बजाव - ऐका मनसोक्त गाणी
By Admin | Updated: February 5, 2015 18:32 IST2015-02-05T18:32:12+5:302015-02-05T18:32:12+5:30
आपल्या फोनचा बोलण्यापाठोपाठ सगळ्यात जास्त वापर कशासाठी होत असेल तर तो म्हणजे गाणी ऐकण्यासाठी ! मेमरी स्पेस वाया न घालवता,

बजाव - ऐका मनसोक्त गाणी
>अमृता दुर्वे -
आपल्या फोनचा बोलण्यापाठोपाठ सगळ्यात जास्त वापर कशासाठी होत असेल तर तो म्हणजे गाणी ऐकण्यासाठी ! मेमरी स्पेस वाया न घालवता, कधीही - केव्हाही - कुठलंही गाणं ऐकायचं असेल, तर ही काही अँप्स.
यू ट्यूब
व्हीडीओ तर पाहताच तुम्ही यू ट्यूबवर पण इथंच तुम्हाला गाण्यांचही भन्नाट कलेक्शन मिळू शकतं. अगदी जुनी, दुर्मिळ गाणीही यू ट्यूबवर सापडतात. अनेकांनी मेहनत घेऊन तयार केलेल्या प्ले लिस्टही तुम्हाला आयत्या मिळतील.
डाऊनलोड-गुगल प्ले
सावन
इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या गाण्यांची प्लेलिस्ट करू शकता. अगदी नव्या सिनेमांच्या गाण्यांपासून ते जुन्या हिट्सपर्यंत सगळी गाणी तुम्हाला इथे मिळतील. ट्रायल पिरीयडमध्ये गाणी फ्री डाऊनलोडही करता येतील. पण ही फ्री डाऊनलोड सेवा सुरू ठेवायची असेल तर नंतर मात्र तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील.
डाऊनलोड - -www.saavn.com/corporate/mobile
गाना
गाणं ऐकण्यासोबतच तुम्हाला त्याचे शब्द किंवा व्हीडीओ पहायचे असतील तर गानाचं अँप हवंच. काय स्पीडने गाणी स्ट्रीम करायची आहेत, तेही तुम्हाला ठरवता येतं. याच अँपवरून तुम्हाला ऑनलाईन रेडिओ स्ट्रीमिंगही ऐकता येईल.
डाऊनलोड- gaana.com