शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

सायकल नावाचं पॅशन

By admin | Updated: May 4, 2017 07:36 IST

सायकल हा माझ्याच शरीराचा एक भाग आहे असं मला वाटतं. माझ्या मनाच्या इंधनावर ती चालते। थांब म्हटल की थांबते, पेडल मारलं की पळते. सायकल हे एक असं कूल वाहन आहे, जे आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर फुकटात घेऊन जातं. स्वस्त आणि मस्तही. बॅलन्स राखते आपला ते वेगळंच..

 आॅफिसमधल्या एक मित्रानं मला विचारलं, ‘सेकंड हॅण्ड सायकल कुठे मिळेल का? जरा सायकल चालवीन म्हणतोय बारीक होण्यासाठी !’ हा मित्र शरीरानं भारदस्त आहेच आणि गमतीशीरसुद्धा! म्हणाला, ‘जरा मजबूत पाहिजे हं, माझं वजन घेईल अशी..’मी हसले आणि उत्तर देणार तेवढ्यात तो म्हणाला, ‘कुठली तरी अशीच घेऊ का नाही तर? साधीसुधी.. अडीच तीन हजारांची? कशाला खर्च करायचा न् जास्त..’हे ऐकलं आणि त्याला गप्प करत एकपट्टी आवाज चढवत म्हटलं, ‘महिन्याला ५-१० हजार बिअर आणि इटिंग आउटवर खर्च करशील, कपाटातले कपडे होत नाहीत म्हणून दर महिन्याला दोन-चार दोन-चार करत करत वर्षभरात १० ते १५ हजार कपड्यांवर खर्च करशील. पण ज्या गोष्टीमुळे आपल्या शरीराला फायदा होणार आहे अशा गोष्टीसाठी खर्च करायची तयारी नाही! काय नॉनसेन्स थिंकिंग आहे तुझं?’त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. ‘अग... पण... मी... हो... नाही...’ अशा छोट्या छोट्या शब्दांनी माझा फ्लो तोडण्याचा प्रयत्न करत होता. पण मी काही थांबले नाही. ‘कोणती तरी खटारा सायकल घेशील, ना त्याला सस्पेंशन, न स्टर्डीनेस. दोन दिवस चालवशील आणि कम्प्लेन करशील. रस्तेच खराब आहेत, सीटच कम्फर्टेबल नाही, जाऊदे आज नकोच असे बहाने करशील. मग घराच्या एका कोपऱ्यात सडत पडेल ती सायकल...’ हे ऐकून तो पुढे एकच वाक्य म्हणाला, ‘कोणत्या दुकानात जाऊ सांग, मी जातो या वीकेंडला’.चारचाकी गाडी विकत घेताना आपण किती विचार करतो, पण मात्र सायकल घ्यायची मनात आलं का तिला बिचारीला डिगनिटीच देत नाही. हौशी सायकलिस्ट आणि नॉनहौशी सायकलिस्ट असा मी भेद करत नाही. यू आर इदर अ सायकलिस्ट. ओर नो, परदेशात सायकलला बाइक असं संबोधल जातं. म्हणूनच एक प्रचलित म्हण आहे, यू आर जस्ट वन बाइक राइड अव्हे फ्रॉम गुड मूड. तुम्ही कधीच सायकल चालवली नसेल तर तुम्हाला सांगणं कठीण आहे की सायकलिंगचा आनंद काय असतो. पण माझ्या मते सगळ्यांनीच एकदा कधीतरी उन्हाळ्याच्या सुटीतील हा मोस्ट आॅबियस कार्यक्र म केला असेलच. मुंबईतल्या आमच्या शिवाजी पार्क एरियामध्ये एक खूप जुनं सायकलचं दुकान होतं. बाबू सायकल मार्ट. पाच रुपये अर्धा तास सायकल रेंटवर घेऊन यायचे मी. समोरच्या बिल्डिंगमधल्या एका काकांनी मला सायकल शिकवण्याची जबाबदारी घेतली होती. पहिल्याच दिवशी गटाराच्या झाकणावरून मी अडखळून पडले. पण पुन्हा उठवून मला काकांनी सायकलवर बसवलं. मन ही मन मी त्यांना फारच बोलले असेन त्यावेळी. पण आपली मजल तेव्हा फक्त थोडंसं रडण्यापर्यंतच. बाकी ऐकणार कोण. लगेच शिकले असावे मी सायकल. अजून कुठे धडपडल्याचं मला आठवत नाही. पण सायकल चालवणं वॉज अ वे आॅफ रियलायझिंग माय फिल्मी ड्रीम्स. गल्लीतल्या