शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

कुलूप-किल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 10:04 IST

हार्मोन्स पोस्टमनचं काम करतात, योग्य पत्त्यावर मेसेज पोहचला तर उत्तम. नाही तर सगळाच घोळ !

-डॉ. यशपाल गोगटे

आपल्या शरीरातील सर्व अवयव स्वतंत्रपणे आपापलं काम करत असतात. पण त्यांचं हे काम एकमेकांवरही बरंच अवलंबून असतं. माझं मी पाहून घेईन, तुझा काय संंबंध असा त्यांचा तोरा नसतो. आपलं कम्युनिकेशन कसंही असो त्यांचं कम्युनिकेशन, संदेशांची देवाणघेणात अर्थात परस्पर मेसेजिंग उत्तम असावं लागतं. हे मेसेजिंगचं, विविध अवयवांमध्ये संवाद साधायचं अर्थात संदेश वाहकाचं काम म्हणजे हार्मोन्स. एकप्रकारे हार्मोन्स ‘पोस्टमनचं’ काम करत असतात. थोडक्यात, हार्मोन्सवाला डाकिया डाक लाता है...आपलं शरीर सूक्ष्म पेशींनी तयार झालेलं आहे हे तर आपण शाळेत विज्ञानातही शिकलोय. प्रत्येक पेशीला दोन मुख्य भाग असतात बाह्य आवरण आणि केंद्रभागी असलेले न्यूक्लियस. हे पोस्टमन अर्थात हार्मोन्स पेशींवर बाह्य आवरणावर आणि न्यूक्लियसवर संदेश पोचवतात.त्यांचेही रासायनिक दृष्ट्या तीन मुख्य प्रकार असतात. अमिन्स, प्रथिनं आणि चरबी. यात अमिन्स आणि प्रथिनं जास्तकरून बाह्य आवरणावर संदेश वहनाचे काम करत असतात. चरबीयुक्त मुख्यत: स्टिरॉइड हार्मोन्स हे केंद्रभागी असलेल्या न्यूक्लियसवर कार्य करत असतात. आणि हे हार्मोन्स जिथे संदेश पोचवतात त्या भागाला ‘रिसेप्टर ’असे म्हणतात. पिनकोडच्या मदतीने पत्र जसं अचूक पत्त्यावर पोचतं तसे हे रिसेप्टरही हार्मोन्ससाठी पिनकोडचंच काम करतात.कुलूप किल्ली मॉडेलविशिष्ट हार्मोन्स पोचला की क्षणी पेशींच्या बाहेरील किंवा आतील विशिष्ट रिसेप्टर प्रतिसाद देतात. योग्य प्रतिसाद मिळाला की योग्य काम सुरु होतं. त्यामुळे त्या विशिष्ट अवयवाचंही काम अचूक सुरु राहतं. म्हणजे काय हे रिसेप्टर म्हणजे कुलुप, तिथं हार्मोन्सची चावी चपखल बसते.जसे चाव्यांचे प्रकार असतात. तसे या कुलुप रिसेप्टरचेही. कुठल्याही कुलुपाला कुठलीही चावी लागत नाही. तर या रिसेप्टरचे मुख्य दोन प्रकार म्हणजे अगोनीस्ट व अँटॅगॉनिस्ट. अगोनीस्ट रिसेप्टर हे हार्मोनच्या संपर्कात आल्यावर उद्युक्त होतात तर अँटॅगॉनिस्ट रिसेप्टर हार्मोनच्या संपर्कात आल्यानंतर निष्क्रि य होतात. शरीरातील चयापचयासाठी या दोन्हीही क्रि या आवश्यक असतात. कोणतं हार्मोन कोणतं काम करतं, हे चौकटीत दिलं आहेच.

आता हे कुलूपच बिघडलं किंवा चावीच बिघडली तर आपल्या शरीरात घोटाळे सुरु होतात. ते नेमके कसे होतात, याविषयी पुढच्या भागात..