युवराजच्या एक्स गर्लफ्रेंडचा होणार घटस्फोट

By Admin | Updated: June 6, 2017 21:17 IST2017-06-06T21:17:02+5:302017-06-06T21:17:02+5:30

मोहोब्बते फेम अभिनेत्री किम शर्मासोबत युवराजचे अनेक वर्षं अफेअर होते. किम शर्मा सर्वात अगोदर युवराज सिंहला डेट करत होती पण

Yuvraj's ex boyfriend will be divorced | युवराजच्या एक्स गर्लफ्रेंडचा होणार घटस्फोट

युवराजच्या एक्स गर्लफ्रेंडचा होणार घटस्फोट

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - मोहोब्बते फेम अभिनेत्री किम शर्मासोबत युवराजचे अनेक वर्षं अफेअर होते. किम शर्मा सर्वात अगोदर युवराज सिंहला डेट करत होती पण युवराजच्या आईला किम पसंत नसल्याने त्यांचे नातं टिकलं नाही. त्यानंतर युवराजने हेजलशी लग्न केलं. तर युवराजशी ब्रेकअप झाल्यानंतर किमने अली पुंजाशी आपला संसार थाटला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, अली पुंजानीने एका दुसऱ्या महिलेसाठी अभिनेत्री किम शर्माला सोडल्याचे समजत आहे. दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. विशेष म्हणजे केवळ एक आठवडा डेटींग केल्यानंतर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला होता. हॉटेल व्यावसायिक अली पुंजानीसोबत विवाह केल्यानंतर किम केनियात सेटल झाली होती. पण आता किम मुंबईत परतली असून तिने बॉलिवूडमध्ये पुन्हा काम शोधण्यास सुरुवात केली आहे.
2010 मध्ये किमने केनियात राहणाऱ्या अली पुंजानीसोबत मोम्बासा येथे विवाह केला होता. अलीसोबत लग्न केल्यानंतर किमने तिचे बॉलिवूड करिअर सोडून दिले होते आणि ती अलीला बिझनेसमध्ये मदत करत होती. अलीच्या हॉटेल चेनची ती सीईओ होती. पण आता घर, पदभार सर्व सोडून परत आल्यामुळे किमला आर्थिक चणचण भासत आहे. किम मुंबईतच काम करुन तिथेच बिझनेस करु इच्छित आहे असे समजते.
किम मुंबईला आल्यानंतर तिचे नाव मुंबईतील फॅशन डिजाईनर अर्जून खन्नासोबत जोडले जात आहे. दोघांना अनेकवेळा सोबत पाहण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर 21 जानेवारी 2017 ला आपल्या वाढदिवशी किम अर्जूनसोबत गोव्याला होती. अर्जून खन्ना हा विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीचे नाव शेफाली आहे.
दरम्यान, अली पुंजानीसोबत विवाहाच्या अगोदर किम शर्मा स्पॅनिश बॉयफ्रेंड कडर्लोस मार्टीनला डेट करत होती. या दोघांचा साखरपूडाही झाला होता आणि लग्नानंतर मॅड्रिड येथे ती शिफ्ट होणार होती. पण काही कारणांमुळे साखरपूडा मोडला गेला आणि त्यानंतर किमने अली पुंजानीसोबत विवाह केला.

Web Title: Yuvraj's ex boyfriend will be divorced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.