शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दाढी, बॉडी, गाडी- ‘चिकणं’ दिसण्याच्या मागे लागलेल्या हॅण्डसम पोरांची फेअर नसलेली गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 5:19 PM

दिसण्यावर पोसलेला पौरुषत्वाचा गंड पोरांच्या डोक्यात भरला जातोय. त्यावर मोठ्ठी बाजारपेठ उभी आहे. तरुण पोरंही क्रीम फासून आणि मुलतानी माती लावून गोरं व्हायच्या नि दाढी वाढवायच्या चक्रात अडकलेत.

ठळक मुद्देपोरीच नट्टापट्टा करतात आणि पोरांची काही नाटकं नसतात असा कुणाचा समज असेल तर तो ठार चुकीचा आहे.

- श्रेणीक नरदे

काही दिवसांपूर्वी फेअर अॅण्ड लव्हली या तोंडाला लावायच्या क्रीमच्या कंपनीने जाहीर केलं की, आम्ही आमच्या क्रीमच्या नावातून फेअर हा शब्द काढून टाकतोय.  आपल्यातील अनेकजणांनी कंपनीच्या निर्णयाचं मोठ्ठं स्वागत केलं. सदरची क्रीम लावल्यानंतर तोंडावरचं कातडं कितपत गोरं होतं याबद्दल त्वचाशास्नतले जे कुणी तज्ज्ञ असतील ते सांगू शकतील. पण मुख्य प्रश्न हा आहे की, आपण गोरंच का दिसलं पाहिजे? काळे, सावळे असलो तर आपण समाजात राहू शकत नाही का? फेअर अॅण्ड लव्हली क्रीम मुली-बायांसाठी होती तसंच इकडं गडय़ाबाप्पंय लोकांसाठी या फेअर अॅण्ड लव्हलीचा भाऊ फेअर अॅण्ड हॅण्डसम  पोरांची चामडी गोरी करायला सेवेत हजर आहे. गो:या कातडीचं अप्रूप मुलींर्पयत मर्यादित असतं तर या कंपनीने पुरुषांसाठी गोरं होण्याची क्र ीम तयार कशाला केली असती? गोरा रंग आणि दिसण्याचं अप्रूप आता पोरांनाही फार भारी वाटू लागलंय. शिनमातही हिरो असा गोराचिट्टा असतो, व्हिलन असतो तो काळाकुट्ट, त्यातलं विनोदी पात्न असतं ते बुटकं, किंवा तिरप्या डोळ्याचं हेच बहुतांश शिनमातून आपल्यावर थोपवलं गेलं. तरुणांच्यातही उंचीबद्दलचा न्यूनगंड असतो. मी बुटका का? किंवा वयाच्या पंचविशीत आल्यानंतर आपल्याला वाटतं अरारा आपण झाडाला लोंबकळायला हवं होतं, किंवा दोरउडय़ा मारायला हव्या होत्या. उंची वाढली नाही मग आपला जीव विनाकारण चुकचुकतो. उंचीनंतर बॉडी - सिक्स पॅक, भरदार छाती, बायसेप - ट्रायसेप दंडावर बेडकुळ्या उठलेल्या हव्या असा शर्ट टाइट फिट बसाय पायजे अशा अपेक्षा असतात. शिडशिडीत मुलगा असतो, त्यावर समाजाचा हा दबाव असतो, त्यालाही वाटतं आपणही शरीर कमवावं. मग ते जातं जिममध्ये, जिममध्ये तिथं ऑलरेडी बॉडी झालेले लोक असतात, ते याच्याकडे बघून हसतात. मग त्यातून याला सप्लिमेंट/प्रोटीन खायचा सल्ला देतात. हा ते प्रोटीन खातो आणि पुढे जाऊन काय म्हणून झक मारली आणि बॉडीबिल्डिंगच्या नादाला लागलो अशी वेळही येते.आज महिन्यासाठी 2 ते 5 हजार आकारणारे जिमही आहेत. तिथं येणारे हौशी किती आणि अप्रत्यक्ष समाजाच्या सौंदर्यदृष्टीच्या दबावाने आलेले किती असतात? याची सांख्यिकी अभ्यासली तर आश्चर्य वाटल्याहून राहत नाही. देशाचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्याबद्दल बहुतांश वाचायला, ऐकायला मिळायचं. तेव्हा पहिल्यांदा त्यांचा फोटो बघितल्यावर माझी घोर निराशा झाली होती. अब्दुल कलामांना सिक्स पॅक नव्हते, की डोळ्यात असे वांड भाव नव्हते. नशीब त्यावेळी टिकटॉक किंवा तत्सम अॅप्लिकेशनवरून अब्दुल कलामांचा व्हिडिओ एडिट करून त्यावर बाहुबली शिनमातील एखादं गाणं न बसवल्याने म्हणा  थोडी निराशाच झाली. एवढा अगिAबाण सोडणारा माणूस आणि डोळे अगदी गरीब गायीसारखे असं वाटलं होतं. पण त्याच माणसाने भला मोठ्ठा आत्मविश्वास या राष्ट्राला दिला. सांगायची गोष्ट एवढीच की, पराक्र म हा दिसण्यावर होत नाही तर असण्यावर होतो. पण अशी उदाहरणं थोडी. बाकी आपल्याकडे आनंद आहे.