कलेचे 3 स

By Admin | Updated: September 17, 2015 22:20 IST2015-09-17T22:20:57+5:302015-09-17T22:20:57+5:30

प्रत्येक माणसामधे कोणती ना कोणती कला दडलेली असतेच; फक्त ती ख:या अर्थाने स्वत:ची स्वत:ला गवसली पाहिजे. मग आयुष्य खूप सुंदर होऊन जाते.

3s of art | कलेचे 3 स

कलेचे 3 स

 - अनुजा पांचाळ (आर्किटेक्ट )

 
प्रत्येक माणसामधे कोणती ना कोणती कला दडलेली असतेच; फक्त ती ख:या अर्थाने स्वत:ची स्वत:ला गवसली पाहिजे. मग आयुष्य खूप सुंदर होऊन जाते.
कलेच्या बाबतीत मी खूप नशीबवान आहे की मला माङयातली कला अगदी लहान वयातच गवसली. गणोशोत्सवात मामाच्या सोसायटीत छापील चित्न रंगवण्याच्या स्पर्धेत मी पहिल्यांदाच भाग घेतला होता. न कळत्या वयातील मी स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक. स्पर्धेची वेळ सुरू होताच दिल्या गेलेल्या रंगीत खडूच्या पेटीतील केवळ एकच काळ्या रंगाचा खडू उचलून छापील चित्न पटापट रंगवून वेळेच्या खूप आधीच पूर्ण केले व चित्न रंगवून पूर्ण झाल्याचे मोठय़ाने ओरडू लागले; जणूकाही चित्न पहिल्यांदा रंगवून पूर्ण झाल्याने पहिले बक्षीस मलाच मिळणार असा  निरागस आत्मविश्वास असेल तो!
पण जेव्हा परीक्षकांनी मला समजावले तेव्हा मला उमगले की स्पर्धेत पहिले चित्न रंगवून पूर्ण करणा:यास बक्षीस नसून सुंदर चित्न रंगवणा:यास ते मिळणार होते. पण माङया चित्न रंगवण्यातील व्यवस्थितपणा पाहून परीक्षकांना व माङया आजोबांना माङया बोटांमधील चित्नकलेचे वळण जाणवले. माङया आयुष्यातील पहिल्यावहिल्या कलास्पर्धेत मला बक्षीस मिळाले नसले तरी याच स्पर्धेमुळे, चौसष्ठ कलांचा अधिपती असणा:या गणपती बाप्पाच्या कृपेने, मला माङयातील अंगीभूत कलेचा शोध लागला. तेव्हापासून रंगांबद्दल एक जबरदस्त ओढ निर्माण झाली.
माङया चित्नकलेच्या आवडीस माङया आई-बाबा-आजोबांनी खतपाणी घातले, माङया कलाशिक्षकांनी छान मशागत केली. या सर्वानी मला केवळ अभ्यास एके अभ्यास हेच करायला न लावता, कला-क्र ीडा या सर्वानाच समान महत्त्व देत कलेची गोडी वाढवली. 
कला जोपासण्यात तीन ‘स’चा खूप मोलाचा वाटा आहे. ते म्हणजे सृजनशीलता, सातत्य व संयम. समोर येणा:या प्रत्येक कलाप्रकाराकडे ‘सृजनशील’तेने पाहत तो जोवर पूर्णपणो आत्मसात होत नाही तोवर संयम  ठेवून न कंटाळता, न थांबता ‘सातत्या’ने प्रयत्न करावयाचे. यासोबतच कला वृद्धिंगत होण्याकरिता आणखी एक सवय अंगी बाणण्याची गरज आहे ती म्हणजे निरीक्षणशक्ती. आपल्या आजूबाजूला असणा:या कित्येक लहान-सहान गोष्टींमध्ये कला दडलेली असते. निसर्ग तर आपल्यावर मुक्तहस्ताने कलेची उधळण करत असतो. गरज असते ती फक्त डोळे सतत उघडे ठेवून हे सारे टिपण्याची ! 
