शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आयुष्यात सगळ्याच गोष्टी फार गंभीरपणे घेऊ नयेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 7:55 AM

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- संजय मांजरेकर, 

संजय.पहिले तर ना एक कर, रिलॅक्स.जरा रिलॅक्स हो.  ते म्हणतात ना, जरा चील राहा, बिनधास्त राहा, तर ते कर! आयुष्यात सगळ्याच गोष्टी खूप जास्त गंभीरपणे घेण्याची गरज नसते. आपल्या यशाचा आणि त्याचबरोबर त्या प्रवासाचा किंवा प्रक्रियेचा (प्रोसेस) आनंद घ्यायला शिकायला हवं.आणि अजून एक, जरा आपल्या वजनाकडे आणि फिटनेसकडे जास्त लक्ष दे. मला माहितीये तुझं खेळताना सगळं लक्ष कौशल्याकडे (स्किल्स) होतं. तंत्र आणि कौशल्य ते फार महत्त्वाचं आहेच तुझ्यासाठी; पण ते करताना फिटनेसकडे मात्र हवं तेवढं लक्ष दिलं नाहीस. ते दे. क्रि केट सोडून तुला काही आयुष्यच नाही, काही मजाच केली नाहीस. पण ऐक, सकाळी तू ग्राउंडवर मेहनत घेत असशील तर संध्याकाळी थोडी मजा करायला काही हरकत नाही. थोडं बाहेर फिरायला जा.  त्यामुळे जरा रीचार्ज व्हायला मदत होते.क्रिकेटविषयीच बोलायचं तर,  कसोटी क्रिकेट हे महत्त्वाचंच आहे. मूलभूत गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण आज आपण क्रिकेटचे तीन प्रकार पाहतो. त्यानुसार खेळाचा विकास करणंही महत्त्वाचं आहे. कसोटी क्रिकेट महत्त्वाचं आहेच, पण सध्या सुरू असलेला  पॉवर गेमही महत्त्वाचा आहे. चेंडू उचलून मारलास आणि हवेत उडाला म्हणून शिक्षा होते हे आठवतं तुला, पण तो आता तो काळ राहिलेला नाही, गेम बदलला.क्रिकेटमध्ये करिअर करायचं तर अजून एक गोष्ट कर. खेळ बदलला आता, त्यामुळे तू एका एजंटची निवड कर. खेळाडूंना एजंट वगैरे असण्याचा काळ नव्हता एकेकाळी मला मान्य आहे. पण त्यामुळे  अनेकदा आपल्याला नेमकं  काय करायचं हे समजतच नाही. एक चांगला एजंट सोबत हवा, तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर. क्रिकेट व्यतिरिक्त ज्या अन्य गोष्टी असतील त्या एजंटला सांभाळू दे.   प्रोफेशनल एजन्सीबरोबर काम केलं तर बरेच प्रश्न सुटू शकतात. तेव्हा नव्या जगाचं हे नवंपणही स्वीकार.मुळात खेळाचं सारं कल्चरच बदललं. कमर्शिअल गोष्टी वाढल्या आहेत, हे समजून घ्यावंच लागेल.  जे काही बदल झाले आहेत ते प्रभावीपणे समजून घ्यायला हवेत. त्यांचा त्नास होता कामा नये किंवा त्यामुळे आपल्या वाटेत कोणतेही अडथळेही येता कामा नयेत. जे आपल्याला आवडत नाही ते सारं आपल्यासाठी बदलेल असा जर विचार करणार असशील तर लक्षात ठेव, तसं काहीही होणार नाही. जी काही खेळसंस्कृती बदललेली आहे ती आत्मसात कशी करून घेता येईल, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरेल.सध्या ट्वेन्टी-20 क्रि केट चांगलंच प्रसिद्ध होतं आहे, त्यासाठी आपल्या खेळामध्ये सुधारणा करणं तुझ्यासाठी महत्त्वाचं ठरेल. या सार्‍या गोष्टींबाबत तुम्ही लवचीक किंवा परिवर्तनशील अर्थात फ्लेक्झिबल असायला हवं. हे बदल एकेकाळी जरा हळूहळू होत होते. बघ ना, 1877 साली पहिला कसोटी सामना खेळला गेला, त्यानंतर 1975 साली 60 षट्कांचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक खेळवला गेला. किती हळू झाले हे बदल. आता क्रिकेटमध्ये फटाफट बदल होतात. त्या वेगाकडे जरा लक्ष ठेव.एकेकाळी सुट्टी असली की, सकाळी 9.30 वाजता खाली खेळायला जायचो आणि फक्त जेवायला घरी यायचो. कितीही काही खाल्लं तरी वजन वाढायचं नाही. खेळणं खूप व्हायचं. लोकांशी तेव्हाच खूप गप्पा व्हायच्या. जिंकणं-हरणं सुरू होतंच, भांडणंही व्हायची; पण ती  कशी सोडवायची, हे आपलं आपण शिकता यायचं. कुठल्या गोष्टीवर कसा मार्ग काढायचा, हे शिकता यायचं.  स्वतर्‍हून शिकणं असा हा मार्ग होता. हल्ली शिकणं बंद आणि अमुक कर हे सांगणं जास्त असं जरा होताना दिसतं आहे. स्वतर्‍हून झटपट विचार करणं किंवा निर्णय घेणं, महत्त्वाचं आहे. ते सोडू नकोस. तंत्रज्ञानाचा परिणाम आपल्या मानसिक-शारीरिक ताणावर आणि आरोग्यावर कसा होतो हे पण जरा बारकाईने बघ.आणि स्वतर्‍च शिकत राहा. शिकत राहा कायम. 

(तंत्राचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेला एकेकाळचा आघाडीचा माजी क्रिकेटपटू. आणि आता ख्यातनाम समालोचक आणि स्तंभलेखक)