आपल्याकडे बनियनची जाहिरातही बघा, त्या त्या ठरावीक कंपनीचं बनियन घातलं की एवढी पॉवर येते की, आपण दहाएक जणांना लोळवू असा आत्मविश्वास येतो. गरीब बिचारी पोरं घालतात ते बनियन मग. शाळेत आम्हीसुद्धा एकमेकाला शर्टाची दोन बटणं काढून, कॉलर उचलून बनियन, शांडूचा ब्रॅण्ड दाखवून फुशारक्या मारत होतो.पूर्वी चकाचक रोज सकाळी उठून दाढी केलेला पुरुष चांगला देखणा समजला जायचा, आता तो ओघ बदलून दाढी राखण्याचा नवा ट्रेण्ड आलाय. आता दाढी सगळ्यालाच भरगच्च उगवेल असा भाग नाही. लोकं दाढी वाढवतात हे लक्षात आल्या आल्या लगेच दाढी वाढवायचं तेल बाजारात आलं. ते लावूनही दाढी उगतेच असं नाही. एखाद्याच्या दाढीत तुटाळ्या पडलेल्या असतात, असतो एखाद्याचा गाल नापीक पण तिथं तेल चोळल्यावर दाढी उगतेच हा विश्वास देणा:या कंपन्या आल्या आणि त्यांनी धंदा केला. गडय़ांनी घेतल्या तेलाच्या बाटल्या आणि बसले तेल चोळत. डोक्याचे केस गळू नयेत, पांढरे होऊ नयेत, टक्कल पडू नये अशा वेगवेगळ्या समस्येवर निरनिराळे शाम्पू, तेल, पावडरी, आयुर्वेदिक जडीबुटी अशा चिक्कार बाजारू पदार्थानी तरुणांचं विश्व व्यापलंय. एखादा बॉडीस्प्रे अंगावर फवारल्यावर त्या पोराच्या मागे ब:याच सुंदर अशा मुली येतात, हे बघून ब:याच जणांनी तो बॉडीस्प्रे आणला, फवारला परिणाम काय झाले?या सगळ्यात आपल्या मोबाइलमधील अॅप्लिकेशन हा अनेकांचा वरला रंग बदलून टाकण्यासाठी धावला आहे. आज सोशल मीडियात आपला डीपी किंवा प्रोफाइल पिक्चर अपलोड करण्यापूर्वी त्याला एवढी फिल्टरं लावून चकाचक केलं जातं की समोर ती व्यक्ती आली तर ओळखणं अवघड होऊन जातंय. त्यात एवढय़ा सोयीसुविधा असतात की कातडीचा रंग बदलता येतो, नाक नकटं असेल तर मोठं करता येतं, दाढी चिटकवता येते, मिशीला पिळ हाणता येतो, अशा अनेक करामतींनी आपण हिरो दिसू लागतो. (असं वाटतं !)ज्यादिवशी लोकांना कळेल की आपण टकले असण्याने काहीसुद्धा फरक पडत नाही, किंवा आपले केस पांढरे असल्यानेही काही फरक पडणार नाही, आपल्याला पूर्ण दाढी येत नसली तरी आपल्या गालाला छिद्र पडत नाहीत. समाजाने लादलेल्या सौंदर्याच्या परिमाणांना ज्यादिवशी लाथ बसेल तेव्हा या न्यूनगंडावर धंदा करणा:या कंपन्यांना टाळे ठोकण्यावाचून पर्याय राहणार नाही.पण ते होईल तेव्हा होईल.

आता मात्र तरुण पोरांनाही ‘दिसण्याचा’, गोरं होण्याचा सोस काही कमी नाही.पोरीच नट्टापट्टा करतात आणि  पोरांची काही नाटकं नसतात असा समज कुणाचा असेल तर तो ठार चुकीचा आहे. दाढी, बॉडी, गाडी अशा अनेक गोष्टींसाठी पौरुषत्वाचा न्यूनगंड पोरांच्या डोक्यात भरला जातोय. त्यावर मोठ्ठी बाजारपेठ उभी आहे. ती वाढतच जातेय.खरं तर संत चोखामेळा यांनी ‘ऊस डोंगा, परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा !’  हे कधीचं म्हणून ठेवलंय. पण या गोष्टी आता वाचनात येत नाहीत, किंवा वाचल्या तरी त्यायोगं वागणं होत नाही मग मुलतानी माती वगैरे फासून तरुण पोरंही गोरं व्हायच्या चक्रात अडकतात.ते महान कार्य आहे असं म्हणत राहतात..