शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वेने मालिका जिंकली

By admin | Updated: July 11, 2017 01:58 IST

झिम्बाब्वेने पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात यजमान श्रीलंकेला ३ विकेट्सने नमवून मालिका ३-२ अशी जिंकली.

हंबनटोटा : आॅफ स्पिनर सिकंदर रजाच्या शानदार फिरकीनंतर सलामीवीर हॅमिल्टन मसाकद्जा याने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात यजमान श्रीलंकेला ३ विकेट्सने नमवून मालिका ३-२ अशी जिंकली. विशेष म्हणजे, झिम्बाब्वेने गेल्या आठ वर्षात पहिल्यांदा विदेशामध्ये मालिका जिंकली आहे. श्रीलंकेन दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने हॅमिल्टनच्या ७३ धावांच्या खेळीच्या जोरावर बाजी मारली. हॅमिल्टनने ८६ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह आपली खेळी सजवली. त्याच्याशिवाय सोलोमन मायर (४३) याच्यासह ९२ धावांची सलामी करत हॅमिल्टनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर हॅमिल्टन - तारिसाई मुसाकांदा (३७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. झिम्बाब्वेने फलंदाजांच्या जोरावर ३८.१ षटकात ७ बाद २०४ धावा काढल्या. सामनावीर ठरलेल्या रजाने अंतिम क्षणी महत्त्वपुर्ण खेळी करताना २७ चेंडूत एक चौकार व दोन षटकारांसह नाबाद २७ धावा चोपल्या. तत्पूर्वी, रजाच्या (३/२१) भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा डाव मर्यादित राहिला. ग्रीम केमरनेही (२/२३) चांगला मारा करुन लंकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. सलामीवीर धनुष्का गुणतिलका (५२) आणि असेला गुणरत्ने (नाबाद ५९) यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना छाप पाडण्यात अपयश आले. एकवेळ लंकेची ४२व्या षटकात ८ बाद १५३ धावा अशी अवस्था होती. परंतु, गुणरत्ने आणि दुष्मंता चमीरा (नाबाद १८) यांनी नवव्या विकेटसाठी नाबाद ५० धावांची भागीदारी करुन संघाला दोनशेच्या पुढे मजल मारुन दिली.