फोनवरची भांडणं संपवणारे ५ पॉइण्ट
By Admin | Updated: February 5, 2015 19:00 IST2015-02-05T19:00:50+5:302015-02-05T19:00:50+5:30
‘तेरे मेरे बीच में’ असं सांगत आमचे डोळेच उघडणारा मोबाइल नावाचा व्हायरस आमच्या आयुष्याची आणि प्रेमाची कशी माती करतो आहे

फोनवरची भांडणं संपवणारे ५ पॉइण्ट
प्रियंका/ अभिनव -
‘तेरे मेरे बीच में’ असं सांगत आमचे डोळेच उघडणारा मोबाइल नावाचा व्हायरस आमच्या आयुष्याची आणि प्रेमाची कशी माती करतो आहे, हे सांगणारा तुमचा विशेषांक वाचला. आजही मी पुन्हा पुन्हा वाचतोच आहे. ‘तिला’ही वाचायला देतो आहे.
त्यानंतर आम्ही एकमेकांशी बरंच बोललो. आणि आपल्या नात्यात ही जी कीड शिरली आहे, त्या कीडेचं काय करायचं याचं एक प्लॅनिंगच केलं.
त्यातून आम्ही आमच्यासाठी जे तोडगे काढले ते तुमच्याशी शेअर करतो आहे. या ५ गोष्टी आम्हाला बर्यापैकी जमू लागल्यानं आमच्यातली भांडणच कमी झाली आहे. रोमान्स अजून वाढलेला नाही, पण निदान डोक्याची कलकल तरी कमी झाली.
१) फोन करताच ‘तिनं’ कुठेस? हा प्रश्न विचारायचा नाही. त्यानं माझं डोकं तापायचं. म्हणून मग आता तिनं विचारायच्या आतच मी सांगून टाकतो की, मी अमुक ठिकाणी आहे.
२) एकदा फोन कट केला, तर मी किंवा तिनं पुन्हा पुन्हा फोन करायचा नाही; पण फोन कट करताच एक एसएमएस पाठवायचा की, नंतर बोलू. त्यावर बाकी चर्चा बंद.
३) सतत प्रश्न तिनं किंवा मी एकमेकांना विचारायचे नाहीत. शक्यतो फोन कुणी कुणाला केले असे हिशेब मांडायचे नाहीत.
४) एकमेकांना फोनचं प्रमाण कमी करणं. शक्यतो दिवसातून एकदाच फार अर्जन्सी असेल तर दोनदा बोलायचं. नाही तर बोलायचं नाही.
५) फोन कमी म्हणजे प्रेम कमी असं काही नाही, हे समजून घेऊन जेव्हा बोलू तेव्हा भांडण होऊ द्यायचं नाही.
ही पाच सूत्रं सांभाळणं सोपं नाही, त्यातून त्रास होतो आहे. मात्र, तरीही हे जमू शकतं असं आम्हाला वाटल्यानं आम्ही हे शेअर करतो आहोत.