शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सुजाण, जबाबदार नागरिक म्हणून आपण पास की नापास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 08:00 IST

देशासाठी आपण काय करतो? आपण आहोत का जबाबदार नागरिक? बजावतोय का, आपली राष्ट्रीय कर्तव्यं?

ठळक मुद्देसांगा, किती मार्क द्यायचे आपण आपल्याला?

- अनन्या भारद्वाज

उद्या ऑगस्ट क्रांतिदिन.चले जाव नारा दिला, तो हा दिवस. 9 ऑगस्ट. पुढच्याच गुरुवारी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन.हे सारे उल्लेख आले की, आपला अभिमान डोळ्यात पाणी म्हणून तरळतो. आपल्या देशाचा, आपल्या प्रगतीचा सार्थ अभिमान वाटतो. ते वाटणं चूक नाहीच, पण हे सारं करताना स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्यं चोख बजावतो का, याचाही जरा ताळमेळ कधीतरी मांडला पाहिजे.आपण व्यवस्थेला, सरकारला, नेत्यांना प्रश्न विचारतो, त्यांना म्हणतो की, सांगा, देशासाठी तुम्ही काय केलं?समजा, हा प्रश्न कुणी आपल्यालाच विचारला की, तुम्ही देशासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी करता. कसे वागता तर आपण काय उत्तर देऊ?देशभक्ती म्हणजे केवळ घोषणाबाजी नव्हे, तर कर्तव्यपूर्तीही आहे. अधिकारापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं, ते निरपेक्ष भावनेनंच आधी करायला हवं. ते आपण करतो का?जरा तपासून पाहू.1) सिग्नल पाळले जातात की तोडले जातात?2)ओव्हर स्पीडिंग होतं की नाही?3) रस्त्यात, टर्नवर गाडी थांबवून फोनवर बोलतो की नाही?4) गाडी चालवताना फोनवर बोलतो की नाही?5) रांगांची शिस्त पाळतो का?6) रस्त्यात पचापचा थुंकतो का?7) रस्त्यात कचरा टाकतो का?8) बस, ट्रेन इथं कचरा टाकतो का?9) गड-किल्यांवर जाऊन काहीबाही खरडतो का?10) सामाजिक शिस्त पाळतो का?11) अपघात झाला तर शूट करतो की जखमीला मदत करतो?12) सर्वत्र नियम पाळतो की मी तमक्याचा ढमका म्हणून ओळखी सांगतो?13) वेळेवर सगळी बिलं भरतो का?-अशी यादी कितीही मोठी करता येईल. आपण आपल्या देशावर प्रेम करतो तर या देशातले कायदे पाळणं, ते निभावणं ही आपली जबाबदारी नाही का? ते आपलं राष्ट्रप्रेम नाही का?आपण आपलं राष्ट्रप्रेम कशात मोजणार? कसं दाखवणार? की निव्वळ घोषणा देणार? निव्वळ नारेबाजी करून पोकळ आवेश दाखवणार?हे प्रश्न आपणच स्वतर्‍ला विचारले पाहिजे, जय हिंद म्हणताना मी उत्तम नागरिक बनेल म्हणून काय काय केलं हे सांगता आलं पाहिजे.विचारा स्वतर्‍ला, आपण एक उत्तम नागरिक म्हणून स्वतर्‍ला दहा पैकी किती मार्क द्याल? आणि ते कमी असतील गुण तर कसं बदलणार स्वतर्‍ला.आजपासूनच!

( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)