शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

108 कुंभातला जिगरी दोस्त

By admin | Updated: September 24, 2015 15:43 IST

कुंभमेळ्यातल्या आपत्कालीन मदतीचं म्हणजेच 108 चं संयोजन करणारा एक तरुण डॉक्टर, सांगतोय त्यानं निभावलेल्या एका आरोग्य कुंभाची गोष्ट..

 मुलाखत आणि शब्दांकन-  भाग्यश्री मुळे
 
मी मूळचा चंद्रपूरचा. बारावीर्पयतचं शिक्षण नागपूरला झालं. पुण्यात बीएएमएसला नंबर लागला. डॉक्टर व्हायचं असं काही ठरवलं नव्हतं. मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोन्हीकडे प्रवेश मिळत होता.
पण मी डॉक्टर व्हावं अशी आईची इच्छा होती. म्हणून मेडिकलला गेलो. मनात एक प्रसंग घर करून होताच. माङया बहिणीला मुलगा झाला. तीन दिवसांनी अचानक त्याच्या हार्टबिट वाढल्या. डॉक्टरांनी बाळाला तत्काळ चंद्रपूरहून नागपूरला हलवायला सांगितलं. त्याकाळी अॅम्ब्युलन्समधेही फार सोयी नसत.  कसेबसे नागपूरला पोहोचलो. सुदैवाने बाळाला वेळेत योग्य ते सर्व उपचार मिळाले. त्याक्षणी इमजर्न्सी म्हणजे काय आणि इमजर्न्सीत रुग्णाला वाचवणं कसं गरजेचं असतं, हे लक्षात आलं. तेव्हाच मनात होतं की, डॉक्टर झालोच तर असं काही काम करीन! 
डॉक्टर झालो. सिम्बॉयसिस कॉलेजमधून अमेरिकन हार्ट इन्स्टिटय़ूटचा ‘इमजर्न्सी कोर्स’ पूर्ण केला. त्याचवेळी महाराष्ट्र शासनाने 1क्8 ही महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना जाहीर केली. जाहिरातीनुसार मी मुलाखतीला गेलो. निवड झाली, प्रशिक्षण झाले आणि ‘इमजर्न्सी आरोग्य’ नावाच्या क्षेत्रतली माझी सफर सुरू झाली. मुंबई, रायगड, ठाणो येथील दंगल, बस, रेल्वे अपघात, दरड कोसळणो अशा घटनांना जाऊन तत्काळ मदत करणं, रुग्णांना त्यांच्या स्थितीनुसार आरोग्यसेवा देणं, परिस्थिती हाताळणं या गोष्टी सुरू झाल्या.
त्याच अनुभवाच्या शिदोरीवर कुंभमेळ्यात कामाला आलो.  त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्यात 1क्8 या अॅम्ब्युलन्स सेवेद्वारे आरोग्य यंत्रणा हाताळायची असं ठरल्यानंतर त्याच्या समन्वयाची जबाबदारी माङयावर आली. पोटात थोडा भीतीचा गोळा उठला. पण वाटलं, जमेल आपल्याला! काम सोपं नव्हतंच. मागील सिंहस्थाचे जे जे संदर्भ साहित्य आहे ते ते अभ्यासायचं असे आमच्या टीमनं ठरवलं. त्यानुसार मागील कुंभमेळ्याचा शासकीय अहवाल, वृत्तपत्रीय कात्रणं, व्हिडीओ, ऑडिओ, उज्जैन, अलाहाबाद इथले कुंभमेळे यांचा अभ्यास केला. त्यातून कुंभमेळ्यातील आरोग्यस्थिती समजावून घेतली. जून 2015 पासून त्र्यंबक-नाशिकला दाखल झालो. महाराष्ट्रभरातल्या 80 अॅम्ब्युलन्स दोन्ही ठिकाणी असतील असे निश्चित झाल्यावर त्यात काम करणा:या डॉक्टर, सिस्टर, ब्रदर, ड्रायव्हर, स्वयंसेवक यांना तीन दिवसांचं रिफ्रेशमेंट ट्रेनिंग दिलं. कुंभमेळ्यात डय़ूटी बजावताना काय काळजी घ्यायची, काय टाळायचे याची माहिती दिली. महाराष्ट्रभरातून कुंभमेळ्याच्या काळात वैद्यकीय सेवा द्यायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केलेल्या डॉक्टरांना त्र्यंबक-नाशिकच्या विविध ठिकाणांची माहिती देऊन कोण कुठे काम करेल याचा एक आराखडा तयार केला.
कुंभमेळ्यात भाविकांबरोबरच साधूंनाही सेवा द्यायची असल्याने साधू कसे असतात, ते आपल्याला सहकार्य करतील की नाही अशी भीती सुरुवातीला होती. मात्र आमच्या अॅम्ब्युलन्सद्वारे दिवसातून दोनदा प्रत्येक आखाडय़ात राउंड व्हायला लागल्यामुळे साधू-महंतांशी ओळख होऊ लागली. पण नंतर ते आम्हाला चहा-नाश्त्याचा आग्रह करू लागले. 
पाच बाळांचा 
अॅम्ब्युलन्समध्ये जन्म 
कुंभमेळा सुरू झाल्यापासून अत्यवस्थ होणारे, जखमी होणारे, अचानक मधुमेह, हृदयविकाराचा त्रस होणारे साधू-भाविक यांच्यावर उपचार करतानाच 1क्8 ला आलेल्या कॉलनुसार त्र्यंबक व नाशिक तालुक्यातील चार महिलांची गुंतागुंतीची बाळंतपणं दवाखान्यात पोहोचेर्पयत अॅम्ब्युलन्समधेच झाली. एका महिलेला तर जुळी बाळं झाली. अतिदुर्गम भागात अॅम्ब्युलन्स नेताना आणि तिथून खाच-खळग्यांच्या, खड्डय़ांच्या रस्त्यांतून प्रसूती वेदना सुरू झालेल्या महिलेला, तसेच इतरही अत्यवस्थ रुग्णांना आणताना किती कसरत करावी लागते याचाही अनुभव आला. त्र्यंबकला कुंभमेळ्यात सेवा देण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचारी, इतर प्रशासकीय यंत्रणोलाही वैद्यकीय सेवा देताना चांगले अनुभव आले. 1क् ऑक्टोबर्पयत येथे 3क् अॅम्ब्युलन्स पूर्णवेळ कार्यरत राहणार आहेत.
डॉ. भागवत लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनुपम वानखेडे, डॉ. नीलेश गावंडे, सर्व प्रकारची परिस्थिती सांभाळू शकणारे तज्ज्ञ डॉक्टर, सिस्टर, ब्रदर अशी 27क् जणांची टीम या आरोग्यकुंभात सहभागी झाली होती. त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयातील सर्व सहकारी डॉक्टर, सर्व स्टाफ सोबत होताच. 
हा कुंभ माङयासाठी तरी सर्व प्रकारच्या शिक्षणाचा एक सागर ठरला आणि पदोपदी माणुसकीही भेटत गेली.
 
