बाबांचा मोबाइल!
By Admin | Updated: October 1, 2015 17:51 IST2015-10-01T17:51:51+5:302015-10-01T17:51:51+5:30
बाबा घरी आले की काय होतं, हल्ली कुठल्याही घरात? मुलं पहिल्यांदा झडप घालतात

बाबांचा मोबाइल!
>बाबा घरी आले की
काय होतं, हल्ली कुठल्याही घरात?
मुलं पहिल्यांदा झडप घालतात
ती बाबांच्या मोबाइलवर!
- का?
व्हिडीओ गेम्स खेळण्यासाठी?
ब:याचदा ते खरंही असतं,
पण बाबांच्या याच मोबाइलमध्ये
व्हॉट्सअॅपवरून आलेल्या,
‘टाइमपास’ आणि फॉरवर्ड करण्यासाठी
जपून ठेवलेल्या ‘तसल्या’ क्लिप्सही असतात.
बाबा आल्यावर अनेक मुलं कोप:यात जाऊन
‘गप्प’ बसतात, यामागे हेही एक कारण आहे.
चौथीत जाणा:या सुमितला बाबा घरी आले की, त्यांच्या मोबाइलशी खेळायची सवय होती. नेहमीप्रमाणो बाबा घरी आल्यानंतर तो बाबांच्या गळ्यात पडला आणि त्यांचा मोबाइल घेऊन पसार झाला. बाबा जरा फ्रेश होऊन टीव्ही बघायला बसता न बसता तोच सुमित धावत आईपाशी गेला. जोराजोरात सांगू लागला.
‘आई हे बघ, बाबांच्या फोनमध्ये काय आहे?’ खिदीखिदी हसत तो सांगतो, ‘आई, ते बघ कसे करतायेत.’ आईला आधी सुमित कशाबद्दल बोलतोय हेच कळत नाही, म्हणून ती फोनमध्ये डोकावते तर बाबांच्या फोनवर एक सेक्स क्लिप चालू असते. आईला काय करावं काही समजत नाही. ती पटकन सुमितच्या हातातून मोबाइल काढून घेते. घाईघाईने क्लिप बंद करते आणि मोबाइल बाजूला ठेऊन देते. सुमितचं कुतूहल मात्न त्या एक-दोन मिनिटांत चांगलंच चाळवलं गेलेलं असतं. तो आपला आईच्या मागेच लागतो, ‘आई सांग ना, ते काय करत होते?’ आई डोळे मोठे करून ‘गप्प बस’ असं म्हणत त्याला दरडावते. सुमित थोडावेळ गप्प राहतो. मग पुन्हा आईपाशी येऊन विचारतो, ‘आई सगळी मोठी माणसं असंच करतात का?’ आई गोरीमोरी होते. काय सांगायचं काही कळत नाही. वैतागून ती सुमितला बाबांकडे पाठवून देते तर बाबा अधिकच गोंधळून आणि सुमितच्या प्रश्नांनी कावरेबावरे होऊन पुन्हा त्याला आईकडे पाठवून देतात.
सुमितला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, कुतूहल मात्न भलतंच वाढतं.
बाबांचा मोबाइल, ही अशी अनेक घरांमधली नाजूक गोष्ट बनत चालली आहे. व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल नेटवर्किग साइट्समुळे सतत माहितीची देवाणघेवाण होत असते. ही माहिती दरवेळी उपयुक्त असतेच असं नाही. टाइमपास, मेसेजेस, व्हिडीओ क्लिप्स, फोटो अशा असंख्य गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये दर मिनिटाला येऊन पडत असतात. त्यात अनेक सेक्स आणि एरॉटिक क्लिप्स आणि फोटो असतात. निरनिराळ्या सिनेमांतून किंवा सेलिब्रिटींचे लिक झालेले सेक्स व्हिडीओ आणि एमएमएस असतात. अनेकदा इच्छा असो नाहीतर नसो, असं सगळं फोनमध्ये येतच असतं. त्यातून आईपेक्षा बाबांच्या फोनमध्ये या सगळ्याचं प्रमाण अधिक असतं. बर, फोन हे इतकं उघडंवाघडं माध्यम आहे की, गॅलरी उघडली की सगळं समोर पडलेलंच असतं. कशावरही टॅप करा आणि बघायला सुरुवात करा. स्मार्टफोनच्या काळात जन्माला आलेल्या मुलांना हे फोन वापरण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही. ते जन्मत:च फोन कसा वापरतात, याचं प्रशिक्षण घेऊन आल्यासारखे धडाधड फोन वापरायला सुरुवात करतात. बाबानं पासवर्ड टाकला असेल तर तोही त्यांना क्रॅक करता येतो. काहीवेळा तर पालक कौतुक म्हणूनही मुलांना पासवर्ड सांगून ठेवतात.
मग बाबा घरी आले की त्यांचा फोन मुलांच्या ताब्यात आणि त्यांनी स्वत:च्या शारीरिक किंवा मानसिक गरजांसाठी डाउनलोड केलेले व्हिडीओ मुलांच्या समोर ओपन! अर्थात ब:याचदा असे व्हिडीओ इकडून तिकडून, व्हॉट्सअॅपवरून फॉरवर्ड केलेलेच असतात. काहीवेळा ते इतर ग्रुप्सला फॉरवर्ड करण्यासाठी, काहीवेळा ‘फुरसतीचा चाळा’ म्हणून तर काहीवेळा ‘करू नंतर डिलिट’ म्हणून तसेच राहून गेलेले असतात.
