शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

क्वालकॉम प्रोसेसरवर हॅकर्सचा हल्ला- संशोधकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 4:59 PM

अॅण्ड्रॉइड फोन्समध्ये वापरलं जाणारं क्वालकॉम प्रोसेसर. त्यात त्रुटी असून, हॅकर्स ते सहजी हॅक करण्याची शक्यता आहे, असं सुरक्षा तंत्रज्ञ सांगतात.

ठळक मुद्देप्रोसेसरवर हॅकर्सचा हल्ला

सध्या हॅकिंगच्या घटना देशभर वाढत आहेत. त्यातून कायदा आणि सुरक्षा यंत्रणाही चिंतेत पडलेल्या आहेत. हॅकर्स सतत वेगवेगळ्या युक्त्या लढवून लोकांना लुबाडण्याचे नवेनवे मार्ग शोधत आहेत. या हॅकर्सबरोबर लढाईसाठी आपल्या विविध सरकारी यंत्रणा सतत सज्ज असतातच; पण जगभरातील सायबर तज्ज्ञदेखील सतत या हॅकर्सच्या युक्त्या शोधणो, त्या उघड सांगणं, लोकांच्या विविध उपकरणातील त्रुटी शोधणं आणि त्यावरचे उपाय सुचवणं यासाठी प्रयत्नशील असतात.अशीच एक सायबर सुरक्षा संस्था असलेल्या ‘चेक पॉइंट’ या संस्थेतील संशोधकांनी नुकतेच क्वालकॉम प्रोसेसरवरती संशोधन केले आहे. जगातील 40 टक्क्यापेक्षा जास्त अॅण्ड्रॉइड उपकरणं या प्रोसेसरवरती चालतात. इतक्या महत्त्वाच्या आणि लोकप्रिय असलेल्या या क्वालकॉम प्रोसेसरमध्ये संशोधकांना 400 क्षा जास्त उणीवा आणि त्रुटी सापडलेल्या आहेत. या प्रोसेसरमध्ये असलेल्या सुरक्षाव्यवस्थेला आरामात गंडा घालून हॅकर्स कुणाचाही फोन सहज हॅक करू शकतात, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.क्वालकॉम प्रोसेसरमध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा उचलण्यासाठी विशेष प्रकारची अॅप्लिकेशन बनवून हे हॅकर्स लोकांच्या मोबाइलवर सहजपणो ताबा मिळवू शकत असल्याची भीतीदेखील शास्रज्ञांनी व्यक्त केली आहे.हा क्वालकॉम प्रोसेसर म्हणजे हॅकर्सला त्या फोनमध्ये शिरण्याचे प्रवेशद्वारच आहे अशी चिंता हे संशोधक व्यक्त करत आहेत.डिजिटल सिग्नल प्रोसेसर याप्रकारात मोडणारे हे क्वालकॉम प्रोसेसर म्हणजे जणू एका चिपमध्ये संपूर्ण संगणकच सामावलेला आहे, असे म्हणायला हरकत नाही. याच प्रोसेसरच्या मदतीने फोन उत्पादक कंपन्या ग्राहकांना त्यांच्या फोनमध्ये क्विक चार्जिग आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी सारखी फीचर्स उपलब्ध करून देतात. 

मात्र इतक्या महत्त्वाचा असलेला हा प्रोसेसरच आता संशयाच्या घे:यात सापडला आहे. याप्रोसेसर मधल्या सुरक्षा त्रुटींचा फायदा घेत, एकदा का हॅकरने कुणाच्याही फोनचा पूर्ण ताबा मिळवला, की मग तो त्या फोनचे कॉल रेकॉर्ड करणं, महत्त्वाची गोपनीय माहिती चोरणं, फोटो आणि व्हिडिओ कॉपी करून घेणं, लोकेशनशी संबंधित माहिती चोरणं असे अनेक उद्योग करू शकतात. या सगळ्या सुरक्षा त्रुटी समोर आल्यानंतर, आता या प्रोसेसरचे उत्पादन करणा:या क्वालकॉम कंपनीनेदेखील यासंदर्भात वापरकत्र्याना इशारा दिला असून, लवकरच फोनच्या उत्पादक कंपन्यांतर्फे ग्राहकांना या प्रोसेसरचे अपडेट उपलब्ध करून देऊन,  सुरक्षा त्रुटी दूर केल्या जाणार असल्याची चर्चा आहे.

ट्विटरचा यूजर्सना इशारा 

2020 क्मध्ये ट्विटरने ग्राहकांना अनेक नवे फीचर्स उपलब्ध करून दिले. मात्र ट्विटरच्या अॅॅण्ड्राइड अॅपमध्ये एक मोठी सुरक्षा त्रुटी असल्याचे नुकतेच समोर आले आहे.ट्विटरच्या बग बाउण्टी पार्टनर असलेल्या हॅकरवनच्या मदतीने ही सुरक्षा त्रुटी समोर आली आहे. या सुरक्षा त्रुटीमुळे ट्विटरच्या काही वापरकत्र्याचे प्रायव्हेट मेसेजेस एक्सपोज होण्यास सुरु वात झाली होती. अर्थात ट्विटरच्या फक्त 4 टक्के वापरकत्र्यानाच या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. ट्विटरने ताबडतोब आपल्या वापरकत्र्याना एक मेसेज पाठवून आपले ट्विटर अॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. या अपडेटनंतर सुरक्षा त्नुटी दूर होणार आहे. ज्या वापरकत्र्याना अडचणीचा सामना करावा लागत आहे, त्यांना ट्विटरने अॅप उघडताच नोटिफिकेशनद्वारे अपडेशन करण्याचा मेसेज मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. खरेतर हीच अडचण किंवा सुरक्षा त्रुटी ट्विटरमध्ये 2018 साली देखील उद्भवली होती. त्याचवेळी या बगचे ’फिक्स’ उपलब्ध करून दिले असल्याचे ट्विटरने नमूद केले आहे. ही अडचण ज्या वापरकत्र्याना आली, त्यापैकी अनेकांनी आपले अॅप वेळच्यावेळी अपडेट केलेले नाही असा दावा ट्विटरतर्फे करण्यात आला आहे. या सुरक्षा त्रुटीचा कोणी गैरफायदा घेतल्याचे किंवा याच्या मदतीने वापरकत्र्याची खासगी माहिती चोरल्याचे अजून तरी समोर आलेले नाही.