यू मुंबाचा ‘पंगा’च भारी

By Admin | Updated: July 21, 2015 00:49 IST2015-07-21T00:49:20+5:302015-07-21T00:49:20+5:30

यू मुंबा संघाने घरच्या मैदानावर आपले वर्चस्व पुन्हा एकवार सिद्ध करताना यंदाच्या प्रो कबड्डी दुसऱ्या सत्रात पटणा पायरेट्सचे कडवे आव्हान २५-२० असे आरामात परतवले

Yum Mumba's 'cripple' is heavy | यू मुंबाचा ‘पंगा’च भारी

यू मुंबाचा ‘पंगा’च भारी

रोहित नाईक, मुंबई
यू मुंबा संघाने घरच्या मैदानावर आपले वर्चस्व पुन्हा एकवार सिद्ध करताना यंदाच्या प्रो कबड्डी दुसऱ्या सत्रात पटणा पायरेट्सचे कडवे आव्हान २५-२० असे आरामात परतवले आणि विजयाची शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. या विजयासह यू मुंबाने सर्वाधिक १५ गुणांची कमाई करून गुणतालिकेत अव्वल स्थान आणखी मजबूत केले. पुन्हा एकदा कर्णधार अनूपकुमारने आक्रमक चढाया करताना मुंबईला सलग तिसरा विजय मिळवून दिला. याआधी झालेल्या सामन्यात तेलगू टायटन्सने दणदणीत विजयासह पुणेरी पलटणचा ४५-२४ असा धुव्वा उडवून दुसऱ्या विजयाची नोंद केली.
प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा लाभलेल्या मुंबईने सलग तिसऱ्या सामन्यात मुंबईकरांना विजयाची भेट दिली. सुरुवातीला तोडीस तोड खेळ झालेल्या या सामन्यात नंतर वर्चस्व राहिले ते फक्त मुंबईकरांचे. रिशांकने सुरेशकुमार आणि अमित हुडा यांना बाद करून मुंबईला ११-७ असे आघाडीवर नेले. त्याच वेळी दीपक नरवालने कमाल करताना एकाच चढाईत रिशांक आणि सुरेंद्र यांना
बाद करून पटणावरील लोणचे
संकट टाळले. मात्र, स्टार आक्रमक शब्बीर बापूने आपला जलवा दाखवताना गिरीश एरनाक आणि दीपक यांना बाद केले व लगेच २०व्या मिनिटाला पटणावर लोण चढवून मुंबईने मध्यंतराला १७-१० अशी आघाडी घेऊन सामन्यावर पकड मिळवली.
यानंतर मुंबईने मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. कोणतीही घाई न करता मुंबईने भक्कम बचावाच्या जोरावर सहज बाजी मारली. दुसऱ्या सत्रातदेखील शब्बीरने दबदबा राखला. दुसऱ्या बाजूला कर्णधार अनूप पटणा संघाला नाचवत होता.
मोहित चिल्लर, जीवाकुमार आणि विशाल माने यांनी दमदार पकडी करताना दोन्ही आक्रमकांना चांगली साथ दिली. पटणाकडून संदीप नरवालचा अष्टपैलू खेळ संघाचा पराभव टाळू शकला नाही. रवी दलालनेदेखील आकर्षक चढाई करताना पटणाकडून अपयशी झुंज दिली. दखल घेण्याची बाब म्हणजे पटणाचा अव्वल खेळाडू कर्णधार राकेशकुमारला या सामन्यात एकही गुण मिळवता आला नाही. त्याने एकूण १० चढाया केल्या; मात्र चमक काही दाखवता आली नाही.

Web Title: Yum Mumba's 'cripple' is heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.