युसूफ पठाणची सटकली, प्रेक्षकाच्या श्रीमुखात लगावली
By Admin | Updated: December 24, 2014 15:53 IST2014-12-24T15:47:25+5:302014-12-24T15:53:00+5:30
रणजी सामना बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाच्या शेरेबाजीने संतापलेल्या युसूफने त्या प्रेक्षकाला ड्रेसिंग रुममध्ये बोलवून त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना समोर आली आहे.

युसूफ पठाणची सटकली, प्रेक्षकाच्या श्रीमुखात लगावली
ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. २४ - मैदानात आक्रमक खेळीने विरोधी गोलंदाजांची भंबेरी उडवणा-या युसूफ पठाणच्या आक्रमकपणाचा फटका एका प्रेक्षकालाही बसला. रणजी सामना बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाच्या शेरेबाजीने संतापलेल्या युसूफने त्या प्रेक्षकाला ड्रेसिंग रुममध्ये बोलवून त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना समोर आली आहे.
बडोदा येथे सध्या रणजी स्पर्धेत जम्मू काश्मीरविरुद्ध बडोदा हा सामना सुरु आहे.बडोद्यातर्फे खेळणारा युसूफ पठाण आणि अंबाटी रायडू ही जोडी मैदानात फलंदाजी करत असताना एक तरुण प्रेक्षक जोरजोरात शेरेबाजी आणि शिवीगाळ करत होता. याप्रकारामुळे युसूफ चांगलाच संतापला. बाद झाल्यावर युसूफ ड्रेसिंग रुममध्ये आला व त्याने त्या प्रेक्षकाला ड्रेसिंग रुममध्ये बोलवून घेतले. तो तरुण येताच युसूफने त्याच्या श्रीमुखात लगावली. या घटनेमुळे ड्रेसिंग रुममध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. शेवटी युसूफचा भाऊ इरफान पठाण तिथे आला व त्याने हे प्रकरण निस्तारले.
दरम्यान, सामनाधिकारी प्रसंता मोहापात्रा यांनी या घटनेची माहिती बीसीसीआयला दिली आहे. बीसीसीआय याप्रकरणी युसूफवर बंदी आणि दंडात्मक कारवाई करु शकते असे सूत्रांनी सांगितले.