शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

5 गोष्टी - लॉकडाउनमध्येही तुम्हाला मोबाइलपासून लांब ठेवू शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 6:45 AM

तुम्हाला काम नाही म्हणून तुम्ही मोबाइलवर टाइमपास करता, ते कसं थांबवता येईल?

ठळक मुद्देडू नॉट डिस्टर्ब.

- निकिता महाजन

जर्मनीमध्ये म्हणो असा एक लॅम्प डिझाइन करण्यात आला आहे की, तुम्ही स्मार्टफोन वापराचं ऑडिटिंग करून, अत्यावश्यक वेळ ठरवायची.आणि तेवढाच काळ तुमचा मोबाइल चालेल, मग हा लॅम्प आपलं काम करेल आणि स्मार्टफोनचं काम बंद होऊन जाईल.भारी आयडिया आहे, लॉकडाउन संपलं की कदाचित तो बाजारात विक्रीलाही येईल.तोवर मात्र लॉकडाउनमध्ये चिडचिड करत, माझा स्क्रीन टाइम फार वाढला म्हणून बडबडण्यात काही अर्थ नाही.त्यावर काही उपाय आपल्यालाच शोधायला हवेत.सध्या आपणच नाही, तर जगभर लोक ते उपाय शोधत आहेत.आणि ऑनलाइन ट्रेण्डनुसार काही 5 गोष्टी आहेत, त्या केल्या तर हे अॅडिक्शन सुटेल किंवा कमी होईल यावर जगभर एकमत आहे.तर त्यापैकी काही आपल्याला जमेल का?

1. नोटिफिकेशन्स ऑफ ठेवावाजला मोबाइल टुंगटुंग की पहायचं असं होतंच, आणि हातात घेतला फोन की काम विसरून तासभर त्यात कसाही जातो. गुंगी चढतेच.त्यावर उपाय हा की फेसबुक, मेल, व्हॉट्सअॅप हे सगळे नोटिफिकेशन्स बंद ठेवा. नो आवाज, नो पाहणो. सोप्पं आहे. जे ग्रुप्स महत्त्वाचे नाहीत, त्यांचे नोटिफिकेशन्स तर वर्षभरासाठी म्यूट करून टाका.

2. गेट आउट ऑफ डिजिटल वर्ल्डम्हणजे एकदम बंद नका करू, तसं नाहीच होत. तर अशी एखादी गोष्ट करा की ज्याचा संबंध मोबाइल आणि डिजिटल वर्ल्डशी नाही. म्हणजे चित्र काढा. रंग भरा. विमानं बनवून उडवा. सायकलिंग करा, व्यायाम करा. घर साफ करा. टॉयलेट धुवा;पण मोबाइलला हात लावायचा नाही.

3. कारण तुम्हाला काम नाहीतुम्ही मोबाइल सतत पाहता कारण तुम्हाला काम नाही किंवा आहे त्यात तुमचं मन रमत नाही.म्हणून जे आवडेल ते काम करा, नाहीतर सरळ झोप काढा; पण असं काहीतरी शोधा, ज्यात तुमचा जीव रमतो.

4. डू नॉट डिस्टर्बअशी एक सोय असते फोनमध्ये माहिती आहे ना, दिवसातले दोन तास या मोडवर फोन ठेवा. डू नॉट डिस्टर्ब.नाहीतर किमान रात्री झोपल्यापासून सकाळी उठेर्पयत ठेवा. म्हणजे रात्री झोपेतून उठून आपण मोबाइल पाहत बसणार नाही.

5. रोज थोडं कमीहा सोपा उपाय आहे. म्हणजे रोजचा तुमचा अॅप्स युसेज  पाहा. दोन तास असेल तर उद्या 1.50 म्हणजे फक्त 10 मिनिटं कमी करूअसं ठरवा.तेवढं जमवा.