काहीजण क्लिप्स फार साचण्याआधीच जाणीवपूर्वक डिलिट करतातही; पण त्याचं प्रमाण तसं कमीच. त्यापेक्षा अशा क्लिप्स ‘स्वतंत्र’ फोल्डरमध्ये हलवण्याचा बाबामंडळींचा कल असतो.
पहिल्यांदा मुलांच्या हाती असलं काही लागतं ते ‘चुकून’, नेहमीप्रमाणो बाबांचा मोबाइल सर्फ करीत असताना. त्यावेळी त्यांच्यासाठी तो अगम्य धक्काच असतो, पण नंतर त्याचीही ‘सवय’ लागू शकते.
नेहमीच्या ठिकाणी फोटो, व्हिडीओज सापडले नाहीत तर ते फोनमध्ये इतरत्न शोधणं, कुठे असू शकतील, याचा अंदाज घेणं आणि ते हुडकून काढणं मुलांसाठी कठीण नसतंच. तेही मुलं करतात आणि त्यांना हवं ते चोरून बघत राहतात.
त्याहून मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मुलांनी हे सगळं बघितल्यानंतर त्यावर त्यांनी जर काही प्रश्न विचारले तर मुलांना त्याची समाधानकारक उत्तरं मिळतात का?
- बहुधा नाहीच.
जे सुमितच्या घरी झालं तेच बहुतेक ठिकाणी होतं. मुलांनी नाजूक-अवघड प्रश्न विचारले की, आई-बाबा अवघडून जातात. त्यांना शक्यतो अशा प्रश्नांची उत्तरं मुलांना द्यायची नसतात. त्यामुळे मग मुलांना गप्प करणं, दरडावणं किंवा त्यांच्या प्रश्नांकडे सरळ दुर्लक्ष केलं जातं. पालकांना वाटतं, मुलांच्या डोक्यातला विचार कालांतराने निघून जाईल. पण तसं कधीच होत नाही. उलट मुलांची उत्सुकता चौपट बळावते. ब:याचदा ‘असलं काही’ आई-बाबांना विचारायचं तरी कसं, या प्रश्नानंही त्यांना कानकोंडं केलेलं असतं आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसतातच. मग ते स्वत:च ‘अधिक माहिती’ गोळा करायला सुरुवात करतात. ‘पिवळी’ पुस्तकं वाच, जवळच्या मित्रंना विचार, त्यांना आपल्याइतकंच माहिती आहे की, त्यांच्याकडून अधिक काही ‘समजून’ घेता येईल, याची चाचपणी सुरू होते.
सांगोवांगी कळलेली ही सारीच माहिती ब:याचदा अतिरंजित, अशास्त्रीय आणि भविष्यातले गैरसमज पक्के करणारी असते.
बाबाचा मोबाइल आणि त्यातलं मुलांनी न बघण्याचे व्हिडीओ ही अत्यंत गंभीर समस्या आहे. प्रौढ व्यक्तीने पोर्नोग्राफी बघावी की बघू नये, हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा आणि आवडीचा भाग आहे, पण आपल्या वयात येणा:या मुलांर्पयत आपल्या माध्यमातून चुकीच्या वयात चुकीच्या गोष्टी पोचत असतील तर त्याबाबत पालक म्हणून जागरूक असलंच पाहिजे.
टीनएजच्याही आधी मुलांना बाबाच्या फोनमध्ये असलं काही बघायला मिळालं, मनात काही गैरसमज तयार झाले (ते होतातच), त्या कृत्याविषयीच मनात कायमची अढी बसली किंवा ‘कुतूहल’ फारच बळावलं तर टीनएजमध्ये निर्माण होणारं भिन्नलिंगी आकर्षण त्याला/तिला स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच ‘प्रयोग’ही सुरू होतात, ज्याचे गंभीर दुष्परिणाम मुलांना भोगायला लागू शकतात.
आपल्या टाइमपासचा, गरजांचा आपल्या मुलांवर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतो, हेही अनेकदा अनेक पालक लक्षातही घेत नाहीत.
स्मार्टफोन मिरवताना बाबाने इतपत तरी भान राखलंच पाहिजे !!
मुलं मोबाइलमध्ये का रमतात?
वयात येणा:या मुलांच्या हातात बाबांचा मोबाइल
आल्यावर ते काय काय करतात?
व्हिडीओ गेम्स खेळतात?
फोटो पाहतात?
घरगुती कार्यक्रमांचे व्हिडीओ बघतात
की, त्यातल्या सेक्स क्लिप्सनी भंजाळतात?
मुलांनी समजा विचारलंच त्याबद्दल,
तर किती घरांत ‘समर्पक’ उत्तरं मिळतात?
मुलांचं कुतूहल शमतं की गोंधळ उडतो?
बाबांच्या मोबाइलला पासवर्ड असतोच,
पण तो क्रॅक करणं मुलांना खरंच कठीण असतं?