शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

पहिल्या दिवशी झिम्बाब्वेचे वर्चस्व

By admin | Updated: July 15, 2017 00:44 IST

झिम्बाब्वेने श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारपासून प्रारंभ झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात आज दिवसअखेर पहिल्या डावात ८ बाद ३४४ धावांची मजल मारली.

कोलंबो : मधल्या फळीतील फलंदाज के्रग इर्विनच्या शानदार नाबाद शतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारपासून प्रारंभ झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात आज दिवसअखेर पहिल्या डावात ८ बाद ३४४ धावांची मजल मारली. इर्विन १५१ धावा काढून खेळत असून ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे. त्याने २३८ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व १ षटकार लगावला. इर्विनच्या खेळीमुळे झिम्बाब्वेने आपल्या कसोटी क्रिकेट इतिहासात एका दिवसातील सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम नोंदविला. यापूर्वी वन-डे मालिकेत ३-२ ने विजय मिळवणाऱ्या झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण त्याच्या आघाडीच्या फळीला विशेष छाप सोडता आली नाही. एकवेळ त्यांची ३ बाद ३८ अशी अवस्था झाली होती. इर्विनने जबाबदारी स्वीकारताना एका टोकाकडून गडी बाद होणार नाही याची खबरदारी घेतली. इर्विनने शतकी खेळीदरम्यान सिकंदर रजासोबत (३६) पाचव्या विकेटसाठी ८४ तर मॅलकम वॉलेरसोबत (३६) सताव्या विकेटसाठी ६५ धावांची उपयुक्त भागीदारी केल्या. दिवसअखेर इर्विनला डोनाल्ट टिरिपानो (नाबाद २४) याची चांगली साथ लाभली. या दोघांनी आतापर्यंत नवव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली आहे. श्रीलंकेला सकाळच्या सत्रात डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने यश मिळवून दिले, पण त्यानंतरच्या सत्रात मात्र त्यालाही अपेक्षित यश मिळाले नाही. हेराथने १०६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. असेला गुणरत्नेने २८ धावांत दोन तर दिलरुवान परेरा व लाहिरू कुमारा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.