9 दिवस 9 लूक

By Admin | Updated: October 8, 2015 20:57 IST2015-10-08T20:57:29+5:302015-10-08T20:57:29+5:30

गरबा-दांडिया खेळायला जाणं, हे आता तरुण मुलामुलींपुरतं उरलेलं नाही. अनेक कार्पोरेट्समधे तर खास नवरात्रीचं आयोजन होतं. अनेकजण ग्रुपने नऊ दिवस गरबा-दांडिया खेळायला जातात.

9 days 9 hours | 9 दिवस 9 लूक

9 दिवस 9 लूक

 - लीना खांडेकर

गरबा-दांडिया खेळायला जाणं,
हे आता तरुण मुलामुलींपुरतं उरलेलं नाही. अनेक कार्पोरेट्समधे तर खास नवरात्रीचं आयोजन होतं.
अनेकजण ग्रुपने नऊ दिवस गरबा-दांडिया खेळायला जातात.
एखादा दिवस पास मिळवून जाण्याचा एक ट्रेण्ड होता. तो आता मागे पडला आहे.
सध्या तरुण मुलंमुली नऊही दिवस गरबा खेळायला जातात. काहीजण तर गरबा शिकतात, दांडिया शिकतात, बरेच दिवस प्रॅक्टिस करतात. मग नऊ दिवस मन भरेर्पयत गरबा खेळतात.
त्यांना हे सारं म्हणजे ताण निवारण्याचा, फ्रेश होण्याचा एक मार्गच वाटतो.
पण नऊ दिवस जायचं तर त्यासाठीचे कपडे, मेकप, दागिने हवेत?
ते कुठून आणायचे?
अनेकजण विकत घेण्यापेक्षा सारं काही भाडय़ानं आणतात. अनेक पार्लरवाले मेकप-लूकसह ड्रेसेसचंही कॉण्ट्रॅक्ट घेतात.
आणि प्रचंड पैसा खर्च करून नऊ दिवसांचं पॅकेजही घेतलं जातं!
मात्र हे सारं करण्यापेक्षा जर गरब्याचे एकदम ‘ट्रेण्डी’ नऊ लूकच आपल्या हाताशी असतील तर?
म्हणून खास मुलींसाठी हे नऊ लूक. प्रत्येक दिवशी काय काय करता येईल याच्या काही आयडिया!
कमीत कमी पैसे खर्च करून, आपला लूक तयार करता येऊ शकतो, त्याचीच ही एक झलक.
खास नवरात्रीसाठी नऊ लूक!
आणि मुलांसाठी?
त्यांच्यासाठीही आहेतच काही टिप्स.
 
पहिला दिवस 
लूक 1
 
दांडियाचा पहिलाच दिवस असतो. सगळं नवंनवं, त्यामुळे पहिल्याच दिवशी दांडियाला जाणार असाल तर थोडासा सिम्पल लूक ठेवा. त्यासाठी काय करता येईल?
हेअरस्टाईल
मेस्सी बन हा सगळ्यात उत्तम ऑप्शन. मेसी बन, मेसी चोटी हे सध्याचे सगळ्यात इन ऑप्शन आहेत. अंबाडाच हा, पण जरा स्टायलिश. पुढून थोडी वेगळी हेअरस्टाईल केलेला. मेसी बन बांधला की त्याबरोबर तुम्ही मांग टिक्काही लावू शकता. मांग टिक्काचे पुढचे डिझाइन फक्त दिसले पाहिजे. ठसठशीत. या मेस्सी बनवर तुम्ही एखादा सुंदर अॅण्टीक ब्रुच किंवा फुलपानंही लावू शकता.  
मेकअप
कमीत कमी मेकअप करा. करायचाच असेल तर फक्त आयमेक. त्यातही स्मोकी आईज छान वाटतील. ंम्हणजे काय तर आयश्ॉडो गडद रंगाची, शक्यतो काळ्या रंगाची वापरावी. त्यानं डोळ्यांना एक खूप सुंदर फील येतो. जो वापराल तो मेकअप ग्लॉस वापर. लिपस्टीक लावायलाच हवी असं नाही. पण गरज असल्यास डार्क कलर वापरा. ती आवडत नसेल तर नॅचरल कलर लिपस्टिकही खूप छान दिसते.
ड्रेस
या लूकला नेहमीचा पारंपरिक लेहंगा खूप छान वाटतो. त्याची ओढणीही डोक्यावरून घ्यायची गरज नाही. खांद्यावर छान स्टाईलमधे पीनअप करा. आणि एक सिम्पल पण अत्यंत देखणा लूक तयार!
दुसरा दिवस 
लूक 2
 