आणि फक्त वस्तूच नाहीत, तर आजूबाजूला वावरणारी कलावेडी माणसेही क्रिएटिव्हिटीच्या लहरी सोडत असतात. आपल्याला फक्त त्या अचूक पकडाव्या लागतात. मलाही माङो पालक, शाळेतील शिक्षकांप्रमाणोच कॉलेजात, ऑफिसमधे तसेच आजूबाजूला भेटणा:या कित्येक कलाप्रेमी माणसांनी दरवेळी काहीतरी नवीन शिकवले. त्यामुळे माझी कला बहरतेय. कलेतील सौंदर्य टिपण्याची ही सवय एकदा का लागली की जीवनातीलही चांगल्या गोष्टींबद्दलचा आशावाद वाढीस लागतो.
चित्न काढण्यासाठी पेन्सिल हातात घेतल्यावर, रंग समोर आल्यावर, क्र ाफ्ट करताना झालेल्या पसा:यात मी स्वत:स विसरून जाते, सगळ्या चिंता दूर पळून  बेभान होते, स्वच्छंदी वाटू लागते. म्हणूनच नेहमीच्या सगळ्या व्यापातून मी आर्ट-क्र ाफ्ट करण्यासाठी हमखास वेळ काढतेच. रिफ्रेश होते. 
काही पूर्वापार प्रचलित असणारे कलाप्रकार आपण वर्षानुवर्षे पाहत आलोय. एकसारख्या पद्धतीनेच पुन्हा पुन्हा करत आलोय. मग काहीजण म्हणतील, या तोचतोचपणात कसली आलीये क्रि एटिव्हिटी?  पण त्यातही कलासक्त माणूस स्वत:ची सृजनशीलता ओतून, निरीक्षणशक्तीने टिपलेल्या सौंदर्याचा शृंगार करून नावीन्यपूर्ण साज चढवतो. 
कलेमुळे मला नानाप्रकारे फायदे झाले. जसे की वारली चित्नकलेसारखी ट्राइबल आर्ट शिकताना त्यांच्या चित्नांमधील ताल-लय अंगी भिनू लागली; क्विलिंग पेपरआर्टच्या माध्यमातून स्वत:साठी ज्वेलरी डिझाइन करता आली, तर याच कलेतून साकारलेल्या माङया राख्या जेव्हा कित्येक बहिणींनी भावांच्या मनगटावर बांधल्या तेव्हाचा आनंद निराळाच होता. भाज्यांच्या साली, फुटक्या वस्तू, बांगडय़ांच्या काचा, झाडांची वाळलेली पाने-फुले, रद्दीपेपर, पेपरप्लेट्स, थर्मोकोल ग्लासेस अशा टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवताना कच:यातूनही कला साकारता येऊ शकते ही नवी दृष्टी मिळाली व जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला. वाइटातूनही चांगले निर्माण करता येऊ शकते असा विश्वास मिळाला. इकोफ्रेंडली क्र ाफ्ट बनवताना कलेचा मनमुराद आनंद तर मिळतोच पण त्याचबरोबर पर्यावरणाचे जतन करण्याच्या कार्यात आपण खारुताईचा वाटा देतोय याचे समाधान मिळते व सामाजिक जाणिवांचे भान राहते. 
माङया आर्किटेरच्या व्यवसायात तर पावलोपावली माङया कलेचा उपयोग होतो. किंबहुना कलेच्या माङया ध्यासामुळेच मी या कलात्मक क्षेत्नाकडे वळले. थोडक्यात काय, तर आर्ट आणि क्र ाफ्ट हे मला मिळालेले आनंदाचे झाडच आहे नेहमीच बहरलेलं !  म्हणूनच मला असे वाटते की आयष्यात पैशांची गुंतवणूक करण्यापेक्षा कला जोपासावी. कारण एकवेळ पैशांच्या गुंतवणुकीत तोटा होईल पण कलेतून कधीही नुकसान होणार नाही. कोणतीही कला ही बक्षीस मिळवण्यासाठी किंवा मान-सन्मान मिळवण्यासाठी करायची नसतेच; याउलट मनापासून जोपासलेली कला खूप काही देऊन जाते. 
 

Web Title: 3s of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.