- डॉ. प्रशांत घाटे को-ऑर्डिनेटर, 108 अॅम्ब्युलन्स सर्व्हिस
 
 
108 आहे काय?
 
108 ही अॅम्ब्युलन्स सेवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर चालते. एन.आर.एच.एम. म्हणजे नॅशनल रुरल हेल्थ मिशन (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान) आणि बी.व्ही.जी. अर्थात भारत विकास ग्रुप या दोन संस्थांच्या समन्वयातून ही यंत्रणा चालते. बीव्हीजी ही पुण्यातली एक मोठी सव्र्हिस प्रोव्हायडिंग कंपनी असून, ती महाराष्ट्रभरातले सर्व कॉल अटेंड करणो, त्यानुसार अॅम्ब्युलन्स पाठविणो, रुग्णांवर उपचार करणो, त्याचा फिडबॅक घेणो, डॉक्टर, स्टाफ, ड्रायव्हर, मेडिसीन, इक्विपमेंट आदिंचे नियोजन ठेवणो आदि कामे केली जातात. ही योजना सुरू करणारे महाराष्ट्र 17 वे राज्य असून, केवळ महाराष्ट्रातल्याच अॅम्ब्युलन्समधे तज्ज्ञ डॉक्टर असल्याने रुग्णांवर घटनास्थळीच तत्काळ उपचार करणो शक्य होते. इतर राज्यांमधे या अॅम्ब्युलन्समधे केवळ सिस्टर, ब्रदर असा स्टाफ असतो. त्यामुळे दवाखान्यात पोहोचल्यावरच रुग्णावर उपचार केले जातात. शहरी भागात कॉल आल्यापासून 2क् मिनिटांत आणि ग्रामीण भागात 3क् मिनिटांत अॅम्ब्युलन्स रुग्णार्पयत पोहोचून त्याच्यावर उपचार झाले पाहिजे असा स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे.
त्यामुळे संकटसमयी 1क्8 ची मदत कुणीही मागू शकतं.