दुसरा दिवस म्हणजे वातावरणात रंग भरायला जरा सुरुवात झालेली असते. त्यादिवशीचा लूकही मग तसाच हवा.
हेअरस्टाईल
पुढच्या केसांना स्प्रे, बॅककोंब करून बुफा करू शकता. बुफा म्हणजे पुढच्या बाजूनं काढलेला पफच. केसांचा उंचवटा. ज्यांची उंची कमी असते त्यांच्यासाठी पुढे केलेला बुफा फार उत्तम. त्यामुळे उंच असल्याचा फील येतो. मागच्या सर्व केसांना टाईट कलर्स करून बांधता येतात. म्हणजे नाचताना ते हालत नाहीत. मोकळेच केस सोडणार असाल तर मात्र तुम्ही केसांना ग्लॉस लावूशकता. 
मेकअप 
मिनरल मेकअपही छान वाटेल. नॅचरल बेस + जाड आयलायनर आणि जाड काजळाचा वापर करा. आयश्ॉडो  तुमच्या आवडीप्रमाणो ग्लिटरी अथवा क्रीमबेस वापरा. ब्लश शक्यतो पिंक, चिंच कलर. आणि लिपस्टिक डार्कपिंक रेड. आणि ग्लॉस. उत्तम ग्लॅमरस कॉम्बिनेशन तयार!
ड्रेस
फ्युजन लूक ट्राय करून पहा. म्हणजे काय तर  प्लेन लेहंगा घालून त्यावर खूप वर्क केलेला दुपट्टा वापरा.  किंवा मग मेगास्लिव्हज ब्लाऊज. ज्याच्या बाह्यांवर व पाठीवर हेवी वर्क असेल. एक खास लूक तयार.
तिसरा दिवस 
लूक 3
 
नवरात्रीमधे जास्तीत जास्त हेअरस्टाईल्स या बन अथवा चोटी अशाच केल्या जातात. कारण नाचताना त्या जास्त वेळ टिकतात.  बनमुळे अंटी लूक येतो असं समजू नका. इंडोवेस्टर्न बन ही सध्या अत्यंत हीट गोष्ट आहे.
हेअरस्टाईल
ज्यांचे केस खूप मोठे आहेत त्यांनी हा बॅक कोम्ब बन नक्की ट्राय करावा. लहान केस असतील तर मोठं गंगावण वापरता येईल. लांब केसांना पुढच्या बाजूला पुफा, मोठा पफ करा किंवा आवडत असल्यास मधला भांग पाडा. मागच्या केसांना टांग्ज करा. म्हणजेच मागच्या बाजूनं कुरळे करा केस. मग रोल करून बांधू शकता किंवा तसंही करायचं नसेल तर सरळ बुचडा अर्थात बन बांधा. त्यावर मॅचिंग ब्रुच अथवा कुंदन लावा. मांग टिका लावा. तुमचे केस कलर हायलाईट केले असतील तर अजून छान वाटेल.
मेकअप 
मेकअपमधे नॅचरल पिंक शेड्स वापरून हाय डेफिनेशन मेकअप करा. तुमचे सर्व फीचर्स उठून दिसतील आणि फोटोही अशा मेकअपमधे खूप छान येतात. हे सर्व मेक वॉटरप्रूफ असायला हवेत. 
ड्रेस
कुंदनवर्क असलेला घागरा- ओढणी हवीच. किंवा ब्लाऊजवर पूर्ण कुंदनवर्क हवं. हा परफेक्ट लूक तयार!  
चौथा दिवस 
लूक 4
 
चौथ्या दिवसापासून वातावरणात खरा रंग भरायला लागतो. अनेकजण चौथ्या दिवसापासूनच गरबा खेळायला जातात.
हेअरस्टाईल
साईड स्वेप्ट हेअरस्टाईल ही साधारण मोठय़ा केसावर केलेली छान दिसते. सध्या खूप फेमस अशी ही हेअरस्टाईल आहे. ब:याचदा लग्नात ब्राईड्स तसेच बॉलिवूड स्टार्सही अॅवॉर्ड्ससाठी ही हेअरस्टाईल करतात. 
ह्यासाठी तुम्ही पुढचे केस पूर्ण मागे घ्या. घट्ट माथ्यावर धरा. (कर्ली केसांनी हेअर आयर्न करावे.) माथ्यावर उंच धरून पोनी बांधा. खालून थोडासा कंगवा फिरवा म्हणजे माथ्यावर पफ येईल. 
याप्रमाणोच साईड पोनीटेलही करू शकता. किंवा मानेवर पोनी घालू शकता. अशा प्रकारच्या हेअरस्टाईलवर ऑक्सडाईज्ड अॅक्सेसेरीज वापरा.
 
