शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

झांझरिया,सरदार सिंह यांना खेलरत्न तर  पुजारा, हरमनप्रीत कौरसह 17 जणांचा अर्जुन पुरस्काराने होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 16:15 IST

दोन वेळेचा पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग यांना 2017 चा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली, दि. 22- दोन वेळेचा पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग यांना 2017 चा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णविजेता असलेला पहिला भारतीय दिव्यांग खेळाडू झांझरिया याच्या नावाला न्या. सी. के. ठक्कर (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्रथम पसंती दिली होती.  तसंच क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी हरमनप्रीत कौर, गोल्फपटू एस.एस.पी. चौरसिया आणि टेनिसपटू साकेत मैनेने यांच्यासह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाने सन्मानित करण्यात येणार आहे. 

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. तर, अर्जुन पुरस्कार हा  क्रीडा क्षेत्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूला राष्ट्रपतींच्या हस्ते एक पदक आणि एक प्रमाणपत्रासह साडे सात लाख रुपयांची रक्कम दिली जाते. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याने तब्बल  10 वर्षे आंतरराष्ट्रीय हॉकीत भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच, सरदार सिंहने आठ वर्षे भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. तर 35 वर्षीय देवेंद्र झाझरियाने 2004 आणि 2016 सालच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीच्या दोन सुवर्णपदकांची कमाई करुन दिली आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेला देवेंद्र हा पहिलाच पॅरालिम्पिक खेळाडू ठरला आहे.

 2016 मध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने विश्वविक्रम रचत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं होतं. विशेष म्हणजे अथेन्स येथे २००४ साली झालेल्या पॅरालिम्पिकमध्येही देवेंद्रने सुवर्णपदक पटकावलं होतं. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ३६ वर्षीय देवेंद्रने ६३.९७ मीटर भालाफेक करून विश्वविक्रम रचला. अथेन्समध्ये त्याने ६२.१५ मीटर भालाफेक केला होता. राजस्थानचा असलेला देवेंद्रला २००४ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला पॅरालिम्पियनपटू आहे. 

अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे खेळाडू : व्ही. जे. सुरेखा (तिरंदाजी, खुशबीर कौर (अ‍ॅथलेटिक्स), आरोकिन राजीव (अ‍ॅथलेटिक्स), प्रशांतीसिंग (बास्केटबॉल), एल. देवेंद्रोसिंग (बॉक्सिंग), चेतेश्वर पुजारा (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (क्रिकेट), ओयनाम बेमबेम (फुटबॉल), एसएसपी चौरसिया (गोल्फ), एस. व्ही. सुनील (हॉकी ), जसवीरसिंग (कबड्डी), पी. एन. प्रकाश ( नेमबाजी), ए. अंमलराज (टेबल टेनिस), साकेत मायनेनी (टेनिस), सत्यव्रत कादियाना (कुस्ती), मणियन थंगावेलू (पॅरा अ‍ॅथलिट) आणि वरुण भाटी (पॅरा अ‍ॅथलिट). 

टॅग्स :BCCIबीसीसीआय