5 गोष्टी - लॉकडाउनमध्येही तुम्हाला मोबाइलपासून लांब ठेवू शकतात.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 06:45 IST2020-04-23T06:45:00+5:302020-04-23T06:45:01+5:30
तुम्हाला काम नाही म्हणून तुम्ही मोबाइलवर टाइमपास करता, ते कसं थांबवता येईल?

5 गोष्टी - लॉकडाउनमध्येही तुम्हाला मोबाइलपासून लांब ठेवू शकतात.
- निकिता महाजन
जर्मनीमध्ये म्हणो असा एक लॅम्प डिझाइन करण्यात आला आहे की, तुम्ही स्मार्टफोन वापराचं ऑडिटिंग करून, अत्यावश्यक वेळ ठरवायची.
आणि तेवढाच काळ तुमचा मोबाइल चालेल, मग हा लॅम्प आपलं काम करेल आणि स्मार्टफोनचं काम बंद होऊन जाईल.
भारी आयडिया आहे, लॉकडाउन संपलं की कदाचित तो बाजारात विक्रीलाही येईल.
तोवर मात्र लॉकडाउनमध्ये चिडचिड करत, माझा स्क्रीन टाइम फार वाढला म्हणून बडबडण्यात काही अर्थ नाही.
त्यावर काही उपाय आपल्यालाच शोधायला हवेत.
सध्या आपणच नाही, तर जगभर लोक ते उपाय शोधत आहेत.
आणि ऑनलाइन ट्रेण्डनुसार काही 5 गोष्टी आहेत, त्या केल्या तर हे अॅडिक्शन सुटेल किंवा कमी होईल यावर जगभर एकमत आहे.
तर त्यापैकी काही आपल्याला जमेल का?
1. नोटिफिकेशन्स ऑफ ठेवा
वाजला मोबाइल टुंगटुंग की पहायचं असं होतंच, आणि हातात घेतला फोन की काम विसरून तासभर त्यात कसाही जातो. गुंगी चढतेच.
त्यावर उपाय हा की फेसबुक, मेल, व्हॉट्सअॅप हे सगळे नोटिफिकेशन्स बंद ठेवा. नो आवाज, नो पाहणो. सोप्पं आहे. जे ग्रुप्स महत्त्वाचे नाहीत, त्यांचे नोटिफिकेशन्स तर वर्षभरासाठी म्यूट करून टाका.
2. गेट आउट ऑफ डिजिटल वर्ल्ड
म्हणजे एकदम बंद नका करू, तसं नाहीच होत. तर अशी एखादी गोष्ट करा की ज्याचा संबंध मोबाइल आणि डिजिटल वर्ल्डशी नाही. म्हणजे चित्र काढा. रंग भरा. विमानं बनवून उडवा. सायकलिंग करा, व्यायाम करा. घर साफ करा. टॉयलेट धुवा;
पण मोबाइलला हात लावायचा नाही.
3. कारण तुम्हाला काम नाही
तुम्ही मोबाइल सतत पाहता कारण तुम्हाला काम नाही किंवा आहे त्यात तुमचं मन रमत नाही.
म्हणून जे आवडेल ते काम करा, नाहीतर सरळ झोप काढा; पण असं काहीतरी शोधा, ज्यात तुमचा जीव रमतो.
4. डू नॉट डिस्टर्ब
अशी एक सोय असते फोनमध्ये माहिती आहे ना, दिवसातले दोन तास या मोडवर फोन ठेवा. डू नॉट डिस्टर्ब.
नाहीतर किमान रात्री झोपल्यापासून सकाळी उठेर्पयत ठेवा. म्हणजे रात्री झोपेतून उठून आपण मोबाइल पाहत बसणार नाही.
5. रोज थोडं कमी
हा सोपा उपाय आहे. म्हणजे रोजचा तुमचा अॅप्स युसेज पाहा. दोन तास असेल तर उद्या 1.50 म्हणजे फक्त 10 मिनिटं कमी करूअसं ठरवा.
तेवढं जमवा.