युवराजची लिलावातील किंमत बाजारावर आधारित होती : डेअरडेव्हिल्स
By Admin | Updated: May 12, 2015 00:30 IST2015-05-12T00:30:19+5:302015-05-12T00:30:19+5:30
आयपीएलच्या लिलावामध्ये युवराजसिंगची किंमत १६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली; पण लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी

युवराजची लिलावातील किंमत बाजारावर आधारित होती : डेअरडेव्हिल्स
नवी दिल्ली : आयपीएलच्या लिलावामध्ये युवराजसिंगची किंमत १६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली; पण लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतही फ्रँचायझीचा या स्टार खेळाडूला पाठिंबा आहे, असे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे सीईओ हेमंत दुआ यांनी म्हटले आहे. युवराजने यंदाच्या मोसमात १२ सामन्यांत १८.६३च्या सरासरीने केवळ २०५ धावा फटकावल्या डेअरडेव्हिल्स संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर फेकल्या गेला आहे.
डेअरडेव्हिल्सचे सीईओ दुआ म्हणाले, ‘‘आपण १४ कोटी, १६ कोटी रुपयांबाबत चर्चा करतो; पण ते सर्व बाजारावर निर्धारित असते.
युवराजने विशाखापट्टणममध्ये हेच स्पष्ट केले होते. त्याने कधीच या किमतीची मागणी केली नव्हती. त्याची किंमत बाजारावर
आधारित होती. त्याला कमी
किमतीत करारबद्ध करण्यास उत्सुक होतो; पण बोली सुरू झाल्यानंतर त्यात मोठी वाढ झाली.’’
दुआ पुढे म्हणाले, ‘‘युवराजची किंमत १६ कोटी रुपये ठरावी, असे आम्हाला वाटत होते का? फ्रँचायझी म्हणून त्याला कमीत कमी किमतीमध्ये करारबद्ध करण्यास प्रयत्नशील होतो. प्रतिस्पर्धी फ्रँचायझी त्याची किंमत वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे युवराजची किंमत बाजरभावाने निश्चित झाली.’’
(वृत्तसंस्था)