शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आवडलं तर बेस्ट, नाही तर नेक्स्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 2:39 PM

मुलगा आहेस तर हेच काम कर, मुलगी आहेस, हे नाहीच जमणार तुला! सांगितलं तेच करिअर कर, जरा सेटल हो. या सार्‍या जुनाट रीती सहज नाकारल्या जात आहेत!

ठळक मुद्देजेन्डर रोल - ठळक रेघा आता पुसट

प्राची  पाठक 

पापा कहते हैं बडा नाम करेगा,बेटा हमारा ऐसा काम करेगा.. माहितेय ना हे गाणं?  कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये, सेंडऑफ पार्टीत तर हे गाणं हमखास कुणी ना कुणी गातं, वाजवतं.‘अरे, कोणत्या जमान्यातलं गाणं निवडलं यार, लेटेस्ट बोलो, लेटेस्ट’ असं हे गाणं सादर करणार्‍याला कुणीतरी म्हणतंही. तरीही हे गाणं सादर करायचा मोह सुटत नाही तो नाहीच. एकतर या गाण्याची चाल आकर्षक आहे. तरुण, सळसळतं मित्रमंडळ त्यात दिसतं. गिटार वगैरे गळ्यात बांधून स्टाइल मारता येते.या गाण्यातली एक ओळ फार महत्त्वाची आहे.तो हीरो म्हणत असतो, ‘मगर ये तो कोई ना जाने, के मेरी मंजिल है कहां!’मस्त दिलखुलास गातो, म्हणतो माहीत नाही, मी कुठं जाईन, कसा पोहचेन. खरं तर तरु ण मंडळींच्या माथी अगदी शाळेपासूनच ‘कर बाबा/ताई काहीतरी करिअर’, ‘हेच वय आहे’, या वाक्यांचा पुरेपूर मारा होत असतो. अगदी नकोसा होईल, इतका उपदेशांचा डोस मिळत असतो. आजूबाजूला असलेले मित्र पुढे निघून जातील, सेटल वगैरे होतील, जोडीदार पटकावतील आणि तुम्ही मात्र आहात तिथेच गटांगळ्या खात राहाल, अशा अर्थाच्या डायलॉग्सचं खरोखर प्रचंड प्रेशर कॉलेजवयीन मुलामुलींवर असतं. पिढय़ा बदलतात; पण हे प्रेशर बदलत नाही. त्यात हा हीरो सांगतो, माझी मंजिल वगैरे कुठे आहे, मला काही माहीत नाही..आपण कितीही सॉर्टेड आउट असलो तरी रिलेट करतो आपण त्याच्याशी. कारण, अमक्या तमक्यात करिअर करा, ध्येय ठेवा, त्या दिशेने नुसतं धावत सुटा, असे शेकडो पर्याय आपल्यावर आधीच आदळून गेलेले असतात. मला कुठं जायचं आहे, नाही बाबा मला नेमकं माहीत असं गाणं गात फिरणारा हीरो त्यामुळेच अनेकदा आपल्याला भारी वाटत असतो.मात्र या गाण्यात एक जेन्डर रोलही आहे.‘बेटी हमारी बडा नाम करेगी’ असं एक तरी गाणं ऐकलंय का आपण? का नाही घडवलं जात असं गाणं? हीरोचं किती गुणगान ऐकायचं? मुलींनासुद्धा करिअर करणं, स्वतर्‍च्या पायावर उभं राहणं, स्वतर्‍च घर घेणं अशी टेन्शन्स असतातच. एरव्ही गाण्यातले असे जेन्डर आपल्याला जाणवायचे नाहीत. पण आता गाण्यांमधला हा असा जेन्डर रोल आता आपल्याला जाणवायला लागला आहे. हे मुद्दे किमान मनात येतात कुठेतरी, कोणाच्यातरी. साधीशी, छोटीशी का होईना दखल घेतली जाते त्यांची. मुलाचं शिक्षण आणि मुलीचं लग्न यासाठी पालकांनी पैसा गुंतवावा, असं म्हणणार्‍या जाहिरातीसुद्धा हळूहळू बदलत गेलेल्या दिसतात. मुलीचं शिक्षण, मुलीचं करिअर अग्रस्थानी आलेलं दिसतं. ते आता गाण्यांमधून, सिनेमांतून, जाहिरातीतूनही थोडंबहुत दिसू लागलं आहे. त्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला अवतीभवतीही आता दिसू लागलं आहे.बदल होताना दिसतोय. बेटी घर चालवतेय, घरातला कर्ता पुरुष आहे अशा आशयाच्या मालिकाही प्राइम टाइम मराठी चॅनलवर दिसू लागल्या आहेत. त्या स्वीकारल्या जात आहेत.आपण भवताली पाहिले तर अवतीभोवतीही असेच काही बदलते चेहरे दिसू लागले आहेत.  मुलीच कशाला आता मुलंही जेन्डरच्या उंचच उंच, भरभक्कम भिंतींना धडका देताना दिसतात.  जुनाट-पारंपरिक प्रतिमांना आपापल्या परीने वेगवेगळं काही ते ट्राय करत असतात. आवडलं तर बेस्ट, नाहीतर नेक्स्ट असा त्यांचा खाक्या असतो एकूण. नाही आवडलं, नाही पटलं, तर चला पुढे हा मंत्र प्रत्यक्ष पाळताना ते दिसतात. ती नुसतीच धरसोड वृत्ती नसते. त्यापलीकडे काहीतरी असतं. समजून-उमजून केलेलं. आपल्याला नक्की काय आवडतं, याचा शोध आणि जे आवडतं त्याचा मोकळेपणानं स्वीकारही केलेला दिसतो. दिल पे मत ले यार, असं सहजच स्वतर्‍ला सांगत पुढे जाणं असतं. आवडलं तर बेस्ट, नाहीतर नेक्स्ट ही या जनरेशनची खासियतच आहे.

