प्राण्यांसाठी अलर्ट सिस्टिम
By Admin | Updated: January 7, 2016 22:04 IST2016-01-07T22:04:28+5:302016-01-07T22:04:28+5:30
दिवाला गाण्याची आवड आहे आणि पाळीव प्राण्यांचीही. रस्त्यावर जखमी, आजारी पाळीव प्राणी दिसतात, तेव्हा तिला नेहमी वाटतं की यांना उपचार

प्राण्यांसाठी अलर्ट सिस्टिम
>दिवा शर्मा
इयत्ता बारावी, नवी दिल्ली
दिवाला गाण्याची आवड आहे आणि पाळीव प्राण्यांचीही. रस्त्यावर जखमी, आजारी पाळीव प्राणी दिसतात, तेव्हा तिला नेहमी वाटतं की यांना उपचार मिळाले तर? याच प्रश्नातून तिनं एक अॅप बनवलं. पाळीव प्राण्यांच्या शरीराला सेन्सर्स लावून ठेवले तर त्यानुरूप हे अॅप त्या प्राण्याच्या तब्येतीची बारीकसारीक माहिती रेकॉर्ड करत राहील आणि एखादी इमर्जन्सी आलीच तर डॉक्टरांना तत्काल माहिती देईन. कुठल्याही स्मार्टफोनवर हे अॅप डाऊनलोड करता येईल आणि आपण कुठंही असलो तरी आपल्या प्राण्यांची काळजी घेता येईल, असं तिचं मत आहे.
दिवा म्हणते, ‘अनेकदा घरातली सगळी माणसं बाहेर आणि पाळीव प्राणी दिवसभर घरी एकटेच असतात. अशावेळी आपल्या प्राण्यांची काळजी या अॅपद्वारे घेता येईल.’