आपण मोबाइल अ‍ॅडिक्ट आहोत हे कसं ओळखाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 08:00 IST2019-04-04T08:00:00+5:302019-04-04T08:00:04+5:30

आपल्याला मोबाइलचं व्यसन लागलेलं आहे का?  विचारा हे प्रश्न स्वतःला

Are you Mobile addict? | आपण मोबाइल अ‍ॅडिक्ट आहोत हे कसं ओळखाल?

आपण मोबाइल अ‍ॅडिक्ट आहोत हे कसं ओळखाल?

ठळक मुद्दे या सर्वाची उत्तरं हो असतील तर आपल्याला हे व्यसन लागलं आहे, 

 

मुळात आपण मोबाइल अति वापरतो आहोत, आपल्याला मोबाइलच्या अतिवापराचा आजार झालाय, हेच कोणी मान्य करत नाही. त्यामुळे त्यावर उपचार मिळायलाही बराच उशीर होतो. मात्र तरीही काही गोष्टी तपासून पाहिल्या तर हे कळू शकेल की, आपल्याला मोबाइलचं व्यसन लागलेलं आहे का? 
विचारा हे प्रश्न स्वतर्‍ला.
1. आपण क्षणभरही मोबाइलशिवाय राहू शकत नाही का?
2.  मोबाइल रेंज नसेल तर अस्वस्थता वाढते का? 
3. मोबाइलवर इंटरनेट नसेल तर जगाशी संपर्क तुटल्यासारखं वाटतं का?
4. आपण सकाळी उठल्या उठल्या, रात्री जाग आली तर झोपेतही मोबाइल तपासतो का?
5. आपण कुठेही गेलं की पहिल्यांदा फोटो काढून तो अपलोड करतो का?
6. सोशल मीडियावर आपण टाकलेल्या पोस्टवर कमेण्ट नाही आल्या तर मूड ऑफ होतो का? 
7. बॅटरी चार्ज नसेल तर आपली चिडचिड होते का?
8. मोबाइलवर भरपूर चॅटिंग पण फोनवरही बोलणं किंवा प्रत्यक्ष भेट आणि बोलणं आपल्याला नकोसं होतं का?
 या सर्वाची उत्तरं हो असतील तर आपल्याला हे व्यसन लागलं आहे, 
हे समजा. त्यातून बाहेर पडायला हवं, हे स्वतर्‍ला समजवा.

Web Title: Are you Mobile addict?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.