झहीर अब्बास आयसीसीचे नवे अध्यक्ष

By Admin | Updated: June 26, 2015 01:14 IST2015-06-26T01:14:23+5:302015-06-26T01:14:23+5:30

पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे अध्यक्ष नेमण्यात आले आहे

Zaheer Abbas is the new chairman of the ICC | झहीर अब्बास आयसीसीचे नवे अध्यक्ष

झहीर अब्बास आयसीसीचे नवे अध्यक्ष

बार्बाडोस : पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे अध्यक्ष नेमण्यात आले आहे. आयसीसीच्या वार्षिक आमसभेत ही घोषणा करण्यात आली. वर्षभरासाठी त्यांची नेमणूक असेल. आपले नामांकन मंजूर केल्याबद्दल त्यांनी आयसीसीचे आभार मानले.
झहीर म्हणाले, ‘महान खेळाच्या संचालनालयाचा प्रमुख बनून मी स्वत:ला धन्य मानतो. या खेळाने मला वेगवेगळ्या भूमिकांद्वारे मैत्री, सन्मान, ओळख आणि सेवा करण्याची संधी दिली. या खेळाने मला जे दिले त्याचे ऋण मी कधी फेडू शकणार नाही. मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. आयसीसी सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून खेळाची लोकप्रियता सर्वदूर पोहोचविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.’ आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी झहीर यांचे अभिनंदन करताना झहीर हे प्रतिष्ठित क्रिकेटपटू असून महान खेळाचे दूत आहेत, असे संबोधले. (वृत्तसंस्था)

Web Title: Zaheer Abbas is the new chairman of the ICC