युवराज बाहेर; संजू, कर्णला संधी

By Admin | Updated: August 6, 2014 01:33 IST2014-08-06T01:33:09+5:302014-08-06T01:33:09+5:30

इंग्लंडविरुद्ध 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यानहोणा:या पाच एकदिवसीय आणि एका टी-20 लढतीसाठी भारतीय संघातून डच्चू मिळाला आहे.

Yuvraj out; Sanju, Karna opportunity | युवराज बाहेर; संजू, कर्णला संधी

युवराज बाहेर; संजू, कर्णला संधी

मुंबई : भारताचा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज युवराजसिंग आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला  इंग्लंडविरुद्ध 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यानहोणा:या पाच एकदिवसीय आणि एका टी-20 लढतीसाठी भारतीय संघातून डच्चू मिळाला आहे. केरळचा युवा यष्टिरक्षक संजू सॅमसन व रेल्वेचा लेगस्पिन अष्टपैलू खेळाडू कर्ण शर्मा या नव्या चेह:यांना संघात स्थान देण्यात अले आहे. 
 अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत भारतीय संघाची आज निवड करण्यात आली. युवराजसिंग आपली शेवटची वनडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये खेळला होता. सातव्या आयपीएलमध्ये तो सर्वात महागडा खेळाडू होता. (क्रीडा प्रतिनिधी)
 
-आयपीएलमध्ये सर्वाधिक 14 विकेट घेणा:या 25 वर्षीय वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीलासुद्धा वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. 
 
-महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणो, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, अम्बाती रायडू, उमेश यादव, धवल कुलकर्णी, संजू सॅमसन आणि कर्ण शर्मा.  

 

Web Title: Yuvraj out; Sanju, Karna opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.