घरात बसा ऑनलाइन दिसा ! ऑनलाइन असण्याचा ताण छळतो आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 14:41 IST2020-07-02T14:37:24+5:302020-07-02T14:41:53+5:30

लॉकडाऊनच्या या काळात तुमचा ताण, मित्रमैत्रिणींशी भांडण वाढलं आहे का?

is being online stressful for you? | घरात बसा ऑनलाइन दिसा ! ऑनलाइन असण्याचा ताण छळतो आहे का?

घरात बसा ऑनलाइन दिसा ! ऑनलाइन असण्याचा ताण छळतो आहे का?

नितांत महाजन

लॉकडाऊन की अनलॉक? बाहेर जायला परवानगी आहे की नाही? जायचं तर केव्हा? कॉलेज तर बंदच. त्यामुळे यंदा कॉलेजात जाऊन कुणी मित्रमैत्रिणी भेटणंही शक्यच नाही. तो/ती स्पेशल भेटणंही अशक्यच. कुणाच्या घरीही जाता येत नाही.
कुठं बाहेर, चौकात, घराच्या खाली भेटावं तर तेही थोडाच वेळ, लांब लांब उभं राहून. घरचे बाहेर जाऊ नको म्हणतात. बाहेर गेलं आणि गप्पा मारत राहिलंच उभं तर पोलीसकाका रागवण्याचं भय.
एकूण काय दोस्तीत पार व्हिलन बनला आहे हा कोरोना. 
आता तीन महिने होऊन गेले, तेच सुरूआहे. घरात बसा आणि ऑनलाइन दिसा.
पण ऑनलाइन दिसलं की दिसलं की हल्ली भांडणंही सुरूहोत आहेत. ‘इज कोविड चेंजिंग अवर रिलेशनशिप’ याविषयावर अनेकजण अभ्यास करत आहेत. गुगलून पाहत आहेत. तोडगे शोधत आहेत.
काहीजणांचं तर म्हणणं आहे की अनेकांच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होत आहे.
आणि त्यातून आधीच ताणाचं झालेलं आयुष्य अधिकच तापाचं झालेलं आहे.
त्यामुळे ऑनलाइन असणं, दिसणं, बोलणं, न बोलणं, जास्त कमी बोलणं, सोशल मीडियातलं शेअरिंग, कमेण्ट, पोस्ट, फोटो, टाइमपास यातूनही काही तरुण जोडप्यांमध्ये मनमुटाव आणि गैरसमज होत आहेत. 
हा जास्तीचा ताण लॉकडाऊनच्या काळात कशामुळे वाढतो याची ही एक सोपी यादी.

1) अनेकजण तासन्तास ऑनलाइन असतात, गेम खेळतात, व्हॉट्सअॅप चॅट करतात; पण कुणाला फोन करायला त्यांना वेळ नसतो. खरं तर अनेकजण ते मुद्दाम टाळतात असं नाही; पण तेच ते फोनवर बोलून, एकाच एका माणसाशी बोलूनही काहींना बोअर व्हायला लागलेलं आहे. म्हणून ते फोनकॉल टाळतात, आवश्यक तेवढंच बोलतात. पण त्यामुळे बाकीच्यांचे त्यांच्याविषयी गैरसमज होऊ लागतात.
2) काहीजण फोनच उचलत नाहीत. ते बिझी असतात असं नाही; पण त्यांना बोलणंच बोअर झालं आहे, आणि ते शांतपणो त्यांचं काहीतरी करत असू शकतात असं बाकीच्यांना पटत नाही. कामच नाही तर ऑनलाइत तरी दिस असे आग्रह होतात, तेही काहींना कंटाळवाणो वाटू शकतात.
3) मोबाइल डेटा मारला की संपतो अशीही अनेकांची तक्रार आहे कारण काहीच काम नसल्याने बरेच जण फक्त डेटा जाळतात, आणि काहीबाही पाहत बसतात.
4) अनेकांचा असाही समज आहे की, सध्या जगभरात लोकांना वेळ आहे तर आपण फोन केला किंवा मेसेज केला तर तो बाकीच्यांनी त्वरित उचलायला हवा. फोन अॅन्सर होत नाही, हे काहींना ताणाचं कारण वाटतं आहे.
5) मुलींची विशेषत: अपेक्षा असते की जरा रोमॅण्टिक गप्पा त्यानं मारल्या तर बरं; पण त्याला काही सुचत नाही, तेव्हाही भांडण अटळ.
6) कॉल वेटिंगवर असणं, तो तासन्तास वेटिंगवर असणं हे अनेकांच्या भांडणाचं मूळ असू शकतं.
7) व्हॉट्सअॅपवरचा मॅसेज पाहिल्याच्या निळ्या खुणा दिसतात; पण रिप्लाय येत नाही, यानंही अनेकांचं डोकं फिरतं.
8) आपलं सगळं जगणं एका फोनशीच जोडून घेण्याचा त्रस आणि ताणही अनेकांना जाणवतो आहे. 

 

Web Title: is being online stressful for you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.