युनूसचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा

By Admin | Updated: November 11, 2015 23:14 IST2015-11-11T23:14:26+5:302015-11-11T23:14:26+5:30

पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज युनूस खान याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंडबरोबर तो आज अखेरचा सामना खेळणार असून,

Yunus's goodbye to ODI cricket | युनूसचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा

युनूसचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा

अबुधाबी : पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज युनूस खान याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंडबरोबर तो आज अखेरचा सामना खेळणार असून, हा या ३७ वर्षीय खेळाडूचा २६५वा सामना आहे. युनूसने २०००मध्ये कराचीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. एकदिवसीय सामन्यात त्याने ७ शतके व ४८ अर्धशतकांसह ७ हजार २४० धावा केल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेनंतर युनूसला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची पुन्हा संघात निवड करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Yunus's goodbye to ODI cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.