युसूफने व्यवस्थापनावर फोडले पराभवाचे खापर

By Admin | Updated: April 22, 2015 00:26 IST2015-04-22T00:26:11+5:302015-04-22T00:26:11+5:30

पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफ याने बांगलादेशकडून वन-डे मालिकेत पाकिस्तान संघाला मिळालेल्या पराभवाचे खापर फोडताना

Yusuf blasted the management's defeat | युसूफने व्यवस्थापनावर फोडले पराभवाचे खापर

युसूफने व्यवस्थापनावर फोडले पराभवाचे खापर

कराची : पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफ याने बांगलादेशकडून वन-डे मालिकेत पाकिस्तान संघाला मिळालेल्या पराभवाचे खापर फोडताना राष्ट्रीय क्रिकेट मंडळ आणि संघव्यवस्थापनास जबाबदार धरून कोच वकार युनूस यांना दोषी ठरवले आहे़ युसूफ म्हणाला, मी नवा कर्णधार अजहर अली अथवा खेळाडूंना दोषी मानत नाही़ मी त्यांना दोषी मानतो की ज्यांनी गत महिन्यापासून सत्तेत आहेत आणि सारे चुकीचे निर्णय घेत आहेत़ यांच्यामुळेच आज अशी वेळ आली आहे़ मी मंडळाचे सर्व अधिकारी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या प्रशिक्षकांना दोषी मानतो़ ज्यांनी नव्या खेळाडूंच्या विकासासाठी काहीच केले नाही़ याशिवाय राष्ट्रीय संघाचे मुख्य कोच वकार युनूस दोषी आहेत़

Web Title: Yusuf blasted the management's defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.