युवराज-बोल्ट आज आमनेसामने
By Admin | Updated: September 2, 2014 02:44 IST2014-09-02T02:44:48+5:302014-09-02T02:44:48+5:30
वेगवान धावपटू आणि ऑलिम्पिक विक्रमवीर युसेन बोल्ट मंगळवारी भारतीय चाहत्यांपुढे स्वत:चे कौशल्य पणाला लावण्याचा प्रयत्न करणार आहे.

युवराज-बोल्ट आज आमनेसामने
बेंगळुरू : वेगवान धावपटू आणि ऑलिम्पिक विक्रमवीर युसेन बोल्ट मंगळवारी भारतीय चाहत्यांपुढे स्वत:चे कौशल्य पणाला लावण्याचा प्रयत्न करणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराजसिंग आणि झहीर खान यांच्यासोबत मैत्री सामन्यात तो सहभागी होईल.
बोल्टच्या सात सदस्यांच्या संघात त्याचा घनिष्ठ मित्र नुगेंट वॉकर ज्युनियर, भारताचा ऑफ स्पिनर हरभजनसिंग यांचा; तर युवीच्या संघात त्याचा दीर्घकाळापासूनचा मित्र झहीर खान याचा समावेश आहे. याशिवाय दोन्ही संघांत एक तज्ज्ञ यष्टिरक्षक असेल. प्रत्येकी चार षटकांचा हा सामना चिन्नास्वामीवर रंगणार आहे. या सामन्यात माजी खेळाडू अजय जडेजादेखील खेळेल. चारही षटकांदरम्यान बोल्ट आणि युवी फलंदाजीसाठी मैदानावर उपस्थित राहतील. खेळाडू बाद झाल्यास संघाच्या चार धावा कमी केल्या जातील. बोल्टसाठी क्रिकेट नवे नाही. तो आपला सहकारी ािस गेलविरुद्धदेखील खेळला आहे. गेलला त्याने ‘क्लीन बोल्ड’ केले होते. 28 वर्षीय बोल्टचा आवडता क्रिकेटपटू पाकचा जलद गोलंदाज वकार युनूस आहे. हा सामना पाहण्यासाठी किती प्रेक्षक राहतील, हे मात्र आयोजकांनी गुलदस्तात ठेवले आहे. (वृत्तसंस्था)