शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

ऐन तारुण्यात शरीराचा खेळ, अनेकांचं आरोग्य धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 13:52 IST

सर्रास आयपील घेणं, मनमर्जी गर्भनिरोधकं वापरणं, क्रॅश डाएट, जंक खाणं, झोपेचा अभाव यातून टीनएजर्स स्वत:लाच वेठीस धरत आहेत.

ठळक मुद्देस्वत: वर प्रेमच नाही? बॉडी इमेज का छळते तुम्हाला?

-डॉ. गौरी करंदीकर

मी बारीक असते तर माझी निवड झाली असती? सिक्स पॅक नाही म्हणून तर नाही.? मी नाही म्हणू की नंतर गोळ्या घेऊन टाकू? ती मला नाकारेल का?- असे अनेक प्रश्न मनात वादळासारखे घोंघावत असतात.त्यातच ‘बॉडी इमेज’ ही किशोरवयात भयंकर महत्त्वाची गोष्ट बनते. कधी उघडपणे त्याविषयी बोललं जातं, तर कधी मनातल्या कप्प्यात विचार दडून बसतो. किशोर/तरुण वयातला कॉन्फिडन्स अनेकवेळा आपला स्वतर्‍च्या इमेजबद्दल असलेला दृष्टिकोन ठरवतो.आज अवतीभोवती पाहिलं तर आजचे तरुण आपल्या आपल्या बॉडी इमेजबाबत फारसे खुश नसल्याचंच दिसतं. जाहिराती, मीडिया, मित्र-मैत्रिणींच्या गप्पा, कुटुंबातील सल्लेबाजी हे बहुतांशवेळा सुंदर दिसणं, बारीक असणं, शरीरयष्टी सुडौल किंवा भारधस्त असणं हेच सांगतात, त्याचं समीकरण यशाशी जोडतात. परिणाम काय?अनेक मुलं-मुली वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट करतात. त्यासाठी इंटरनेट, विविध अ‍ॅप्स यावरचे डाएट प्लॅन्स फॉलो करताना आढळतात. वैद्यकीय पाश्र्वभूमी नसताना शरीरावर केलेल्या या प्रयोगांमुळे प्रथिनांची कमतरता, विटॅमिन्सची कमतरता, हार्मोन्सवर झालेले परिणाम अशा अनेक गोष्टी समोर येतात. आपल्याचकडे नाही जगभर अशा किशोरवयीन मुलांची समस्या वाढत चालली आहे.शरीराचा कसा खेळ होतोय.?1. वजन वाढवायचं आणि कमी करायचं ही सध्या किशोरवयीन भयंकर गंभीर समस्या आहे. जाहिरातीत दिसणार्‍या प्रथिनांच्या पावडरी, गोळ्या सरसकट खाल्या जातात. त्याचा परिणाम थेट हार्मोन्सवर होतो. अ‍ॅण्ड्रोजन्ससारख्या हार्मोन्सवर परिणाम होण्याची त्यानं शक्यता असते. आणि त्यानं आरोग्यच धोक्यात येतं.2. बॉडी इमेज बरोबर येणारे न्यूनगंड, आत्मविश्वासाचा अभाव हा आपल्या इतर व्यवहारांमध्ये अडथळे व करिअरच्या मार्गावरही अडथळा बनण्यासाठी कारणीभूत ठरतो. आपण मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमधून वगळले जाऊ या भीतीपोटी, मैत्री जोपासण्यासाठी दारू, सिगारेट व इतर व्यसनांच्या आधीन जाणारे तरुण-तरुणी आताशा काउन्सिलिंगला येतात.3. मुला-मुलींमधलं मैत्रीचं सुंदर नातं आजही आहेच. मात्र लैंगिक देवाण-घेवाणीतून नातं सांभाळण्याची घाईही आता दिसते. लैंगिक संबंधातील इंटिमसी (जवळीक) व त्याची नजाकत कमी होत त्याला प्रॅक्टिकल किंवा इन थिंग म्हणत शारीरिक संबंधाकडे कोवळ्या वयात अनेकजण वळत आहेत. आपलं प्रेम हे केवळ शारीरिक संबंधातूनच व्यक्त करावं ही परिभाषा होत चालली आहे का, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.4. त्याचा परिणाम नात्यांमध्ये, आपआपसातल्या व कुटुंबातील नात्यांमध्ये तणाव निर्माण करत असल्याचं दिसू लागले आहे. लैंगिक संबंधातून उद्भवणारे जंतुसंसर्ग,  भावी आयुष्यात होणारे शारीरिक आजार, वंध्यत्व हे सारं ओढावून घेतील की काय ही मुलं, अशी धास्ती वाटते. शरीर संबंध ठेवतानाही गर्भनिरोध साधनं योग्य न वापरणं, सर्रास इर्मजन्सी पिल्स घेणं, त्याचा वारंवार वापर यामुळे हार्मोन्सवर होणारे दुष्परिणाम दूरगामी ठरतात, आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.5. गोळ्या, कंडोम अयशस्वी ठरल्यास गर्भपात करायला लागणार्‍यांची संख्याही वाढतच चालली आहे. शारीरिकच नाही तर मानसिकही क्लेश त्यातून होतातच.6. इंटरनेटची मुबलक उपलब्धता, लाँग डिस्टन्स आणि शॉर्ट टर्म नात्यांना जन्म देऊ लागली आहे. आपली छायाचित्र, व्हिडीओ शेअरिंग, त्यातून निर्माण झालेले अवघड प्रसंग, मनात असलेली इन्सिक्युरिटी ही तरुण पिढीत वाढत असल्याचं दिसून येतं. चॅटिंगची नाती आणि डेटिंगची नाती यामुळे व्हायलन्सच्या प्रकारांमध्ये ही वाढ झाल्याचं दिसून येतं.7. तरुण मुलामुलींमध्ये झोपेच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे रिपोर्ट्स हे जगभरात आढळून येत आहेत. त्यातून निर्माण होणारे व जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे व मानसिक तणावांमुळे ही तरुण/यंग पिढी पीसीओज्, उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्ट अटॅकसारख्या शारीरिक विकारांच्या विळख्यात कमी वयात अडकताना दिसू लागली आहेत.

8.आयुष्यभर आपल्याला साथ देणारं आपलं शरीर आणि मन यांच्यावर आपलं का बरं प्रेम नसावं?वजनासाठी औषधं, गर्भनिरोधक गोळ्या, गर्भपाताच्या पद्धती, चरबी वाढवणारी साधनं असे अनेक प्रयोग करून आपण आपल्या प्रिय शरीरावर अन्याय तर करत नाही ना, हा विचार आपण आज केला तर?9. लैंगिक संबंधामध्ये, दिल बरोबर दिमागची जोड दिली तर, नात्यांमध्ये कॅज्युअलपेक्षा रिस्पॉन्सिबल वागणूक करायचं ठरवलं तर तेच आपल्या शरीराला, मनाला खरं व्हॅलेण्टाइन्स गिफ्ट असेल!( लेखिका स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत.)