नवी दिल्ली : आगामी टी-२० विश्वकप स्पर्धेत दिग्गज फलंदाज युवराज सिंगची संघातील उपस्थिती महत्त्वाची आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. युवराज संघाचा महत्त्वाचा सदस्य असायला हवा, असेही ते म्हणाले.एका खासगी वाहनीसोबत बोलताना गावसकर म्हणाले, ‘युवराजने आॅस्ट्रेलियात बळी घेतले आणि अखेरच्या लढतीत मोक्याच्या क्षणी शानदार फलंदाजी करताना संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. उपखंडात त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये निश्चितच स्थान मिळायला पाहिजे. युवराजने शक्ती गमावलेली नसून त्याच्याबाबत भारताने संयम बाळगायला हवा. युवराजला सूर गवसला तर तो महत्त्वाची भूमिका बजावतो.’गावसकर पुढे म्हणाले, ‘तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आॅस्ट्रेलियाचा सफाया करणाऱ्या भारतीय संघाला आगामी आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेत कायम ठेवायला पाहिजे.’ (वृत्तसंस्था)
विश्वकप स्पर्धेत युवराजची उपस्थिती महत्त्वाची : गावसकर
By admin | Updated: February 2, 2016 03:19 IST