भासमा-यांचा गाजावाजा

By Admin | Updated: June 4, 2015 14:22 IST2015-06-04T14:22:30+5:302015-06-04T14:22:30+5:30

फेसबुकवर सतत स्वत:चा ढोल वाजवत असाल तर सांभाळा, तुम्ही गोत्यात येऊ शकता!

Bhasma-Gajwaza | भासमा-यांचा गाजावाजा

भासमा-यांचा गाजावाजा

>मित्र-मैत्रिणींबरोबर हॉटेलात जेवायला गेले, सिनेमाला गेले, फिरायला गेले की काढ फोटो नी टाक फेसबुकवर असा उद्योग हल्ली अनेकजण करतात.
आपल्या आयुष्यात जे जे घडतं ते ते जगाला ओरडून सांगतात.
इथवर सगळं ठीक होतं.
आता मात्र लोकं त्यापुढे गेलेत, काहीजण स्वत:ला प्रमोशन मिळाल्याची बातमी सांगतात. काहीजण आपण मोठी कार, बाइक, घर, टीव्ही घेतल्याचे, लांब पिकनिकला गेल्याचे येताजाता जगजाहीर करतात.
त्याला अनेकजण लाइक करतात, कमेण्ट करतात. छान वाटतं.
पण आता यापुढच्या काळात हे छान वाटणं फार काळ टिकणार नाही अशी शक्यता आहे. अमेरिकन मेलन विद्यापीठ, लंडनची सिटी युनिव्हर्सिटी आणि इटालीचं बॉकॉनी विद्यापीठ यांनी केलेल्या अभ्यासानुसार हे सेल्फ प्रमोशन, हे स्वत:चे ढोल स्वत:च वाजवणं बॅकफायर होऊ शकतं. त्याचा तुमच्या करिअरच्या प्रगतीवर अत्यंत घातक परिणामही होऊ शकतो. कारण त्यांच्या या अति गाजावाजावर इतर लोक जळू शकतातच, पण ही माणसं मुद्दाम इतरांना डिवचण्यासाठी अशा पोस्ट टाकतात असा अर्थही त्यातून निघू शकतो.
हळूहळू या माणसांविषयी इतरांना राग यायला लागतो. लोक त्याच्या यशावर जळतात म्हणून नव्हे तर त्यांच्या अतिच ढोल पिटण्याचा इतरांना त्रस होतो. आणि कशात काही नसताना केवळ भासमारे कार्यक्रम आहे आणि डोक्यात हवा गेलीये असं लोकांना वाटतं.
त्यामुळेच आपले आनंद जगजाहीर करण्यापूर्वी जरा विचार करायला हवा असं  सायकॉलॉजिकल सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला हा अभ्यास सांगतो!

Web Title: Bhasma-Gajwaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.