घ्या!

सेक्स एज्युकेशन, प्रश्न विचारा, समजून घ्या!

ठळक मुद्देआपल्या शरीरात जे बदल होत असतात, ते कोणते, काय आणि का होतात हे कळेल.

प्राची  पाठक

येता-जाता बलात्काराच्या बातम्या. रोज नवीन केस, नवीन व्यथा. अतिशय अमानुष असं काहीतरी घडलेलं असतं. त्यात आपण मुलगी असू, तर आणखीन घाबरून गेलेलो असतो. त्यात लोकांच्या सतराशेसाठ सूचना. कोणते कपडे घालावे, घरी कधी यावे, कोणाच्या कुठे, कसे मारावे. कळत-नकळत आपण तरु ण आहोत आणि आपल्याला समाजात राहायचं तर तरु ण मुलगी म्हणून अमुक वागावं आणि तमुकच करावं हे ऐकून घ्यावंच लागणार आहे, असंही आपलं कंडिशनिंग व्हायला लागतं. दुसरीकडे याच वयात कुणीतरी आवडायला लागतं, मुलांबद्दल आकर्षणसुद्धा वाटत असतं. मैत्रिणी वेगळीच खुसपूस करत बसतात.  
तेच मुलग्यांचंही. एखाद्या मैत्रिणीशी जरासं बोलायचं म्हटलं तरी कुठली कुठली पथकं आपल्याला पकडून नेतील, याची भीती बसते. एकीकडे मुलींविषयीचे मनातले आकर्षण आणि दुसरीकडे आजूबाजूला प्रचंड दरारा-भीती-शंका असं वातावरण. यासगळ्यात कुठे शाळा-कॉलेजात शिक्षक स्वतर्‍च लाजत लाजत, अतिशय ऑकवर्ड होत चटकन काहीतरी लेक्चर उरकून टाकावं, काहीतरी घाण संपवून टाकावं अशा पद्धतीने हा विषय शिकवल्याचा  टिकमार्क करतात. त्याला नाव शारीरिक शिक्षण किंवा लैंगिक शिक्षण. आजूबाजूला असे प्रकार सुरू असताना गद्धे पंचविशीच्या शरीरातले केमिकल लोचे मात्न आणखीन उफाळून येत असतात. कोणीही धडपणे आणि थेट काही सांगत नाहीत. सतत आडून, लपून काहीतरी सुचवत मात्न राहतात. ‘पाय घसरणे’, ‘माती खाणे’, ‘लफडं’, ‘प्रकरण’ वगैरे शब्द कुजबुजत आपल्यार्पयत येत राहतात.


* काय करता येईल?
शरीरसुद्धा आपलंच आहे. आपल्या शरीराविषयी, या वयात होणार्‍या शारीरिक, मानसिक बदलांविषयी, आपल्या लैंगिकतेविषयी आपल्याला काही शंका असतील तर त्याविषयी अधिक, योग्य ते ज्ञान घ्यायला काय हरकत आहे? आपल्या मित्र-मैत्रिणींनी सांगितलेली, ऐकिव माहिती बरोबरच आहे, याची खात्री काय? आपणच योग्य तज्ज्ञांना गाठून याविषयी शास्रीय माहिती मिळवायला काय हरकत आहे? एखादा छोटा ग्रुप करून जाऊ तज्ज्ञांकडे किंवा त्यांना आपल्याकडे बोलावू. त्यांच्याशी या विषयावर गप्पा मारू. प्रश्न विचारू. मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळवायचा प्रयत्न करू. काही ऑथेंटिक रीडिंग मटेरियल, काही चांगली पुस्तके, चांगल्या वेबसाइट्स कळतात का याविषयी बोलू या, ते शोधू या. आपल्या लैंगिकतेशी आपणच संवाद साधून बघू या.  

* त्याने काय होईल?
1- आपलं शरीर, प्रेम, लैंगिकता याविषयी अनेकांनी चुकीची, अयोग्य किंवा अपुरी माहिती देऊन आपल्याला कन्फ्यूज करून ठेवलेलं असतं, ते कन्फ्यूजन दूर व्हायला मदत होईल.
2- आपल्या शरीरात जे बदल होत असतात, ते कोणते, काय आणि का होतात हे कळेल.
3- आपल्या भाव-भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं, सभ्य माणूस म्हणून कसं जगायचं, हे शिकता, समजता येईल.
4- ‘नाही’ म्हणजे काय, दुसर्‍याच्या भावनांचा कायम आदर करायचा असतो याचं भान येईल. 
5- अतिरेकी आणि खुळचट कल्पना सोडून सत्य आणि शास्रीय माहिती मिळाल्यामुळे स्री-पुरुषाविषयी, मित्र-मैत्रिणींविषयी आदराची, समानतेची भावना वाढीस लागेल.
6- एखादा मुलगा ‘गर्लिश’ दिसतो, किंवा एखादी मुलगी 
‘टॉम बॉईश’ वाटते, यावरून त्यांच्याविषयी काहीतरी बोलणं किंवा त्यांच्यावर नको ते शिक्के मारणं बंद होईल.

Web Title: Bucket list 2020 : Sex Education, Ask Questions, get right information.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.