स्मार्ट बॅटरीसाठी 5 ट्रिक्स

By Admin | Updated: September 25, 2014 17:00 IST2014-09-25T17:00:52+5:302014-09-25T17:00:52+5:30

स्मार्टफोनची वारंटी संपते न संपते तोच बॅटरी खराब झाली, बदलावी लागली असा अनुभव अनेकांना येतो. खरंतर बॅटरी हा स्मार्टफोनमधील अत्यंत महत्त्वाचा घटक. तिचं आयुष्य वाढावं म्हणून आपण काहीच करत नाही. मग बॅटरी ढपते, ती ढपू नये म्हणून करायलाच पाहिजेत अशा या ५ गोष्टी.

5 tricks for smart battery | स्मार्ट बॅटरीसाठी 5 ट्रिक्स

स्मार्ट बॅटरीसाठी 5 ट्रिक्स

फोनची बॅटरी सारखी ढपते? या उतरणार्‍या बॅटरीचं लाईफ वाढवाल कसं?
 
स्मार्टफोनची वारंटी संपते न संपते तोच बॅटरी खराब झाली, बदलावी लागली असा अनुभव अनेकांना येतो. खरंतर बॅटरी हा स्मार्टफोनमधील अत्यंत महत्त्वाचा घटक. स्मार्टफोनची  एरव्ही आपण किती काळजी घेतो. त्यामध्ये अँण्टीव्हायरस टाकतो, त्याला बाहेरून व्यवस्थित कव्हर लावतो. पण बॅटरीचं काय? तिचं आयुष्य वाढावं म्हणून आपण काहीच करत नाही. मग बॅटरी ढपते, ती ढपू नये म्हणून करायलाच पाहिजेत अशा या ५ गोष्टी.
 
 
जास्त तपमान 
बॅटरीचे आयुष्य कमी करण्यासाठी जास्त तपमान खूप कारणीभूत असतं. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन उन्हात जास्त वेळ राहणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही उन्हात फिरणार असाल तर स्मार्टफोन हातरुमालात गुंडाळून मग खिशात किंवा पर्समध्ये ठेवा, म्हणजे तपमान वाढीचा फटका बॅटरीला बसणार नाही. 
 
पूर्णपणे डिसचार्ज नको
 असा एक गैरसमज आहे की, बॅटरी लाइफ वाढविण्यासाठी बॅटरी पूर्ण डिसचार्ज झाल्यानंतरच पूर्ण चार्ज करायला पाहिजे. मात्र आजकाल ज्या लिथीयम आयनच्या बॅटरीज स्मार्टफोनमध्ये वापरल्या जातात त्यासाठी असे करण्याची गरज नाही. बॅटरीचे लाइफ वाढविण्यासाठी थोडेथोडे चाजिर्ंग करावे म्हणजे २५ टक्क्यांवर बॅटरी आली असता त्याला ७0 टक्केपर्यंत चार्ज करावे. परत २५-३0  टक्क्यांवर बॅटरी आली असता ७0-८0 टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज करावी. त्यामुळे बॅटरीचे लाइफ वाढते.
 
 
फुल्ल चार्जिंग नको
 काही लोकांना स्मार्टफोन रात्री चाजिर्ंगला लावून झोपायची सवय असते. त्यामुळे बॅटरी फुलचार्ज (१00 टक्के) झाल्यानंतरसुद्धा पावर कनेक्टेड असल्यामुळे बॅटरीची हेल्थ खराब होऊ शकते. बॅटरीची सवरेत्तम लाईफ म्हणजे ४0-८0 टक्क्य़ांमध्ये आहे. त्यामुळे जरी तुम्ही १00 टक्केपर्यंत बॅटरी चार्ज केलीच तर नंतर स्मार्टफोन चाजिर्ंग बंद करून टाका. 
 
ब्रॅण्डेड बॅटरी वापरा
   समजा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी काही कारणामुळे खराब झालीच तर नवीन बॅटरी घेताना नेहमी ब्रॅण्डेड कंपनीचीच बॅटरी घ्या. काही पैसे वाचविण्यासाठी स्वस्तातील बॅटरी घेऊ नका. स्वस्तातील बॅटरीमुळे अपघाताचे प्रमाण वाढते.
 
 
डिसचार्ज महिन्यातून एकदाच
    सध्याच्या स्मार्टफोनच्या बॅटरीसुद्धा स्मार्ट आहेत. त्यामुळे स्मार्टफोन तुम्हाला किती वेळ बॅटरी पुरेल हे सांगत असतो. म्हणजे 2 ँ४१२ 15 ्रेल्ल४३ी२ १ीें्रल्ल्रल्लॅ असे काहीसे नोटीफिकेशन तुम्हाला स्मार्टफोन देत असतो. मात्र सारखंसारखं चार्ज-डिसचार्ज केल्याने स्मार्टफोनचा हा अंदाज चुकू शकतो आणि तुम्ही गोत्यात येऊ शकता. त्यामुळे बॅटरी बनविणार्‍यांचा असा सल्ला आहे की तुम्ही किमान महिन्यातून एकदा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे डिसचार्ज होऊ द्या.
 
 
- अनिल भापकर 
anil.bhapkar@lokmat.com
 

 

Web Title: 5 tricks for smart battery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.