फुलवा ओठावर हसू.

By Admin | Updated: October 30, 2014 19:25 IST2014-10-30T19:25:26+5:302014-10-30T19:25:26+5:30

कोरडे, भेगाळलेले काळपट ओठ नको झालेत?

Blossom smile | फुलवा ओठावर हसू.

फुलवा ओठावर हसू.

धनश्री संखे, ब्यूटी एक्सपर्ट

 
कोरडे, भेगाळलेले काळपट ओठ नको झालेत?
 
मुली नट्टापट्टा खूप करतात. चेहरा चांगला दिसावा म्हणून काय काय चेह:याला चोपडत राहतात.
पण त्वचेचं काय? काळ्या पडत चाललेल्या कोरडय़ा, भेगा पडलेल्या ओठांचं काय ?
आपले ओठ सुंदर, नाजूक आणि तजेलदार दिसायला हवेत म्हणून या काही गोष्टी ट्राय करून पहा.
1) ओठ हा त्वचेचा अत्यंत नाजूक भाग. अनेकजण ओठांनाही मॉयश्चरायझर लावतात. तसं अजिबात करू नका. थंडीतही ओठांना मॉयश्चरायझर लावू नयेच.
2) अनेकजणांना ओठ आवळायची, ओठांवरून सतत जीभ फिरवण्याची सवय असते. त्यामुळे ओठांना नॅचरल ओलावा मिळत असला तरी त्यामुळे खरं तर कोरडेपणाच वाढतो. ओठांवरच्या भेगा, रेषा दिसायला लागतात. त्यामुळे ओठांवरून जीभ फिरवण्याची सवय बदला.
3) ऑरगॅनिक गोष्टी वापरून बनवलेले लीप बाम वापरणं केव्हाही चांगलं.
4) ऑरगॅनिक गोष्टी म्हणजे काय? बीसवॅक्स म्हणजेच मधाच्या पोळ्यातील मेण, सूर्यफूल तेल, व्हिटॅमिन ई, नैसर्गिकच फ्लेवर हे त्या लीपकेअर प्रॉडक्टमध्ये आहे का, हे तपासून घ्या.
5) लीपबामध्ये सनब्लॉकिंग मटेरिअल 2स्न30 हे आहे का, हे तपासून घ्या. त्यामुळे टॅनिंग आपण टाळू शकतो.
6) बर्फानं तुमच्या ओठांवर मसाज करा. मिनिट-दोन मिनिट. मग टिश्यूपेपरनं पुसून घ्या.  यामुळे ब्लड सक्यरुलेशन चांगलं होतं.
7) अतिचहा-कॉफी पिणं टाळा. त्यामुळेही ओठ काळे होतात.
8)  साखरेत व्हिटॅमिन ऑइलचे तीन थेंब घालून मिश्रण बनवा. आणि त्यानं ओठांवर स्क्रब लावा. त्यामुळेही ओठांचं स्कॅनिंग कमी होऊ शकतं.
9)  रात्री दात घासून झाल्यावर एखाद्या चांगल्या पेट्रोलियम जेलीनं ओठांवर थीक लेअर लावा. सकाळी ओठ ब:यापैकी स्मूथ, सॉफ्ट झालेले दिसतील.
10) आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, हसत रहा. ओठांचा खरा दागिना म्हणजे हसू, ते कायम ठेवा.
 
 

Web Title: Blossom smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.