कोवळ्या प्रेमाला नख लावणारी जात

By Admin | Updated: November 6, 2014 17:21 IST2014-11-06T17:21:52+5:302014-11-06T17:21:52+5:30

पर्दा नहीं जब कोई खुदा से, बंदो से पर्दा करना क्या. जब प्यार किया तो डरना क्या.?’

Being tickled with tender love | कोवळ्या प्रेमाला नख लावणारी जात

कोवळ्या प्रेमाला नख लावणारी जात

-ज्याच्या डोक्यावर मुघल साम्राज्याचे तख्त-ए-ताज अशा महाशक्तिशाली बादशहाच्या नजरेत नजर घालून बेडर होत कनीज अनारकलीनं कोणे एकेकाळी त्याला ठणकावलं होतं. 
असशील तू बादशहा, मी नाही घाबरत तुला जा, काय करायचं ते कर, माझं प्रेम आहे तुझ्या मुलावर आणि मी तुलाच काय जगात कुणालाही न भीता ते खुलेआम कबूल करतेय आणि म्हणतेय की, प्यार किया तो डरना क्या.? 
-सलीम-अनारकलीचा काळ ‘इतिहास’ बनून किती वर्षे लोटली? 
पण आजही आहेच ते जीवानिशी मरण? आपल्या जाती-धर्माहून वेगळ्या, श्रेष्ठ किंवा कनिष्ठ स्तरातल्या जोडीदाराशी नातं निर्माण करण्याची जुर्रत दाखवली म्हणून तेच भिंतीत गाडून घेणं?
 
आपल्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात, 
कुणाही संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकतील अशी तीन हत्त्याकांडं झाली.
उच्च वर्गातल्या- जातीतल्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून दलित तरुणांची हत्त्या !
ज्यांची हत्त्या झाली ते तरुण, 
ज्यांनी केली ते ही तरुणच.
प्रेम करण्याची शिक्षा काय?.. तर मरण!
 
आणि ज्यांच्या वाट्याला असं मरण येत नाही पण जीवंतपणी घुसमटत जगणं, 
मरत-मरत जगणं येतं, 
त्यांच्या तर बातम्याही छापून येत नाहीत वर्तमानपत्रात.!
त्यांची फरफट? घुसमट? संघर्ष? 
त्यांचे हाल?
 ते कुणालाच दिसत नाहीत!
अशा तरुण मनांचं काय होतं असेल?
कुठे कोण विचार करतं?
 
असे बरेच प्रश्न.
अनेक तिढे.
त्यांचीच चर्चा या अंकात
 पान ३ आणि पान ४+५ वर- 
सोनई, खर्डा, जवखेडा.आणि?
 
 मानेभोवती आवळत चाललेल्या
 जातीपातीच्या बंधनांनी घुसमटलेल्या 
तरुण जोडप्यांच्या असहाय्य कहाण्या!
.. आणि जातीच्या अभिमानासाठी 
खून पाडणारी क्रूर मानसिकता !
 
 
 
 
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com

 

Web Title: Being tickled with tender love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.