हे काय बायकांचं काम आहे? हे शोभतं का पुरुषाला? -असं म्हणता तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:10 IST2019-12-26T07:10:00+5:302019-12-26T07:10:04+5:30

स्री-पुरु ष समतेच्या पोकळ गप्पा ठोकण्यापेक्षा घरातली कामं शिकू या.

Bucket list 2020 : don't just talk about gender equality, practice what you preach. | हे काय बायकांचं काम आहे? हे शोभतं का पुरुषाला? -असं म्हणता तुम्ही?

हे काय बायकांचं काम आहे? हे शोभतं का पुरुषाला? -असं म्हणता तुम्ही?

ठळक मुद्देनवीन वर्षात आपण संकल्प करू या, की कोणतेही काम छोटे-हलके नाही

प्राची  पाठक 

एकीकडे स्त्री समानतेच्या गप्पा, दणक्यात त्यासंदर्भात करायचे फॉरवर्ड, भाषणं सगळं चालतं. दुसरीकडे घरात कामं फक्त आईने किंवा बहिणीने करायची, आपण किचनमध्ये कधी जात नसतो, असा एकुण तोरा. हल्ली तर सरसकट आरोपच होतो की, शहरातल्या लाडावलेल्या मुलांना तर साधा चहा, वरण-भाताचा कुकर लावणं, आपल्याच घराची झाडलोट करणं, घर स्वच्छ ठेवणं, गरज पडल्यास स्वतर्‍चेच कपडे धुणं, आपलं जेवणाचं ताट जागेवर आणि धुऊन ठेवणं. इतकी क्षुल्लक कामंही येत नाहीत. ‘कामवाली बाई करून घेईल’ असा अ‍ॅप्रोच ठेवतात. 
त्याचवेळी खेडोपाडी कितीतरी मुली घरात आवरासावर करून, पाणी भरायला दूरवर जाऊन, स्वयंपाक करून मग शाळा-कॉलेज, जॉबसाठी घराबाहेर पडतात. खेडय़ातली काही तरु ण मुलं शेतात आणि घरात कामं करताना थोडीफार दिसतात, मात्न शहर असो की खेडं बहुतेक तरुण नाक्या-नाक्यावर चकाटय़ा पिटत, घोळक्यात एकत्न जमून मोबाइलमध्ये काहीतरी खेळत बसलेली असतात. गुटखा, मावा वगैरे खात इथे-तिथे पचापच थुंकत उभी असतात. 
घरातल्या कामाचा जास्तीत जास्त भार घरातल्या स्रियांवर पडलेला असतो, त्या कमावत्या असो की नसो.  घरकाम करुन पाहणं, यात कमीपणा काय आहे?

* काय करता येईल?
नवीन वर्षात आपण संकल्प करू या, की कोणतेही काम छोटे-हलके नाही आणि घरातले कोणतेही काम स्रीचे/ पुरु षाचे असे नाही. गॅस सिलिंडर संपला, टय़ूब उडाली तर ते बदलायला आपल्याला पुरु षाला हाक मारायची गरज नाही.  आपण मुलगा असो की मुलगी रोज स्वयंपाकघरात राबणार्‍या व्यक्तीला थोडीतरी मदत करतो का, ते बघू या. एखादी भाजी बनवून पाहू. पोळ्या लाटून बघू. आठवडय़ातून एक दिवस पूर्ण स्वयंपाक आणि त्यानंतरची आवरसावर आपण करू, असं काही प्लॅन करू. किमान आपल्याला खायला आवडतात, त्या डिशेश तरी कशा बनतात, त्यात हेल्दी ऑप्शन्स काय काय आहेत, ते शोधून बघू. हातातल्या मोबाइलचा या कामासाठी वापर करून बघू. खाद्यपदार्थाची माहिती आपण शोधून काढू. घरातला भाजीपाला आठवडय़ाच्या आठवडय़ाला आणायची जबाबदारी घेऊ. 

* त्याने काय होईल?
1- घरातल्या स्रिया किती कामं करतात आणि त्यावाचून किती अडतं हे कळेल.
2- शिस्त आणि स्वावलंबनाची जाणीव होईल.
3- शिक्षणासाठी किंवा इतर काही कारणांसाठी बाहेरगावी राहायची वेळ आल्यावर, हे धडे किती उपयोगाचे आहेत, होते हे कळेल.
4. चांगला भाजीपाला कसा ओळखावा, त्याची किंमत काय, बाहेर खाताना आपण कचर्‍यालाही किती किंमत मोजतो, याची कल्पना येईल. 
6- पालकांशी पटलं नाही, तर ‘मैं घर छोड के जा रहा हूॅँ’ अशी तरु णपणी अधूनमधून जी हुक्की येते, तिच्यासाठी किती पापड बेलने पडते हैं, याची जाणीव होईल. 
7- त्याही पलीकडे, किमान आपल्या गरजेपुरता तरी स्वयंपाक आपल्याला बनवता येणं, हे बोअरिंग काम नसून तीसुद्धा एक कला, प्रोफेशन आहे, हे कळेल. 

Web Title: Bucket list 2020 : don't just talk about gender equality, practice what you preach.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.