खरंच आपण सोशल आहोत?
By Admin | Updated: September 11, 2014 17:21 IST2014-09-11T17:21:47+5:302014-09-11T17:21:47+5:30
हाय फ्रेण्डस. जरा शांत शांत वाटतंय ना, दहा दिवस चाललेला कल्लोळ संपला

खरंच आपण सोशल आहोत?
>हाय फ्रेण्डस. जरा शांत शांत वाटतंय ना, दहा दिवस चाललेला कल्लोळ संपला, डीजे थंडावले.
आता पंधरा दिवस कानांना विश्रांती, मग आहेच पुन्हा दांडियाचा जल्लोष!
ह्या जल्लोषाच्या धामधुमीत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच, आपण सगळ्यांनीच आपल्या घरच्या डेकोरेशनपासून ते मोदकांपर्यंत आणि गणपतीसह स्वत:च्या फोटोपासून ते मिरवणूकीत नाचण्यापर्यंत सगळे फोटो काढकाढून आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअँपवर टाकले, फेसबूकवर पोस्ट केले.
लाईक-कमेण्टांचा नुस्ता पाऊस पडला. स्वत:चं कौतूक करुन घेण्यासाठी अनेकजणांनी सोशल मीडीयाचा पुरेपूर वापर करुन घेतला.
पण हे करताना तुमच्या एक गोष्ट कदाचित लक्षातही आली नसेल की, सोशल मीडीया ही सोशल शेअरिंगची गोष्ट आहे, पर्सनल शेअरिंगची नाही! म्हणजे काय तर, आपल्याला जाहीरपणे जे लिहावं, बोलावंसं वाटतं त्याच्यासाठी असतो हा सोशल मीडीया. मला सर्दी झालीये आणि मी पावसात भजी खातोय हे सारं सांगत बसायला नाही. कुणी म्हणेल का नाही?
आम्हाला वाटलं ते आम्ही करू, आमचा हक्कच आहे.
आता ही अशी हक्कांची भाषा असेल तर पुढे काय बोलणार?
पण ज्यांना वाटतं की, ही माध्यमं ‘सोशल’ आहेत, ‘मी-मला ’ अशी स्वत:चीच आरती गाणारी चर्चा न करता काहीतरी सामाजिक उपक्रम इथे प्लॅन करता येऊ शकतो, समविचारी माणसं एकत्र येऊ शकतात, सामाजिक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. आपल्या मतापेक्षा वेगळी मतं, वेगळ्या बाजू, वेगळ्या पद्धतीची मांडणी समजू शकते. पण हे सारं केव्हा होऊ शकतं?
जेव्हा आपण सोशल मीडीयाचा वापर योग्य पद्धतीने करायला शिकू तेव्हा.
पण तो कसा करायचा?
मुळात सोशल मीडीया वापराचाच विचार कसा करायचा. हेच सांगणारी एक विशेष चर्चा या अंकात.
आपण जर एकाचवेळी अनेक माणसांशी शेअर करु शकतो, कनेक्ट होऊ शकतो.
तर ते जास्त अर्थपूर्ण, अधिक आनंददायी कसं होईल. ह्याच विषयावरचा संवाद आजच्या अंकात.
वाचून नक्की कळवा.
काय वाटलं तुम्हाला?
पटलं की? आहेत काही वादाचे मुद्दे.?