ही नाहीतर ती वाट1. पेट्रोलपंपावर मुली गाडीत पेट्रोल भरायला नेमलेल्या दिसतात. ड्रायव्हर, कंडक्टर म्हणून तरुण मुली काम करताना दिसतात. वेगवेगळ्या टॅक्सी-रिक्षा सव्र्हिस क्षेत्रात बिनधास्त वाहन चालवताना दिसतात. 2. सिक्स पॅक अ‍ॅब्जवाल्या मुलांच्या बरोबरीने त्याही विविध सेवा उद्योगांमध्ये काम करत असतात. गरीब मुलींना शिकायला नाही जमलं, तर द्या शिलाई मशीन किंवा करा पापड-कुरडई बनवायचा उद्योग सुरू करा हे टिपिकल समीकरण आता मुलींनीच बदललं. आणि सुदैवानं त्यांना मदत करणार्‍या व्यक्ती-विचारांनीही.3. मुली कॉल सेंटर्समध्ये दिसतात, मॉल्समध्ये वेगवेगळ्या काउण्टरवर दिसतात. वेगवेगळ्या महागडय़ा ब्रॅण्डच्या गाडय़ांच्या शो रूममध्ये दिसतात. नोकरदार म्हणून कशाला काही ठिाकणी कंपनी मालक म्हणूनही दिसतात. बँकिंग आणि फायनान्समध्येसुद्धा दिसतात.4. केवळ मेंदी-रांगोळी काढणं आणि ब्यूटिपार्लर टाकणं या फिक्स जेन्डर रोल्सपलीकडे त्या काहीतरी करत असतात. त्यांच्या पायावर उभ्या होतात.5. तेच तरुण मुलांचंसुद्धा! तेही त्यांच्या फिक्स जेन्डर रोल्सपलीकडे जाऊन वेगवेगळी कामं करताना दिसतात. शेफ म्हणून नाव कमावताना दिसतात. रोज स्वतर्‍चा स्वयंपाक स्वतर्‍ करणारे, किचनमध्ये मस्त रेसिपी करून सोशल मीडियात बिनधास्त त्याविषयी चर्चा करणारे दिसतात.6. कपडे शिवणारा कुणी मास्तर किंवा परिस्थितीनं गांजलेली अबला नारी हे चित्र आता बदललं. मुलं-मुली दोघंही फॅशन डिझायनिंग करतात. बुटिक काढतात चकाचक. त्यांनी पुसून टाकलेत मुलींनी हेच करा नि मुलांनी तेच करा असे जेन्डर रोल. मुलंमुली ठरवून आता फॅशन डिझाईनर होतात.7. सगळ्यात मोठा बदल म्हणजे एका दिशेनं काही काळ चाललं तर त्याच मार्गावर नंतर कंटाळाही येतो, तो तसा कंटाळा आला तरी चालतच राहा याचं प्रेशर झुगारून देणारे लोक आताशा अनेकांना एकदम रोल मॉडेल वाटतात. काहीच जमत नाहीत म्हणून सतरा गोष्टी करतात असे टिपिकल शेरे आता निदान तरुण मुलं तरी मारत नाहीत.8. तरुण मुलामुलींचा आता एक सोपा मंत्र आहे, मी या दिशेने जाऊन बघतो, नाही आवडली वाट, तर दुसरी वाट धरतो.