नव्या भारतीय तारुण्याची ओळख सांगणार्‍या ११ गोष्टी

By Admin | Updated: September 11, 2014 17:20 IST2014-09-11T17:20:26+5:302014-09-11T17:20:26+5:30

सध्या व्हॉट्स अँप आणि फेसबुकवर एक नवीनच ट्रेण्ड सुरू आहे. अमुकतमुकची ओळख सांगणार्‍या १0 गोष्टी, ११ गोष्टी, १२ गोष्टी. तरुण मुलं-मुली ते वाचतात आणि तुफान शेअर करतात. सध्या सगळ्यात जास्त फॉरवर्ड होत असलेला असाच हा एक मेसेज.

11 things that introduce new Indian youth | नव्या भारतीय तारुण्याची ओळख सांगणार्‍या ११ गोष्टी

नव्या भारतीय तारुण्याची ओळख सांगणार्‍या ११ गोष्टी

>सध्या व्हॉट्स अँप आणि फेसबुकवर एक नवीनच ट्रेण्ड सुरू आहे. अमुकतमुकची ओळख सांगणार्‍या १0 गोष्टी, ११ गोष्टी, १२ गोष्टी. तरुण मुलं-मुली ते वाचतात आणि तुफान शेअर करतात. सध्या सगळ्यात जास्त फॉरवर्ड होत असलेला असाच हा एक मेसेज.
अर्थात फॉरवर्डेडच.
‘11  थिंग्ज दॅट ट्रली डिफाईन न्यू इंडियन जनरेशन’
अशी टॅगलाइन असलेला हा मेसेज. 
तो म्हणतो, की आजची भारतातली तरुण पिढी पूर्वीच्या पिढय़ांसारखी अजिबात नाही. त्यांचा चेहरामोहरा, भाषा, अँटिट्यूड, आत्मविश्‍वास सगळंच बदललंय. त्यांच्या आशा आकांक्षा वेगळ्या आहेत, आणि त्यांच्यातली आगही वेगळी आहेत आणि स्वप्नंही. मुळात ते फर घाईत आहेत. त्यांना घाई आहे पुढे सरकायची. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याची. जगण्याची!
त्याच तारुण्याचे ११ ट्रेण्ड्स हा मेसेज सांगतो.
काय आहेत ते.?
 
१  मोठं होऊन कोण बनणार? डॉक्टर किंवा इंजिनिअर, असं टिपीकल उत्तर ते आता देत  नाहीत. ते धाडस करतात वेगळ्या वाटा निवडतात. वेगळं, नवीन आणि आपल्या मनासारखं करिअर निवडण्याकडे त्यांचा कल सहज दिसतो.
 
२ आता ते गप्प बसायला तयार नाहीत. स्वत:वर, आपल्या मित्र-मैत्रिणींवर किंवा समाजात कुणावरही अन्याय झाला, तर ते आवाज उठवतात. ब्लॉग लिहितात, ट्विट करतात, फेसबुकवर पोस्ट करतात. मोर्चे काढतात. पण बोलतात. व्यवस्थेने आपलं म्हणणं ऐकलंच पाहिजे म्हणून बोलत राहतात. गप्प बसणं आता त्यांना 
मान्य नाही.
 
 
३ ते मोठ्ठी, अशक्य वाटणारी स्वप्नं पाहतात. आपल्याला कसं जमेल, असे प्रश्न ते स्वत:ला विचारत नाहीत. त्यापेक्षा ते रिस्क घेतात, डेअरिंग करतात आणि आपल्याला जे हवं ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
 
४ तुझं वय काय, तू बोलतोस किती अशा जुन्या नियमांना ते दाद देत नाहीत. वय कितीही लहान असो, गुणवत्ता असेल, तर आपण पुढे जाऊच शकतो, असं म्हणत ते सरळ परफॉर्म करतात 
आणि लहान वयात मोठय़ा यशाची स्वप्नं पाहतात. त्यासाठी कष्ट करतात.
 
५ तोडा-फोडाची भाषा त्यांना आवडत नाही. आपल्या देशातली एकी आणि सगळ्यांना घेऊन होणारा विकास हेच त्यांना फार महत्त्वाचं वाटतं. त्यांना शांतता हवी आहे, आणि विकासही.
 
६ ते धाडसी आहेतच, पण ते धाडस त्यांच्या बदलत्या आवडीनिवडीतही दिसतं. काहीजण नियमित दर आठवड्याला ट्रेकला जातात. काही बाईक मोहिमा काढतात. डोंगरदर्‍यात जाऊन राहतात. ते पुरेपूर जगतात, सुरक्षित चाकोरी त्यांना बांधू शकत नाही.
 
७ ते खर्‍या अर्थानं ग्लोबल आहेत. जगात काय चाललंय याचं त्यांना भान आहे. पॉलिटिक्स ते तंत्रज्ञान सगळ्या विषयांत लेटेस्ट काय, ‘ट्रेडिंग’ काय हे त्यांना माहिती असतं. 
 
 
८ ते ओपन माईण्डेड आहेत. गे-लेस्बियन यासारख्या विषयांवर ते जाहीर भूमिका घेतात. जगण्याचे हक्क मागतात. पूर्वीसारखे ते अशा नाजूक विषयांवर बोलायला कचरत नाहीत. इंटरनेट हाताशी असल्यानं ते शास्त्रीय माहिती वाचतात, मगच आपली मतं ठरवतात. वेगळं जग, वेगळ्या विचारधारा, वेगळी संस्कृती समजून घेण्याची, वेगळे विचार ऐकण्याची त्यांची तयारी आहे.
 
 
९ सतत आई-बाबांकडे पैशासाठी हात पसरणं त्यांना आवडत नाही. ते लवकर आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात. उभे राहतात. स्वत: कमवतात. लवकर स्वतंत्र होतात. फक्त इंडिपेंडण्ट असण्याच्या बाता ते मारत नाहीत, तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन आपला भार आपण उचलतात. ते सेल्फ मेड असणं त्यांना फार महत्त्वाचं वाटतं.
 
 
१0 जे रुचत नाही, जे आवडत नाही, ते ‘बदलण्याची’ त्यांची तयारी आहे. चेंज हा त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा शब्द आहे. पॉलिटिक्स असो, सरकारी यंत्रणा किंवा व्यक्तिगत आयुष्य जे छळतं, जे डाचतं ते बदलायची त्यांची तयारी आहे. नव्हे ते बदलायचंच असं त्यांनी ठरवून टाकलं आहे.
 
११ ‘ओह, येस अभी’ अशी ही जनरेशन आहे. नंतर पाहू, मग करू, हे त्यांना फारसं रुचत नाही. आला क्षण पूर्ण आनंदात जगून घ्यायचा, मजा करायची हे त्यांचं साधं लॉजिक आहे.
 
( सौजन्य - scoopwhoop.com)
 
 

Web Title: 11 things that introduce new Indian youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.