खणाखणाची कचराकुंडी
By Admin | Updated: January 7, 2016 21:51 IST2016-01-07T21:51:21+5:302016-01-07T21:51:21+5:30
रोज शाळेत जाता-येताना ही मुलं कच:यानं तुडुंब भरून वाहणा:या कुंडय़ा पाहत होतेच. कधी कचरा गाडी यायची, कधी नाही. कुंडी भरली की लोक त्याभोवतीच

खणाखणाची कचराकुंडी
>प्रेम रंजन सिंघ, शिवानी सिंघ, अंकुश पाल
इयत्ता नववी, दमण, दमण आणि दीव
रोज शाळेत जाता-येताना ही मुलं कच:यानं तुडुंब भरून वाहणा:या कुंडय़ा पाहत होतेच. कधी कचरा गाडी यायची, कधी नाही. कुंडी भरली की लोक त्याभोवतीच कचरा टाकून जायचे.
त्यातून या मुलांना एक आयडिया सुचली की, एकच एक कुंडी कशाला? कप्प्याकप्प्याचीच कुंडी करू आणि लोकांना सांगू की जैविक कचरा आणि इतर कचरा वेगळा टाका. म्हणजे महानगरपालिकेचा विगतवारीचा वेळ वाचेल आणि रिसायकलला मदत होईल. शिवाय एक असा कप्पाही या कुंडीला असेल ज्याद्वारे जैविक कच:याचं खत होण्याची प्रक्रियाही एकीकडे सुरू होईन. शिवानीला कल्पना सुचली आणि हे तिघे मित्र कामाला लागले.
ते सांगतात, ‘प्रत्येक शहरात अशा कुंडय़ा असल्या तर स्वच्छ शहरं लवकर दिसू लागतील आणि नागरिकांच्या हातालाही वळण लागेल.’