यु मुंबाचा विजयी धमका सुरुच

By Admin | Updated: August 3, 2014 01:30 IST2014-08-03T01:30:29+5:302014-08-03T01:30:29+5:30

यु मुंबा संघाचा विजयी धमाका सुरुच असून आज शनिवारी झालेल्या सामन्यात त्यांनी बेंगाल वॉरियर्स ऑफ कोलकाता संघावर 9 गुणांनी सहज मात केली.

Yum Mumba's winning threat is going on smoothly | यु मुंबाचा विजयी धमका सुरुच

यु मुंबाचा विजयी धमका सुरुच

कोलकाता : यु मुंबा संघाचा विजयी धमाका सुरुच असून आज शनिवारी झालेल्या सामन्यात त्यांनी बेंगाल वॉरियर्स ऑफ कोलकाता संघावर 9 गुणांनी सहज मात केली. 
येथील नेताजी इनडोअर स्टेडीयवर दोन्ही संघात सामना झाला. स्पर्धेत आतार्पयत अपराजित राहीलेल्या यु मुंबा संघाने आपली विजयी परंपरा कोलकात्यात पुढे सुरु ठेवताना स्थानिक बेंगाल वॉरियर्स ऑफ कोलकाता संघावर 38-29 अशी मात केली. या स्पर्धेत मुंबईने 5 पैकी 4 सामने जिंकले असून एक सामना अनिर्णीत राहीला आहे. यु मुंबाचे 23 गुण झाले असून गुण तालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत.
दरम्यान, अन्य एका 
सामन्यात जयपूर पिंक पॅंथरने पटना पायरेट्सचा संघाचा 4क्-18 ने पराभव करीत प्रो-लीग कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. मनिंदर सिंग 
हा जयपूरच्या विजयात हिरो ठरला.त्याने 13 गुण मिळवून दिले.
तो सर्वेश्रेष्ठ रायडर ठरला. 
जयपूर संघाने मध्यंतरार्पयत 22-6ने आघाडी मिळवली होती. त्यांनी सुरुवातीपासून दबदबा निर्माण केला होता. प्रतिस्पर्धी संघाला शेवटर्पयत संधी मिळाली नाही. मनिंदरसोबतच राजेश नारवालने सहा गुण मिळवले. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Yum Mumba's winning threat is going on smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.