शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

सिंगल है तो क्या गम है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 4:35 PM

सिंगल असणं म्हणजे काही गुन्हा नव्हे. आजकाल तर कुणीही विचारतं, अजून सिंगल आहेस? नशीब आता बाजारपेठेनं तरी सिंगलपण साजरं करायला घेतलंय!

ठळक मुद्देनुकत्याच साजर्‍या झालेल्या सिंगल्स डेच्या निमित्तानं हा सिंगलदिल हाल!

- पवन जोशी

चिन्मय अरे, अजून तू सिंगल कसा काय? - ऑफिस कलीग भार्गवीनं विचारलंच.‘अगं सानिया तू कशी काय अजून  रिलेशनमध्ये नाहीस. तुला सिंगलच राहायला आवडतं का?’ कॉलेजमध्ये मित्र असलेला  विकास विचारतो.हे असे संवाद नेहमी आपल्या कानावर येतात. तेव्हा आपण सर्वापेक्षा वेगळे आहोत की सामन्याच आहोत हे काही कळत नाही. तू अजून सिंगल कसा/कशी हा प्रश्न चिन्मय किंवा सानिकाला विचार करायला लावणारा असतो. बुचकळ्यात पाडतो की, सगळ्यांचं जमलं. आपलं काय बिनसलं आहे. त्यात तुम्ही फक्त ‘सिंगल’ आहात म्हणून इतर लोकांच्या म्हणजे अगदी तरुण दोस्तांच्या नजरा  ‘बिचारा/बिचारी’ या दृष्टीनं पाहतात. जसं काही सिंगल असणं म्हणजे गुन्हा आहे?हे ‘सिंगल’ असणं इतकं का वाईट असतं?प्रेम व्यक्त करण्याचे व्हॅलेण्टाइन्स डे, चॉकलेट डे, रोझ डे हे दिवस असतात. ते जोडपी सेलिब्रेट करतात. त्यावेळी सिंगल बिचारे बाजूला होतात. म्हणून हा नवीन दिवस, सिंगल डे जरा हायसं करतो. बरेच जण सिंगल असतात जगात हे तरी त्यातून कळतं.  आपला ‘सिंगल’पणा अभिमानाने साजरा करण्यासाठीचा दिवस म्हणजे सिंगल डे. 11 नोव्हेंबर म्हणजे हा सिंगल डे, त्याला अ‍ॅण्टीव्हॅलेण्टाइन्स डे असंसुद्धा म्हणतात. चीनमध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला. या दिवशी सिंगल असणारे सगळे स्त्री-पुरुष एकत्र भेटतात. मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये मेजवान्या करतात. एकमेकांना भेटवस्तू देतात आणि ह्या दिवसाचा आनंद साजरा करतात. अगदी ऑनलाइन वस्तूंची विक्री करणार्‍या कंपन्यांचा कोटय़वधीचा खप या दिवशी होतो.11 तारीख आणि नोव्हेंबर हा अकरावा महिना म्हणजे चार वेळा 11.11 तारीख, दोन किंवा त्यापेक्षा अधिक जणं म्हणजे ग्रुप. असे चार जण जे सिंगल आहेत त्यांच्या सर्वाचा ग्रुप म्हणजे 11.11.तिकडं चीनमध्येच कशाला, आपल्याकडेही सिंगल्यांना बरंच वाटावं असा हा दिवस आहे. हल्ली कॉलेजमध्ये तर गलफ्रेण्ड/ बॉयफ्रेण्ड असणं जणू काही सक्तीचंच व्हायला लागलं आहे. ट्रेण्ड आहे, रिलेशनमध्ये असण्याचा ! रिलेशनमध्ये नसणं ही काही अबनॉर्मल गोष्ट आहे का हा प्रश्न सिंगल असणार्‍यांना नेहमीच वाटतो. पण रिलेशनमध्ये असणारे काहीजण त्रस्त होऊन सांगतात, बाबा नको ती झंझट. स्वतर्‍चा असा कोणताच वेळ  मिळत नाही. कारण पार्टनरबरोबर होणारे छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून वाद. इथे नको तिथे नको, ही चॉइस ती चॉइस, त्यात सोशल मीडिया या गोष्टी रोजच्याच असतात. या सगळ्यांचा कंटाळा येतो. स्वतंत्रपणे हवं तसं जगता येत नाही. स्वतर्‍ला हवी असणारी स्पेस कधी मिळत नाही. बरं आहे त्यापेक्षा सिंगल असणं. काही कटकट नाही.अर्थात सिंगल म्हणजे एकाकी नव्हे. बोअरिंग नव्हे. जगण्यात काहीच अर्थ नाही असंही नव्हे. उदास जगणं नव्हे.  कोणी ‘सिंगल बाय चॉइस’ असतो तर कुणाला खरंच आपलं प्रेम मिळत नाही. कुणी अंतमरुख असतो, कुणाला फक्त इंतजार असतो. पण मग प्रश्न येतो सिंगल असणार्‍यांनी एन्जॉय कसं करायचं. त्यालाच तर आता बाजारपेठ असे डेचे निमित्त पुरवते आहे. वेगवेगळ्या ठिकाणी भटकायला जाणं, त्या ठिकाणी हवं तितकं थांबणं. विविध ठिकाणच्या खाद्य संस्कृतीचा आनंद घेणं, जवळच्या मित्रांसह मनमुराद गप्पागोष्टी करत बसणं, आवडते नाटक/सिनेमे बघणं, सामाजिक कार्यात सहभागी होणं, वेगवेगळ्या कलांमध्ये रमणं, अशा गोष्टी करण्यात सिंगल मंडळी आपला आनंद शोधतात. या सगळ्यांसाठी कोणाच्या बंधनाची गरज नसते.एका वाक्यात जर सांगायचे असेल तर मुक्त आणि बिनधास्त जगण्याची तयारी ‘मंझील’च त्यांना सापडली असते. ती त्यांना फक्त वेगवेगळ्या मार्गानी गाठायची असते. म्हणून सिंगल असणं हे काही कोणते वेगळेपण नसून स्वच्छंदी मनाने जगण्याची अलग दुनिया आहे.हेमंत कुमारचं ‘सोलवाँ साल’ या सिनेमातलं गाणं बराच अर्थ सांगून जातं.है अपना दिल तो आवारा,न जाने किस पे आयेगा.