समर इण्टर्न आहात का?

By Admin | Updated: April 30, 2015 17:01 IST2015-04-30T17:01:15+5:302015-04-30T17:01:15+5:30

ज्याला चणचण, जो गरीब त्यानं सुटीत नोकरी करायची हा समजच आता मोडीत निघालाय! ज्याला विदेशात जायचंय, सीव्ही तगडा करायचाय, नोकरीसाठी विदेशी अप्लाय करायचंय, त्यासा-यांसाठीही आता एक प्रश्न महत्त्वाचा आहे..

Are Summer Instructions? | समर इण्टर्न आहात का?

समर इण्टर्न आहात का?

>चांगली नोकरी, विदेशात डिग्री हवीये? आधी उन्हाळ्यात काम करा!
 
आमच्याकडे करिअर कौन्सिलिंग करणा:या, अॅप्टिटय़ूड टेस्ट करणा:या आणि दहावी-बारावी किंवा ग्रॅज्युएशनची परीक्षा देऊन मोकळ्या झालेल्या अनेक मुलांचा कायम एकच प्रश्न असतो..
आता या सुट्टीत आम्ही करायचं काय?
त्यावर हल्ली आम्ही एकच उत्तर देतो, घरी बसू नका. कुठंतरी समर एण्ट्रन्सशिप करा. काम शोधा. नोकरीची गरज आहे म्हणून नव्हे, तर मेंदूला चालना देण्याची गरज आहे, म्हणून!
त्यावर पालक लगेच प्रश्नांची तलवार काढतात. त्यांचे तीन फार महत्त्वाचे प्रश्न असतात.
त्यांना वाटतं, शिक्षण सुरू असताना आपल्या मुलांनी काम करण्याची गरज नाही. इतकी काही आपली परिस्थिती वाईट नाही आणि मुख्य म्हणजे त्यांच्या अभ्यासावर वाईट परिणाम होईल!
समर जॉबविषयी 
तीन मुख्य गैरसमज
1) असा समर जॉब करायचा आणि या मुलांचा अभ्यासावरचा फोकसच हरवला तर?
2) एकदा कामाची, त्या वातावरणाची चटक लागली, दोन पैसे खिशात आले की, मग पुन्हा अभ्यासाकडे ते वळणारच नाही. आहे तेच गिरवत बसतील? मग मागे नाही का पडणार?
3) सगळ्यात महत्त्वाचं, हेच आता आपलं काम म्हणत किंवा ती कंपनी आवडली म्हणून लगेच त्या कंपनीतच चिकटले तर संपलंच करिअर! पुढे ग्रोथ शून्य!
फोकस असेल तर हलेल कसा?
हातात पैसा खुळखुळला की, शिक्षण नको होतं, हा अनुभव सार्वत्रिक असला तरी मुळातच फक्त पैशांसाठी समर जॉब करायचा हे सूत्रच चुकीचं आहे. समर जॉब खरंतर हल्ली त्याला समर इण्टर्नशिप असंच म्हणतात. हे जॉब म्हणजे स्पर्धेच्या नव्या, कार्पोरेट जगात स्वत:चे पर्सनल आणि प्रोफेशनल स्किल घासून-पुसून साफ करायचे आणि शस्त्रसज्ज होण्याचे नवे तंत्र आहे. 
त्यामुळे तुम्हाला पैशांची गरज असो-नसो, सुट्टीत घरी बसण्यापेक्षा कुठंतरी काम कराच. 
ऑप्शन हजार,
डिसिजन एक
आता पूर्वीसारखं उरलेलं नाही की, एकच गोष्ट ठरवायची त्यातच करिअर करायचं. हजारो संधी आहेत, ऑप्शन्स आहेत.
चार गोष्टी एकदम आवडू शकतात. त्यातून नेमकं करिअर कशात करायचं हे कळत नाही. 
त्यासाठीत निदान जे फिल्ड आपल्याला सगळ्यात जास्त आवडतं त्या क्षेत्रत काम करून पाहणं उत्तम. ज्या कन्सेप्ट वर्गात शिकलो, त्या वापरून पाहणं उत्तम. 
तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की, आपल्याला नक्की कुठल्या विषयात काम करायला आवडेल!
पर्सनॅलिटी डेव्हल्पमेण्टचा 
कोर्स कराच..
अनेक तरुण मुलं-मुली सुट्टीत पर्सनॅलिटी डेव्हल्पमेण्टचा कोर्स करायचं ठरवतात. आम्ही तर म्हणतो, समर इण्टर्नशिप करा. 
आत्मविश्वास हवा असेल, बोलायला शिकायचं असेल, चारचौघांत तोंड उघडायचं असेल, ड्रेसिंग सेन्स शिकायचा असेल, हे सारं फुकट मिळतं. 
चुकांची किंमत कळतेच !
एरव्ही आपण चूक करतो, फार तर सॉरी म्हणतो. प्रोफेशनल जगात गेलं की कळतं बॉसच्या सूचनांप्रमाणो काम कसं करायचं, आपला वेगळा मुद्दा असेल, तर कसा मांडायचा, चुकलं, अपमान झाला तर सहन कसं करायचं. हे सारं एरव्ही कुणी शिकवत नाही; पण समर जॉब हे सारं शिकवतात आणि मग कळतं की, चुका करून आपण नक्की काय शिकलो !
परदेशात जायचंय? समर इण्टर्न आहात का?
ज्याची चणचण तो उन्हाळ्यात नोकरी करणार हे एकेकाळचं गणित विसरा. आता नव्या काळात हे चित्रच बदलतं आहे. तुम्हाला विदेशी विद्यापीठात जायचं असेल, विदेशात नोकरीसाठी अर्ज करायचा असेल.
तर त्यात ते विचारतात की, समर इण्टर्न म्हणून काय अनुभव आहे!
काही विदेशी विद्यापीठं तर समर इण्टर्नशिप करणा:या विद्याथ्र्याना क्रेडिट सिस्टिममध्ये एडव्हाण्टेजही देतात. ते गृहीत धरतात की, कॉलेजच्या चार भिंतींबाहेर पडून या विद्याथ्र्यानं काही नाव कमावलं आहे.
त्यामुळे तुमची पत तयार करायची असेल, तुमचा सीव्ही वेगळा दिसायला हवा असेल, तर समर जॉबचा चान्स गमावू नका.
- मुग्धा बर्वे
कन्सलटिंग सायकॉलॉजिस्ट
 
