युसूफचा ‘हायस्पीड’ विक्रम
By Admin | Updated: May 26, 2014 01:20 IST2014-05-26T01:20:08+5:302014-05-26T01:20:08+5:30
कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज युसूफ पठाण याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध अवघ्या १५ चेंडूंत वादळी अर्धशतकी खेळी करून इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे़

युसूफचा ‘हायस्पीड’ विक्रम
कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज युसूफ पठाण याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध अवघ्या १५ चेंडूंत वादळी अर्धशतकी खेळी करून इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे़ ख्रिस गेल आणि अॅडम गिलख्रिस्ट यांनी यापूर्वी आयपीएलमधील १७ चेंडूंतील अर्धशतकाच्या विक्रमाला मागे टाकले आहे़ पठाण याने केलेल्या २२ चेंडूंतील ७२ धावांच्या बळावर कोलकाताने काल, शनिवारी हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात सहज विजय मिळविला होता़ याच बळावर कोलकाताने आयपीएल गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर झेप घेतली होती़ याच सामन्यांत पठाण याने १५ चेंडूंत अर्धशतक साजरे करीत गेल आणि गिलख्रिस्टचा विक्रम मोडला होता़ गिलख्रिस्ट याने २००९ च्या आयपीएलमध्ये दिल्ली दिल्लीविरुद्ध १७ चेंडूंत अर्धशतकी खेळी केली होती, तर गेल याने २०१२ मध्ये पुणे वारियर्सविरुद्ध शानदार १७५ धावांची खेळी केली होती़ यादरम्यान त्याने आपले अर्धशतक केवळ १७ चेंडूंत पूर्ण केले होते़ हैदराबादविरुद्ध पठाण याने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला़ त्याने परवेज रसूलच्या एका षटकात २२ धावा केल्या,तर स्टेनच्या षटकात पठाणने २५ धावा कुटल्या़ यावेळी पठाणचा स्ट्राईक रेट ३२७़२७ असा होता़ गुणतालिकेत दुसरे स्थान मिळविण्यासाठी कोलकाताला १५़२ षटकांत विजयी लक्ष्य गाठावे लागणार होते़ जेव्हा युसूफ खेळपट्टीवर आला, तेव्हा कोलकाताला ४७ चेंडंूत १०६ धावांची गरज होती़ त्यानंतर पठाणला शून्यावर आणि १६ धावांवर जीवदानही मिळाले़ याचाच लाभ घेत त्याने गोलंदाजांची गोलंदाजी फोडून काढली़ (वृत्तसंस्था)