शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रीकल्चरच्या डिग्रीला काही किंमत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 16:54 IST

बीएस्सी अ‍ॅग्री केलं, पण नोकरी मिळवण्यासाठी जी वणवण केली त्यानं शिक्षणाची किंमत कळली.

- ज्ञानेश्वर युवराज भामरे

 धुळे जिल्ह्यातल्या आनंदखेडे या छोटय़ाशा गावातला तरुण. बारावी झाला. तालुक्याला जाऊन  बीएस्सी अ‍ॅग्री झाली, शिकून शिकून डोक्याचा व स्वतर्‍चा पार भुगा झाला. मग शंभर ठिकाणी अर्ज केले. परीक्षा दिल्या फक्त नोकरीसाठी; परंतु काहीच उपयोग झाला नाही. नोकरीसाठी वणवण फिरलो, भटकलो, अतोनात खर्चही केला परंतु हात रिकामाच होता. माझ्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी झालेला खर्च पाहून घरच्यांनी नाबोल संताप व्यक्त केला. मीही न बोलता समजून घेतलं. घरातून गोडीनं पाय काढला तो थेट पुण्यालाच थांबला. नोकरीच्या शोधार्थ फिरलो परंतु मनासारखी नोकरी न भेटल्यानं नाइलाजास्तव एका गाडीच्या कंपनीत कामाला लागलो. कामाच्या पहिल्या दिवशी मनात  अनेक प्रश्न होते, काम काय असेल? कसं असेल? आत गेलो तर एकानं माझ्या हाती एक जुना कापडाचा तुकडा दिला व म्हणाला आतून निघणार्‍या सर्व गाडय़ा पुसायच्या. मला थोडं वाईट वाटलं. मनात विचार आला की ज्या हातानं 17 वर्षे नोकरीच्या आशेने हातात पेन धरला, आज त्याच हातात गाडय़ा पुसायला फडकं यावं? एक जुनं फडकं, समोर दुसर्‍याची गाडी आणि काम काय तर ती पुसायची. तेव्हा वाटलं की माझं शिक्षण वाया गेलं, काय वेळ आली माझ्यावर. डोक्यात विचार असताना त्या  गाडीवरून हात फिरवत होतो. माझा सर्व भूतकाळ त्या गाडीच्या काचेत दिसत होता अगदी पहिलीपासून तर बीएस्सी अ‍ॅग्रीच्या तिसर्‍या वर्षार्पयत. वाटत होतं की शिकलोच नसतो तर  आई-वडिलांना किती मदत झाली असती. परंतु शिकलो आणि त्यांची स्वप्नं वाढली, अपेक्षा वाढल्या. मी कुणाचंही स्वप्नं साकार करू शकलो नाही . डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब त्या गाडीच्या काचेवर पडले आणि कुणी बघणार नाही तोच मी तेही फडक्यानं पुसले.  तेथील सहकारी, सिनिअर्सनी मला शिक्षण विचारलं, मी बीएस्सी अ‍ॅग्री सांगितलं तेव्हा सगळे हसले. टिंगलही व्हायची. मग मी ठरवलं यापुढे सांगायचं फक्त चवथी. पण ते सांगितलं तर एकानं सांगितलं, बाबा थोडाफार शिकला असता तर एखादी चांगली नोकरी मिळाली असती. मी फक्त ऐकायचो.हा सिलसिला बरेच दिवस चालला. अशातच काही दिवस गेले. पुण्यात राहणं न परवडल्याने पुन्हा पुण्याहून धुळं गाठलं. तेथील एका कापड मिलमध्ये पाच वर्षे काम केलं. परंतु माझ्या शिक्षणाचा व त्या मिलचा काहीही संबंध नसल्याने मला कामगार म्हणूनच काम करावं लागलं. त्यानंतर 5 वर्षानी माझ्या शिक्षणासंबंधी राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेत मला नोकरी लागली. आता मी उच्चपदावर नसलो तरी चांगल्या पगारावर काम करतोय. पण, या प्रवासानं मला काय नाही शिकवलं. जग दाखवलं!

आनंदखेडे (धुळे)