शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

अनुष्का शर्मासारखं परफेक्ट लेअरिंग ट्राय करायचंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 16:07 IST

लेअरिंग ही एक कला आहे. एरव्ही आपल्याकडे लेअरिंगला स्कोप नाही; पण थंडीत मात्र ती स्टायलिश हौस भागू शकते. ट्राय इट!

ठळक मुद्देटी-शर्टवर शर्ट, शर्टावर स्वेटर -थंडीतला खास ट्रेण्ड

- निकिता महाजन

थंडी आली की स्वेटर बाहेर निघतात. स्कार्फ, बिनबाह्यांचे स्वेटर, कानटोप्या असं सगळं आपण घालतो; पण ते घालताना सहसा आळशी विचार काय असतो की, आतून कसेही शर्ट घातले तरी काय फरक पडतो? कुणाला कळतंय.नव्या ‘लेअरिंग’ स्टाइलमध्ये मात्र या आळशी सुस्त विचारांनाच कालबाह्य ठरविण्यात आलं आहे. आणि एरव्ही जी काय स्टायलिश असण्याची आणि फॅशनेबल दिसण्याची हौस करून घ्यायची ती थंडीत लेअरिंग नामक कलेचा हात धरून करून घ्यायची. अनुष्का शर्माने  केलेलं  परफेक्ट  लेअरिंग  सध्या  हिट  आहे . तिला  कॉपी  करायचं  म्हणून  नाही,  तर  थंडीत  लेअरिंग  मस्त  करता  येतेच. खरंय हे, लेअरिंग इज अ‍ॅन आर्ट असंच म्हणतात. तसा लेअरिंग म्हणजे एकावर एक कपडे घालणं हा पश्चिमी प्रकार, कारण त्यांच्याकडे थंडी जास्त असते. आपल्याकडे सर्रास लेअरिंग करत एकावर एक कपडे चढवले तर घामानं आणि उकाडय़ानं जीव जायचा.त्यात अजून एक गोष्ट असते की, अनेकांना वाटतं आपण गुटगुटीत, वजनदार. आपल्याला लेअरिंग काही चांगलं दिसणार नाही. प्रत्यक्षात हादेखील गैरसमजच. कारण स्टायलिश लेअरिंग केलं तर ते सगळ्यांनाच चांगलं दिसतं.सगळ्यात मोठा फायदा तरुण मुलांना. लेअरिंग ही कलाच जेंडरलेस आहे. म्हणजे एरव्ही सगळ्या फॅशन तरुण मुलींच्या वाटय़ाला येतात. लेअरिंग मात्र तरुण मुलांनीही करावं आणि मस्त स्टायलिश दिसावं असं सहज सोपं आहे.त्यामुळे थंडीत फुकटात स्टायलिश दिसण्याची संधी काही सोडू नका. फुकटात यासाठी की सगळे कपडे आपल्याकडे घरात असतातच, दुकान पहायची गरज नाही. बिंधास्त वापरा. आणि थंडीत हॉट दिसा, विथ कूल स्टाइल!लेअरिंग कसं करायचं यासाठी या काही टिप्स. आधी म्हटलं तसं, या सहज करता येणार्‍या स्टाइल टिप्स मुलगे-मुली दोघांसाठीही आहेत. एकदम कडक!!

1. लेअरिंग करताना जमल्यास रंगसंगती लक्षात घ्यावी म्हणजे आतून फिक्कट रंगाचे कपडे असतील तर बाहेरून डार्क किंवा त्याउलट हे सूत्र लक्षात ठेवायचं. मग सगळं छान दिसतं, फक्त एकाच कलरचं लेअरिंग कॅरी करायला कॉन्फिडन्स लागतो, तो असेल तर ते ही ट्राय करून पाहावं.2. आतून एक लांब बाह्यांचा टी-शर्ट आणि त्यावर लांब बाह्यांचं शर्ट स्टाइल स्वेटर हा सोपा आणि हिट मामला आहे. स्वेटरची बाही वर आणि शर्टाची बाही मनगटार्पयत असं कॉम्बिनेशन उत्तम.3. स्वेटर आणि कॉलरचा फॉर्मल शर्ट हे कॉम्बिनेशन तर फॉर्मल म्हणूनही खपू शकतं.4. ओव्हरसाइज स्वेटर, ढगळे स्वेटर, घरातल्यांचे स्वेटरही बिंधास्त लेअरिंग म्हणून वापरता येतात.5. कुठलंही जॅकेट उत्तमच, पण यंग आणि स्टायलिश दिसायचं तर डेनिम जॅकेट घालावं, बाहीचं, बिनबाहीचं दोन्ही चालतं.6. आतून शर्ट किंवा टी-शर्ट त्यावर लॉँग ओव्हरकोट, लॉँग स्वेटर घालायचं, या स्वेटरची बटणं लावायची नाहीत.7. खूपच थंडी पडेल तेव्हा आतून टी-शर्ट, त्यावर स्वेटर, त्यावर ओपन जॅकेट हे प्रकरण भारी दिसतं.8. शर्ट त्यावर बिनबाह्याचं जॅकेट त्यावर लांब स्वेटर किंवा जॅकेट हा लेअरिंगचा प्रकारही हॉट आहे.9. या सगळ्यात स्कार्फ, मफलर हे नेटवर पाहून स्टायलिश गुंफले तरी भारीच काम.10. तरुण मुलांना फ्लोरल शर्ट ट्राय करून पहायचे तर हा सोपा पर्याय, आतून शर्ट असल्यानं कॉन्फिडन्स वाढेर्पयत फुलाफुलांचे शर्ट असे लेअरिंगच्या निमित्तानं घालून घ्यावेत.