मेकअप 
फ्लॉलेस बेस व थ्री डायमेन्शन मेकअप करू शकता. हा मेकअप बराच वेळ टिकतो. लिपस्टिक नॅचरल कलरची किंवा पिंक वापरा. थोडा डार्क लूक हवा असेल तर ऑरेंज+रेड कलर लिपस्टिक मस्त.
ड्रेस
घागरा, ओढणी या लूकसाठी मस्त. मात्र ज्यावर कवडय़ा लावून वर्क केलेले असते असा खूप घेर असलेला घागरा छान वाटेल.
पाचवा दिवस 
लूक 5
 
आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या आपण पाहतो. केस मोठे असतील तर छानच; पण लहान केसांनाही न कळणारे असे एक्स्टेंशन्स वापरून सुंदर वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करता येतात. एक हेअरस्टाईल तुमचा सारा लूकच बदलू शकते.
हेअरस्टाईल 
 ब्रेड हेअरस्टाईल हा नवीन प्रकार ट्राय करून पाहा. पुढच्या बाजूची एक जाडसर बट घेऊन तिला पीळ द्या आणि एका कानाकडून सुरू करून दुस:या बाजूला न्या. मागे पिनांनी पॅक करा आणि मागील सर्व केसांची मेसी चोटी अथवा नॉर्मल चोटी, सागर चोटी, उलटी सागर चोटी, कर्ली चोटी घाला. पूर्ण वेणीवर हेअर अॅक्सेसरीज, फुलं लावता येतील. गजरे लावले तरी सुंदर दिसतील. 
मेकअप 
रेट्रो लूक खूप छान दिसतो. काजळ, लायनर डोळ्याच्या बाहेर काढावे. गरजेप्रमाणो ग्लॉस लावा. फक्त गोल्डन, ब्रोन्झ आयश्ॉडोही छान दिसतात. आणि रेड लिपस्टिक लावा. 
ड्रेस
जास्ती वर्क असलेला गोल्डन, ब्रॉन्झ कुंदन अथवा जरी वर्कचा लेहंगा घाला. साडी नसेली तरी चालेल. साडी नेसून गरबा खेळणं हीदेखील सध्याची लेटेस्ट फॅशन आहे. 
सहावा दिवस 
लूक 6 
 
बंजारन लूक नावाचा हा एक वेगळाच, जरा रस्टिक लूक ट्राय करुन पहा. 
हेअरस्टाइल 
नॉर्मल उंच वेणी घाला आणि त्याला गोंडा लावा. समोर पफ घ्या. पण मांगटीका न लावता एखादी बिंदी भांगामधे लावल्यास उत्तम. वेणीला खाली एक गोंडा लावावा खूप छान दिसतो.
मेकअप -
या मेकअपमधे शक्यतो रेड शेड्स वापरून ग्लिटर (गोल्डन अथवा सिल्व्हर) वापरावं. लायनर काजळ फार जाड नाही लावलं तरी चालेल.
ड्रेस
 स्कर्ट घागरा घाला. म्हणजे काय तर हा घागरा  गुडघ्याखाली 3-4 इंच असतो. त्याला टिकल्या चिकटवलेल्या असतात.  त्याभोवती मिना वर्क असतं. चोलीला फुग्याच्या बाह्या असतात. मागच्या गळ्याला गोंडा लावतात. बाह्यांनाही छोटे गोंडे लावल्यास छान दिसते. तसेच पायात जाड पैंजण. झाली बंजारन तयार!
सातवा दिवस 
लूक 7
 
सातव्या माळेचं महत्त्व तर आहेच.  शेवटचे हे तीन दिवस, त्यामुळे लूकही हटकेच हवा. जमल्यास पारंपरिक. म्हणून हा गुजराथी लूक.
हेअरस्टाइल 
आपल्याला मोठा मांगटिका लावायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पारंपरिक पद्धतीची वेणी घाला. त्या वेणीवर गोंडय़ाच्या अॅक्सेसरीज लावा. आणि मस्त ठसठशीत मांगटिका. 
मेकअप 
मेकअपसाठी पॅनस्टिक बेस वापरा. ग्लॉस पावडरचा वापर करा. ब्राईट आयश्ॉडो, ब्राईट लिपस्टिक लावा. एवढा मेकअप पुरे.
ड्रेस
घागरा चोळी घालायची मात्र मोठय़ा सिल्व्हर टिकल्या लावलेली.  ओढणीला रंगीबेरंगी गोंडे असतील तर खूप छान दिसते. नाकात चेनची नथनी, हातामध्येही मोठे (लम्हाणी) पद्धतीचे कडे आणि पायातही तसेच कडे घालावेत. एका दंडातही कडा घालावा. 
आठवा दिवस 
लूक 8
 