गर्द झाडीच्या बाजूनं (हो होती त्यावेळी दादरमध्ये गर्द झाडी) सायकल चालवताना, मनातल्या मनात आपण जो जीता वही सिकंदरमधले आमीर खान आहोत असं वाटायचं. पहला नशा.. पहला खुमार... असं गाणं गुणगुणत, सायकलच्या स्पीडमुळे डोळ्यासमोरून भरभर सरकणारी झाडं आणि त्यामुळे अलगद गालावर उमटणारी वाऱ्याची रेघ ! हे सगळं आता आठवलं की आपण किती बावळट होतो असं माझ्या मनातसुद्धा येत नाही. किंबहुना आजही सायकल चालवताना मला असंच काहीसं फिलिंग येतं. मला कार आणि स्कूटर्स चालवण्याची अत्यंत भीती वाटते. असं वाटतं की या मोटराइज्ड व्हेइकल्सना स्वत:चं एक डोकं असतं, आणि माझ्या कंट्रोलच्या बाहेर त्या कसेही कुठेही जाऊन आपटतील. पण सायकलबद्दल असं नाही वाटत. सायकल इज अ‍ॅन एक्सस्टेन्शन आॅफ माय ओन सेल्फ ! माझ्याच शरीराचा एक भाग आहे असं वाटतं. माझ्या मनाच्या इंधनावर ती चालते। एकदम लो मेंटेनन्स व्हेइकल. थांब म्हटलं की थांबते, पेडल मारलं की पळते. सायकल हे एक असं कूल वाहन आहे, जे आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर फुकटात घेऊन जातं. स्वस्त आणि मस्त ट्रॅव्हल करण्याचं एक साधन.मी सिटी राइडिंग फारसं एन्जॉय नाही करत. पण स्पेनमधल्या वलेंशियामध्ये मनसोक्त सिटी राइडिंग केलं होतं. तिथे सायकलिंग लेन्स आहेत. फुटपाथवरसुद्धा सायकलिंगसाठी जागा सोडलेली आहे. हे सगळं पाहून मीही मुंबईमध्ये सायकलनेच आॅफिसला जायचं ठरवलं. साडेतीन किलोमीटरच्या या रायडिंगमध्ये मला सायकलिंग कमी आणि ट्रक्स, बेस्ट बसेस व मोठमोठ्या मोटारींच्या अरेरावीमुळे अधिक घाम फुटु लागला. तेव्हापासून ठरवलं सायक्लिंग टू कम्यूट इज स्टील अ डिस्टंट ड्रीम इन मुंबई. अर्थात, असं असलं तरी हल्ली खूप लोकांनी शहरातलं राइडिंग सुरू केलंय. सकाळी लवकर उठून, मॉर्निंग राइड्सवर जातात. माझी एक मैत्रीण तर दर वीकेंडला फिटनेससाठी लांब लांब सायकल राइड्स प्लॅन करते. माझ्या ओळखीचे अनेक जण ८ ते १० किलोमीटरचं रायडिंग करत रोज आॅफिसला सायकलनेच जातात. थोडक्यात काय तर प्रत्येक जण त्यांचं सायकलिंगचं पॅशन रोजच्या आयुष्यात जगण्याचा प्रयत्न करताहेत. जिथे मुंगीलासुद्धा चालायला जागा नसते अशा मुंबईच्या खडबडीत रस्त्यांवर सायकल चालवणं म्हणजे या कॉँक्रीटच्या जंगलातली थोडीशी जागा रिक्लेम करायचा एक प्रयत्न. पण सायकलिंग कम्युनिटी वाढते आहे हे बघून सॉलिड मस्त वाटतं !किती वेगवेगळ्या लोकांशी कनेक्ट केलंय मला या सायकलनं. मागे एका न्यूज चॅनलसाठी काम करत असताना सायकलिंगवर अनेक टीव्ही शोज केले. अशाच एका शोमध्ये फिटनेस फ्रिक अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या सोबत पहाटे ५ वाजता माटुंग्याच्या फिल्टर कॉफीने सुरुवात करून हाजी अली ज्यूस सेंटरपर्यन्त केलेली राइड आठवते. मी आॅफिसमध्ये परतल्यावर माझी तेव्हाची बॉस म्हणाली होती, ‘तुझं आपलं बरं आहे, रिपोर्टिंगला जायचं म्हणजे धर हँण्डल मार पेडल!’ हाच तर आहे सायकलिंगचा मूळ मंत्र. हॅण्डलवर हात ठेवायचा बॅलन्स सांभाळण्यासाठी आणि पॅडल करत राहायचं पुढे जाण्यासाठी..सायकलिंगचंच काय, आयुष्याचंही असचं आहे ! न.. - प्रियांका देसाई - (उत्साही आणि पॅशनेट सायकलिस्ट आहे प्रियांका )