युवराजसिंग संघासाठी महत्त्वपूर्ण : धोनी

By Admin | Updated: March 3, 2016 04:10 IST2016-03-03T04:10:46+5:302016-03-03T04:10:46+5:30

गेल्या काही वेळांपासून फॉर्मबाबत टीकेचा सामना करावा लागणाऱ्या युवराजसिंग याच्या कामगिरीवर आनंद व्यक्त करताना कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने युवराजची फक्त एखाद्या सामन्यासाठी नाही

Yuvraj Singh is important for the team: Dhoni | युवराजसिंग संघासाठी महत्त्वपूर्ण : धोनी

युवराजसिंग संघासाठी महत्त्वपूर्ण : धोनी

मीरपूर : गेल्या काही वेळांपासून फॉर्मबाबत टीकेचा सामना करावा लागणाऱ्या युवराजसिंग याच्या कामगिरीवर आनंद व्यक्त करताना कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने युवराजची फक्त एखाद्या सामन्यासाठी नाही, तर टीम इंडियाला त्याची सातत्याने आवश्यकता असल्याचे सांगितले.
श्रीलंकेविरुद्ध विजयासह भारताने आशिया चषकमध्ये फक्त विजयाचीच हॅट्ट्रिक पूर्ण केली नाही, तर स्पर्धेतील अंतिम फेरीतील प्रवेशही निश्चित केला आहे. त्यामुळे आनंदित झालेल्या कर्णधार धोनीने सामन्यानंतर म्हटले, ‘‘कामगिरीत सातत्य खूपच आवश्यक आहे आणि ते पुढेही कायम ठेवावे लागेल, असे मला वाटते.’’ संघातील सर्वच खेळाडूंसाठी आपले योगदान देणे महत्त्वाचे आहे आणि युवराजने ज्याप्रमाणे कामगिरी केली ती निश्चितच महत्त्वाची ठरल्याचे धोनीला वाटते.

Web Title: Yuvraj Singh is important for the team: Dhoni