सर्वाधिक गरबा खेळणा:यांच्या गर्दीचा हा दिवस. त्यात आपण उठून दिसलं तर पाहिजेच, कसं?
हेअरस्टाईल 
मानेवर साधा अंबाडा घाला. पुढून तीन पदरी वेणी घालून अंबाडा घातला तर फार छान. मागे बनमध्ये घुंगरू लावा. डोक्यावरून पारदर्शक ओढणी घ्या, म्हणजे अंबाडा सुंदर दिसेल!
मेकअप 
 कॉपर व गोल्डन बेसमध्ये मेकअप करा. काजळ लायनर जाडसरच लावायचं. डोळ्याच्या बाजूला व हनुवटीवर तीन काजळाचे ठिपके द्या. राणी कलर अथवा रेड कलरची लिपस्टिक आणि कपाळावर मोठ्ठी टिकली. 
 
ड्रेस
शक्यतो काळ्या किंवा मरून कलरचा घागरा मस्ट. त्यावर ओढणी, त्यावर रेशीम वर्क. एकदम सुंदर दिसेल हा लूक! 
नववा दिवस 
लूक 9
 
दस:याच्या दिवशी फारसं कुणी गरबा-दांडिया खेळायला जात नाही.  त्यामुळे नवव्या शेवटच्या दिवशीचा लूक स्पेशलच. त्यासाठीच हा मोरनी लूक.
हेअरस्टाईल 
माथ्यावर उंच ट¦ीस्ट बन घालून त्यावर एक किंवा दोन मोरपीस लावा. बनच्या मागे मोरपंखी गोंडा लावा.  खूप सिंपल पण छान दिसते ही हेअरस्टाईल.
मेकअप 
मोरपंखी आयश्ॉडो, ऑरेंज अथवा पिंक कलरचे ब्लश, पिंक कलर लिपस्टिक एवढंच पुरे. निळ्या रंगाच्या लेन्सेस लावता आल्या तर फारच छान!
ड्रेस
मोरपंखी घागरा अथवा मोरपंखी साडी. झाला परफक्ेट लूक तयार!
 
---------------------
तरुण मुलांसाठी केडीयू
आणि धोती
तरुण मुलींइतके ‘तयार’ होऊन मुलं जात नसले, तरी मुलंही आता एकदम ट्रॅडिशनल लूकमधेच गरबा खेळायला जातात. नेहमीचे टीशर्ट-पॅण्ट घालून कुणी गरब्याला जात नाही.
अनेक मुलं तर गरब्यासाठी खास तयारी करतात. आणि आपला स्वत:चा एक वेगळा लूक स्वत:च ठरवतात.
तो ठरवता यावा म्हणून या काही टिप्स.
1) केडीयू. हा नेहमीचा पारंपरिक गुजराथी पेहराव. केडीयू भाडय़ानं मिळतात. त्यामुळे केडियू नी धोती हा उत्तम पर्याय.
2) आता फ्युजनचा जमाना आहे त्यामुळे कफनी आणि पायजमा हा ऑप्शन आहेच.
3) सध्या ज्यांची फॅशन आहे ते राजपुती कुर्ते कुणालाही खूप छान दिसतात. त्यामुळे राजपुती कुर्ता-पायजमा हा सेफ आणि परफेक्ट ऑप्शन.
4) धोती-शेरवानी असंही कॉम्बिनेशन उत्तम. यंदा हा ट्रेण्ड मोठा असेल.
5) कुर्ता-पायजमा हा नेहमीचा ट्रॅडिशनल लूक तर आहेच; पण फार घट्ट-तंग कुर्ते मात्र वापरू नयेत.
6) हे सारं करताना डोक्याला एखादा दुपट्टा किंवा कंबरेभोवती स्ट्रोल बांधला की झालं काम.
7) पायात मोजडय़ा, कोल्हापुरी चपलाही उत्तम. 
8) कानात बाळी घालता येणं शक्य असेल तर तोही ऑप्शन आहेच.

Web Title: 9 days 9 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.