समर जॉबला जाताना हमखास होणा-या चुका 
समर जॉब खूप महत्त्वाचे आहेत, हे खरं; पण अनेक मुलं ज्या चुका हमखास करतात आणि मग इतरांना सांगतात की, माझा अनुभव फार फ्रस्ट्रेटिंग होता. फारच डिसअपॉइण्टिंग होतं सारं. त्या व्यवसायातलं लोकच खास नाही, मी लाइनच चेंज करीन, असंही सांगतात.
पण हे सारं घडतं किंवा अनेकजण असा गैरसमज करून घेतात, कारण चुकतं बरेचदा त्यांचं. चुकीचा दृष्टिकोन घेऊन ते इण्टर्नशिप करायला जातात आणि मग पस्तावतात. तसं होऊ नये म्हणून या काही हमखास होणा:या चुका टाळता येतील का पहा..
1) मी अमुकच शिकणार..
अनेक मुलं असं ठरवून जातात की मी इण्टर्नशिप करणार, समर जॉब करणार, कारण मला अमुकच शिकायचं आहे आणि ते शिकायला मिळालं नाही तर ते चिडतात. एकदा आपण इण्टर्न म्हणून गेलो की, जे जेवढं मिळेल तेवढं शिकायला हवं. मुळात आपण सारंच शिकायला हवं हे लक्षात ठेवायला हवं. पण अनेकांना वाटतं बाकी विषयांशी माझा काही संबंध नाही, मी जे म्हणतोय ते सांगा. मला एकच एक काम सांगा, मी तेच करीन! 
पहिली पायरी चुकते ती इथेच..
2) हे काम मी का करू?
अनेकदा समर जॉब करणा:या इण्टर्नला अनेक लहान-मोठी कामं सांगितली जातात. अगदी पेपरच्या फाइल करण्यापासून ते रिपोर्ट लिहिण्यार्पयत, कम्प्युटरवर एण्ट्री करणं, कात्रणं काढणं, असं काहीही!
ती कामं रटाळ असतात. अनेकदा उत्साहानं कामाला येणा:यांना ती अपमानास्पद वाटतात, बोअर होतात, म्हणून काम सोडायचं नाही. 
समजायचं की हा सराव आहे, मॅचनंतर आधी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसला कसेही चेंडू आले तरी खेळून पहायचे..
3) इगो फार मोठा.. गॉसिपला नाही तोटा!
काहीजणांचा इगो खूप मोठा असतो. त्यांना राग येतो. मुली रडायलाच लागतात. काही काम सांगितलं की, अनेकांचा इगो दुखावतो. आपण फार जास्त शिकलेलो आहोत, असं त्यांना वाटतं. त्यात काहीजणांना गॉसिपिंगचा नाद. सतत कुचाळक्या. या वाईट सवयी समर जॉबमध्ये त्यांना काहीच शिकायला मिळत नाही.
4) ऐकून घ्यायची तयारीच नाही..
आपण नवीन काम शिकतो, आपल्या चुका होणार, इथे काम करणा:या माणसांना आपल्यापेक्षा जास्त कळतं हेच अनेकांना मान्य नसतं. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा कुणी फिडबॅक दिला, सुधारणा सांगितली की, ते चिडतात, रडतात. उद्धटपणा करतात.
असं वागलं की समर जॉब करण्याचा हेतूच आपण निष्फळ ठरवतो!
- अनुराधा प्रभूदेसाई दिशा कौन्सिलिंग सेण्टर

Web Title: Are Summer Instructions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.