बाप्पा मोरया

By Admin | Updated: August 29, 2014 10:14 IST2014-08-29T10:13:42+5:302014-08-29T10:14:01+5:30

समाजासाठी आपल्या प्रयत्नांची एक छोटीशी जुडी वाहणार्‍या तरुण हातांच्या खर्‍याखुर्‍या उत्सवाची गोष्ट

Bappa Moriah | बाप्पा मोरया

बाप्पा मोरया

>आज बाप्पांचं आगमन.नुस्ता जल्लोष.
कडक वाजणारा नाशिक ढोल आणि तडाडणारे ताशे.
डॉल्बीचा नुस्ता कल्लोळ, बाप्पाला कंटाळा येईस्तोवर
ऐकवली जाणारी आयटम सॉँग्ज, 
गणेश मंडळांच्या पण्डलात चालणारे तीन पत्ती आणि 
विसर्जनाच्या मिरवणुकीत नुस्ता धिंगाणा.     
कुणी सांगितलं  गणेशोत्सव म्हणजे एवढंच असतं?
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात असे काही कार्यकर्ते आहेत,
जे दहा दिवस रहायला आलेल्या बाप्पाला 
बरं वाटेल असं काम करताहेत.
राबताहेत.
नाचणार्‍या कार्यकर्त्यांत 
हे राबणारे हात आपण पाहिलेच नाहीत,
असं होऊ नये म्हणून हा खास अंक.
टक्क जाग्या गणेशोत्सवी कार्यकर्त्यांची 
मैफल जमवणारा.
या मैफलीत शामील होण्याची सद्बुद्धी 
बाप्पा आपल्या 
सगळ्यांना देवो.
बाप्पा मोरया.

Web Title: Bappa Moriah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.